Author: editor desk

धुळे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीवर विनयभंग व अत्याचाराच्या घटना घडत असतांना नुकतेच धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरात अल्पवयीन मुला मुलीचे लग्न लावून देणाऱ्या दोघाही कुटुंबीयांना हे लग्न चांगलंच महागात पडलं आहे. याप्रकरणी मुलगा आणि मुलीच्या कुटुंबियांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यामध्ये बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरामध्ये गेल्या वर्षी अल्पवयीन मुलीला तिच्या नात्यातील अल्पवयीन मुलाने घरातून पळून नेले होते. त्यानंतर तिच्यावर शारीरिक अत्याचार झाल्यानंतर ती मुलगी गर्भवती राहिल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर, या दोघाही…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील राज्यभर दौरे व सभा घेत आहे. याच दरम्यान त्यांनी सरकारला दिलेली डेडलाईन संपली असून देखील सरकारने निर्णय घेतला नसल्याने आता विरोधी आमदारांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. नुकतेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आ.एकनाथ खडसे यांनी थेट सरकारवर हल्लाबोल केला आहे. आ.खडसे म्हणाले कि, मनोज जरांगे जेव्हा पहिल्यांदा आमरण उपोषणाला बसले होते. तेव्हा संकट मोचक म्हणून गिरीश महाजन त्यांना भेटायला गेले होते. तेव्हा ओबीसीमधून आरक्षण देऊ असे त्यांनी लिहून दिल्याचे जरांगे पाटील सांगत होते. आता सरकार त्या शब्दापासून मागे फिरत आहे. आता ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देऊ असे…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था देशभरात आगामी काळात लोकसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार असून त्यानंतर लगेच राज्यात विधानसभेची निवडणूक असणार आहे. तसेच त्यापाठोपाठ प्रलंबित असणाऱ्या महापालिका निवडणुकांचं देखील बिगूल वाजण्याची भविष्यात शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे. पक्षाचा प्रचार करण्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी खूश असायला हवेत. त्यांच्या मनात पक्षाबद्दल निष्ठा असणं अपेक्षित आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने खूश करण्याचा प्रयत्न केला जातो. या दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार गटाच्या सर्व जिल्हाध्यक्षांना नव्या कोऱ्या चारचाकी गाडी मिळणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या…

Read More

एरंडोल : प्रतिनिधी जुन्या धरणगाव रस्त्याकडून आलेली दुचाकीने राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना पारोळाकडून वेगाने आलेल्या कारने दुचाकीला धडक दिल्याने त्यात दुचाकीचालक महेंद्र गोरख जोगी (३२) हा दुचाकीवरून थोड्या अंतरावर फेकला जाऊन गंभीर जखमी झाला. ही दुर्घटना बुधवारी दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास अमळनेर नाक्यानजीक घडली. मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील गणेश नगर येथील रहिवासी महेंद्र जोगी हा दुचाकीला (एमएच-४६/वाय-५७९७) एरंडोल येथे पंपावर जाऊन पेट्रोल भरून घराकडे परतताना अमळनेर नाक्यानजीक महामार्ग ओलांडत असताना कारने (एमएच-०२/सीबी-८८५१) दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दुचाकी चालक जोगी हा खाली फेकला जाऊन गंभीर जखमी झाला. त्याला उचलण्यासाठी भरत महाजन व काशिनाथ महाजन या दोघांनी धाव घेतली. कारमधील पुरुष व…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात अपघाताच्या घटना सातत्याने घडत असतांना एक भीषण अपघाताची घटना पुणे शहरातून समोर आली आहे. पुण्यात मंतरवाडीमध्ये भीषण अपघात झाल्यांनतर डंपरने चिमुरड्याला चिरडले. यामध्ये त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. एक महिला तिच्या भाचा आणि भचिला दुचाकीवरुन घेवून शहरात येत असताना एका भरधाव डंपरने त्यांच्या स्कुटीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील 8 वर्षांचा चिमुकला खाली पडून डंपर खाली आल्याने त्याचा मृत्यू झाला. बुधवारी दुपारी ही घटना घडली आहे. दरम्यान, अपघातानंतर संतापलेल्या जमावाने डंपर पेटवून दिला. यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी काही नागरिकांनी दगड फेक केल्याची माहितीही समोर आली आहे. शौर्य सागर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरापासून नजीक असलेल्या कुसुंबा या गावी शुल्लक कारणावरुन भाऊ आणि बहिण अशा दोघांवर चॉपरचा वापर करुन प्राणघातक हल्ला करणा-या दोघांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. कुसुंबा गावातील गणपती नगरात राहणारे करण चंद्रशेखर पाटील आणि चेतन वसंत माळी अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 25 डिसेंबर 2023 रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास कुसुंबा गावी असलेल्या हॉटेल शिवशाहीच्या मागे अजय सुरेश सोनवणे यांच्या राहत्या घरासमोर करण आणि चेतन हे दोघे विनाकारण आरडाओरड करत होते. त्यावेळी अजय सोनवणे यांनी त्यांना आरडाओरड करु नका असे म्हटले. अजयच्या बोलण्याचा राग आल्याने करण आणि चेतन…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील काही महामार्गावर अपघाताची संख्या वाढत चालली असून नुकतेच वर्ष अखेरीच्या दोन दिवसापूर्वी मध्य प्रदेशात एक भीषण अपघात घडल्याची बातमी समोर आली आहे. रात्री ९ वाजेच्या सुमारास डंपर आणि बसमध्ये जोरदार धडक झाली. त्यानंतर बसमध्ये आग लागली. बसमधील 12 प्रवासी जिवंत जळाले. या प्रवाशांना रुग्णालयात नेताना आणि रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. काळाजाचा थरकार उडवणारा हा भीषण अपघात आहे. 15 प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. बसमध्ये जवळपास 40 प्रवासी होते. पोलीस घटनास्थळी पोहोचले. आसपासच्या लोकांनी बचावकार्यात मदत केली. घटनास्थळी पोलीस असून फायर ब्रिगेडकडून जोरात बचावकार्य सुरु आहे. मध्य प्रदेशातील गुना येथे हा भीषण अपघात झाला. गुनाचे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेलेल्या प्रशांत प्रभाकर गोपनारायण (वय ३५, रा. श्रीरत्न कॉलनी) या तरुणाने मध्यरात्रीच्या सुमारास रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. ही घटना असोदा रेल्वेगेटजवळ मंगळवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील श्रीरत्न कॉलनीमध्ये प्रशांत प्रभाकर गोपनारायण हे कुटुंबियांसह वास्तव्यास होते. मंगळवारी दुपारच्या सुमारास ते घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेले. काही वेळानंतर ते ईश्वर कॉलनीत राहणाऱ्या त्यांच्या मावसभावाकडे गेले, परंतू ते घरी मिळून आले नाहीत. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास प्रशांत गोपनारायण यांनी असोदा रेल्वेगेट जवळील खांबा क्रमांक ४२८/ २२ ते २४…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील शिवाजी नगरातील हुडको, धनाजी काळे नगर व मकरा अपार्टमेंट परिसरात जुन्या वादाची खून्नस काढण्यासाठी मध्यरात्रीच्या सुमारास शस्त्रधारी टोळक्याने तीन जणांच्या घरावर तलवारींनी हल्ला केला. ही घटना घडली. ही संपुर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. परंतू पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एमआयडीसी परिसरात मंगळवारी दुपारच्या सुमारास दोन गटात वाद झाले. परंतू पोलिसांनी या घटनेची दखल न घेतल्यामुळे त्याच दिवशी रात्रीच्या सुमारास शिवाजी नगरात पुन्हा हे दोन्ही गट एकमेकांच्या घरी जावून भिडले. त्यानंतर एका गटातील सुमारे दहा ते पंधरा जणांचे टोळके दुचाकीने हातात तलवारी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील एका परिसरात दोन गुन्हेगार धारदार शस्त्र घेऊन दहशत माजवीज असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी धाव घेत एकाला अटक केली. दुसरा फरार झाला आहे.एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील तांबापुरा परिसरात धारधार चॉपर घेऊन दोन जण दहशत माजवीत असल्याची माहिती माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. निरीक्षण जयपाल हिरे यांच्या पथकातील ललित नारखेडे व इतर कर्मचाऱ्यांनी धाव घेत तांबापुरा गाठले. रईस शेख रशीद (वय ३२, रा.तांबापुरा) व शोएब शेख सलीम (रा. जुम्मा शाहा वखारजवळ मेहरुण) असे दोघेही पोलिसांना पाहून पळू लागले. त्यापैकी रईस शेख रशीद हा पोलिसांच्या तावडीत सापडला तर त्याचा साथीदार…

Read More