मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यापासून अनेक वादंग घडत असतांना आता सर्वात मोठा दावा माजी खासदार शालिनीताई पाटील यांनी केल्याने राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. त्यांनी थेट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. शालिनी पाटील म्हणाले कि, “अजित पवार पुढच्या चार महिन्यांत तुरुंगात जातील”, तसेच पुढच्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होतील, असं पाटील म्हणाल्या. अजित पवार हे मुख्यमंत्री होण्यासाठी भाजपाबरोबर गेल्याची चर्चा सातत्याने होत आहे. याबाबत प्रश्न विचारल्यावर शालिनीताई म्हणाल्या, तुरुंगात गेलेल्या माणसाला निवडणुकीला उभं राहता येणार नाही. पुढच्या चार महिन्यांत अजित पवार तुरुंगात जातील. त्यामुळे ते मुख्यमंत्री होण्याची अजिबात शक्यता नाही.…
Author: editor desk
बोदवड : प्रतिनिधी शहरातील वंजारी वाड्यात घराचे बांधकाम सुरु असून, येथे स्लॅब टाकण्याचे काम सुरु होते. स्लॅब टाकतांना वर जाणारी क्रेन अचानक तुटली. यावेळी जेवणासाठी घरी जात असलेल्या तरुणाच्या अंगावर पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही दुर्दैवी घटना बोदवड येथे २४ डिसेंबरला घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बोदवड शहरात प्रकाश नारायण पालवे (वय ३७) हे कपाशीची गाडी भरण्यासाठी गेलेला होता. दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान तो जेवण कारण्यासाटःई घरी जात होता. यावेळी घराजवळच शेजारी बांधकाम चालू होते. स्लॅब टाकण्याचे काम क्रेन मशीनने सुरु होते. यावेळी प्रकाश हा घरी जेवणाला जात असतांना लोखंडी क्रेनचा छावडा अचानक त्याच्या अंगावर तुटून पडला. यात त्याचा…
बीड : वृत्तसंस्था ३५ वर्षीय विवाहितेला लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध, तुझा नवऱ्याला सांगून तुझा संसार उद्ध्वस्त करिन, अशी धमकी देत एका नराधमाने तब्बल ७ वर्ष अत्याचार केल्याची खळबळजनक घटना बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात घडली आहे. प्रमोद मुंजा पराड (रा. शिक्षक कॉलनी, मंजरथ रोड) असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव असून याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित ३५ वर्षीय विवाहितेचे लग्न झालेलं असून ती बीडच्या माजलगाव तालुक्यात राहते. आरोपी आणि पीडितेने लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते. मात्र, लग्नानंतर पीडितेने आरोपीसोबत संबंध तोडले, मात्र आपले लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध, तुझ्या नवऱ्याला सांगून तुझा संसार उद्ध्वस्त करिन, अशी धमकी देत आरोपीने पीडितेला…
मध्यप्रदेश : वृत्तसंस्था देशभरातील अनेक महामार्गावर भीषण अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच भरधाव वेगात असलेल्या कारचालकाने ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी ट्रक अचानक कारवर कोसळला. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात मंगळवारी पहाटेच्या सुमारास झाला. मृतांमध्ये दोन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. यासह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रामप्रकाश, जय देवी, रोशनी आणि गीता अशी मृतांची नावे आहेत. सुमित आणि राखी अशी गंभीर जखमी झालेल्या बहिण भावांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगड जिल्ह्यातील सारंगपूर येथील रहिवासी असलेले…
अहमदनगर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर नियमित अपघाताची घटना घडत असतांना एक भीषण अपघाताची बातमी आता अहमदनगर येथून समोर आली आहे. एसटी महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झालाय. बस जागीच पलटी झाल्याने यातील काही शालेय विद्यार्थी जखमी झालेत. जखमी विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार करण्यात आलेत. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अहमदनगरमधील संगमनेरमध्ये ही घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेली ही बस राहुरीकडून संगमनेरकडे निघाली होती. वाटेतच बसचे एक्सेल तुटले. त्यामुळे वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे प्रवाशांनी भरलेली बस रस्त्यावर पलटी झाली. अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी न झाल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. संगमनेर तालुक्यातील पिंपरणे गावात बस पोहचली त्यावेळी हा अपघात झाला. सकाळची वेळ असल्याने…
नागपूर : वृत्तसंस्था फुग्याच्या सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे नातेवाइकांसह खरेदीसाठी आलेला एक चार वर्षांचा चिमुकला ठार झाला, तर या स्फोटात दोन महिला जखमी झाल्या. ही घटना सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बिशप कॉटन स्कूल समोरील मैदानासमोर रविवारी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, सिझान आसिफ शेख (वय ४, रा. मानकापूर) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे, तर फरिया हबीब शेख (२८) आणि अनमता हबीब शेख (२४) असे जखमी महिलांची नावे आहेत. फारिया व अनमता या सिझानच्या मावशी आहेत. त्या खरेदीसाठी बिशप कॉटन स्कूल समोरील मैदानासमोर गेल्या होत्या. तेथे रात्री ८:३० वाजता एक फुगेवाला गॅसने भरलेले फुगे विकत…
बीड : वृत्तसंस्था जिल्ह्यातील जातेगाव येथील गेवराई तालुक्यातील श्रीपत अंतरवाला येथील दीड वर्षीय चिमुकलीच्या घशात तुरीची शेंग अडकली. यामुळे श्वास गुदमरून तिचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी गेवराई तालुक्यातील श्रीपत अंतरवाला येथे घडली.ज्ञानदा विजय आरदड असे मृत चिमुकलीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ज्ञानदाची आई घरकामात व्यग्र असताना ती बाहेरील मोकळ्या जागेत खेळत होती. यावेळी तिने तुरीची शेंग तोंडात घातली. काही वेळाने शेंग घशात अडकल्याने तिला श्वास घेताना त्रास होत असल्याचे आईच्या लक्षात आले. तिला कुटुंबीयांनी तत्काळ रामपुरी येथील खासगी रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी तिला बीडला हलविण्याचा सल्ला दिला.
जळगाव : प्रतिनिधी कशाचे तरी अमिष दाखवित रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने अपहरण केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास या मुलीला कोणतरी कशाचे तरी अमिष दाखवित तीला पळवून नेत तिचे अपहरण केले. हा प्रकार कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला. मात्र तरी देखील ती मिळून आल्याने अखेर त्यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्या तक्रारीवरुन पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील…
पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील नगरदेवळा येथून जवळच असलेल्या बदरखे येथे सालाबादप्रमाणे पेमबुवा महाराजाच्या यात्रेनिमित्त तमाशाचा कार्यक्रम सुरू असताना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हनुमंतखेडा येथील मनोज ज्ञानेश्वर निकम (३०) हा तरुण रविवारी काही अंतरावर मृतावस्थेत आढळून आला. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाच्या मृत्यूची माहिती मृताचे काका नंदकिशोर पाटील यांनी नगरदेवळा दूरक्षेत्राला दिली असता लागलीच नगरदेवळा पोलिस स्टेशनचे पोउनि योगेश गणगे, सहाय्यक फौजदार कैलास पाटील व मनोहर पाटील, अमोल पाटील, दिनेश पाटील आदींनी तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवला. तरुणाच्या शरीरावर काही ठिकाणी मार लागल्याचे आढळून आल्यामुळे हा मृतदेह जळगाव शासकीय रुग्णालय येथे पाठवल्याची माहिती मिळाली. तपास पोलिस उपनिरीक्षक…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील अट्रावल या गावात अज्ञाताने शेतकऱ्याच्या कापणी योग्य केळी पिकाचे नुकसान केले आहे. तब्बल दोन हजार केळीचे घड कापून नासधूस केल्याने शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. यावल पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर या घटनेमुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील अट्रावल येथील शेतकरी राजेंद्र व्यंकट चौधरी यांनी चिंतामण पंढरीनाथ तायडे यांचे शेत कसले: आहे. त्यात त्यांनी त्यांनी केळी पिकाची लागवड केली होती आणि आता केळी कापणीवर आली आहे, तर दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी कापणीवर आलेल्या केळीचा व्यवहार व्यापाऱ्यांसोबत केला होता. प्रती घड ५ हजार ५०० रुपयांत दिला होता…

