Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था देशभरात कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा झपाट्याने वाढत असतांना जेएन.1 (JN.1) या नव्या सब व्हेरियंटने देशभरात हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकरने सावध पवित्रा घेत काळजी घेण्याचं आव्हान केलेय. दरम्यान, राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ते सध्या पुण्यातील मॉडर्न कॉलनीमध्ये असलेल्या घरी कॉरनटाइन आहेत. घरीच त्यांच्यावर औषधोपचार सुरु आहेत. मागील चार ते पाच दिवसांपासून धनंजय मुंडे यांना खोकल्याचा त्रास होत होता. त्यामुळे कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. सध्या ते पुण्यातील आपल्या घरी विलगीकरणात आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर घरीच औषध…

Read More

कोल्हापूर : वृत्तसंस्था राज्यातील महामार्गावर नियमित अपघाताच्या घटना घडत असतांना याचा फटका आता शिंदे गटाच्या मंत्र्यांना बसला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. त्यांच्या ताफ्यातील कारचा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. दोन गाड्या एकमेकाला धडकल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरहून ज्योतिबाला जात असताना तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील कारचा अपघात झाला आहे. पन्हाळा मार्गावर राजपूत वाडी येथे हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. यात एक जण जखमी झाला आहे.

Read More

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून देशभरा मनोज जरांगे पाटलांचे नाव चर्चेत आले आहे. मराठा आरक्षणासाठी ठाम भूमिका मांडणारे अ्न वेळ प्रसंगी सरकारला झुकवणारे आंदोलक… ही ओळख त्यांनी निर्माण केली असून आज मात्र वेगळ्याच भूमिकेत पाहायला मिळाले. मनोज जरांगे आज चक्क क्रिकेटच्या मैदानात दिसले. जालन्यातील अंतरवली सराटीत मनोज जरांगे यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. मनोज जरांगे पाटील यांचा क्रिकेट खेळतानाचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीतील मैदानावर क्रिकेट खेळताना दिसले. बॉलिंग आणि बॅटिंग करताना जरांगे या व्हीडीओमध्ये दिसत आहेत. जरांगे पाटील यांचा क्रिकेट खेळतानाचा व्हीडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. आरक्षणसाठी लढा…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणातून कॉंग्रेसला मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर सुनील केदार यांना दुसरा धक्का बसला आहे. सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. १५० कोटींच्या घोटाळा प्रकरणात न्यायालयाने त्यांना ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर आता नियमानुसार त्यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याचा शुक्रवारी २२ डिसेंबर निकाल लागला. या प्रकरणात कोर्टाने राज्याचे माजी मंत्री आणि कॉंग्रेसचे विद्यमान आमदार सुनील केदार यांना ५ वर्षांच्या कारावासाची आणि १२.५० लाख रुपये रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. सुनील केदार यांना २ वर्षांपेक्षा अधिक…

Read More

बारामती : प्रतिनिधी  येथील विद्या प्रतिष्ठानच्या अभियांत्रिकी विभागातील रोबोटिक लॅबच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना शरद पवार यांनी गौतम अदांनींचे आभार मानले आहेत. या कार्यक्रमाला फिनोलेक्स जे पॉवर सिस्टम्स लिमिटेडचे ​​अध्यक्ष दीपक छाब्रिया देखील उपस्थित होते. विद्या प्रतिष्ठान संस्थेने नवीन प्रकल्प हाती घेतला आहे. तंत्रज्ञानामुळे अभियांत्रिकी क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. तसेच पुढे जाण्यासाठी हे बदल स्वीकारण्यास तयार असणारा गट तयार करणे अत्यंत आवश्यक आहे, असे शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्योगपती गौतम अदानी यांचे पुन्हा एकदा तोंडभरुन कौतुक केले आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती येथे नवीन तंत्रज्ञान केंद्राच्या उभारणीसाठी आर्थिक मदत केल्याबद्दल शरद पवार यांनी शनिवारी उद्योगपती गौतम अदानी…

Read More

जळगाव : प्रतिनधी भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार ट्रकखाली सापडला. यामध्ये दुचाकीस्वाराचा पाय शरीरापासून वेगळा झाला. अपघातानंतर ट्रकखाली दुचाकीस्वार अडकून पडला होता. हा अपघात रात्री बारा वाजेच्या सुमारास सेंट तेरेसा स्कूल जवळ झाला. मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकी (क्र. एमएच १९, डीएल ३०८८) ट्रक (क्र. एमएच १९, झेड ४६५०) च्या टायरखाली येऊन दुचाकीस्वाराचा पाय शरीरापासून वेगळा झाला. यात दुचाकीस्वार बेशुद्ध झाल्याने त्याचे नाव समजू शकले नाही. ट्रक चालक पसार झाला.

Read More

जळगाव : प्रतिनिधी धावत्या रेल्वेच्या धडकेत तापी पाटबंधारे विभागातील लिपिक बळीराम माधव मराठे (५६, रा. सहयोग कॉलनी, पिंप्राळा) हे ठार झाले. ही घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास आशाबाबानगरजवळील रेल्वेरुळावर घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याठिकाणी मयताच्या मुलीने वडिलांना बघण्यासाठी आग्रह केला. पोलिसांनी तिला रोखल्यामुळे मुलीने आक्रोश केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्राळा परिसरातील सहयोग कॉलनीत रहिवासी बळीराम मराठे हे तापी पाटबंधारे विभागात लिपिक म्हणून नोकरी करीत होते. शनिवारी सायंकाळच्या सुमारास आशाबाबा नगरजवळील अपलाइनवरील खांब क्रमांक ४१७ जवळील ८ ते १० च्या दरम्यान, रेल्वेची धडक लागल्याने मराठे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती लोको पायलटने…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  चोरीच्या दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी सराफ कारागिराच्या घराचा कडीकोयंडा तोडण्याचा प्रयत्न केला; मात्र, दरवाजाला बसविलेले सायरन वाजल्यामुळे मालकासह परिसरातील नागरिक जागे झाल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला आणि चोरटे दुचाकी सोडून पसार झाले. ही घटना शनिवारी पहाटे सराफ बाजारातील मारवाडी व्यायामशाळेजवळ घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास मारवाडी व्यायामशाळेजवळ अनिल इंगळे यांचे पद्मावती गोल्ड सोने-चांदीचे दागिने घडविण्याचे दुकान असून काळ्या रंगाचे कपडे आणि डोक्यात टोपी घातलेले चार चोरटे त्यांच्या घराजवळ आले. त्यांनी घराच्या बाहेरील बाजूला लावलेले लोखंडी अँगल कापले. त्यानंतर घराचा मुख्य दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरवाजाला लावलेले सायरन…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरातील इच्छापूर्ती गणेश मंदिराबाहेर दि.२२ डिसेंबर रोजी तालुक्यातील एका तरुणाने शाळेत सोबत असल्याने परिचय असलेल्या एका तरुणीने त्याला लग्नास नकार दिल्याने याने तिला शिवीगाळ करीत मारहाण करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तरुणाविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावातील मुलगी संशयित आरोपीच्या शाळेत सोबत होते. त्यामुळे त्यांचा परिचय होता. ही तरुणी २२ डिसेंबर रोजी शहरात आलेली असताना तेथे हा तरुण आला व त्याने तू माझ्याशी लग्न कर, असे सांगितले. तरुणीने त्यास नकार दिला असता तरुणाने तिला शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली.…

Read More

यावल : प्रतिनिधी प्रेम विवाहाच्या वादातून तरुण आणि तरुणीच्या कुटुंबांमध्ये भांडण होऊन हाणामारी झाली. यात दोन्ही गटातील १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम विवाह करण्यासाठी मुलाकडे आलेल्या मुलीस भेटण्यासाठी तीचे कुटुंबिय आले होते. त्यांनी मुलाच्या कुटुंबासोबत वाद घातला. त्यातून दोन्ही गटात हाणामारी झाली. यात ३८ वर्षांच्या महिलेला दुखापत झाली. यात तरुणाचे कुटुंब हे मुळ यावल येथील आहे. तर तरुणीचे कुटुंब हे भुसावळ येथील आहे. तरुणीची आई तरुणीला भेटण्यासाठी उल्हासनगर येथून यावल येथे आली. मात्र आईला मुलीशी भेटू दिले नाही, त्यानंतर वाद झाला आणि मारहाण केल्याचा आरोप आहे. तर तरुणाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शहरातील…

Read More