Author: editor desk

पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांना प्रत्येक व्यक्ती देव समजत आहे पण गेल्या काही महिन्यापासून याच डॉक्टरी पेशाला काळिमा फासणाऱ्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. अशीच एक धक्कादायक घटना पुणे शहरात घडली आहे. उपचारांच्या नावाखाली एका तरुणीचा विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी दि.२२ रोजी पुण्यातील पद्मावतीनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी डॉक्टरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शुक्रवारी पद्मावती येथील डॉ. पिंगळे क्लिनीक येथे रात्री पावणे अकराच्या सुमारास घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सहकारनगर येथे राहणाऱ्या एका तरुणीने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन डॉ. हनुमंत पिंगळे (रा. निर्मल पार्क सोसायटी, पद्मावतीनगर) याच्यावर आयपीसी…

Read More

धुळे : प्रतिनिधी  शहरातील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत अत्याचार करीत अश्लील व्हिडीओ बनवून ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही संतापजनक घटना घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून शनिवारी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका भागातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेण्यात आले होते. तिच्यावर अत्याचार करत घरात डांबून ठेवण्यात आले होते तसेच अश्लील व्हिडीओ बनवून मारहाण करण्यात आली. हा प्रकार धुळ्यासह सुरत येथे घडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मुलगी धुळ्यातील आपल्या घरी निघून आली. तिने चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात शनिवारी फिर्याद दिल्यानंतर 11…

Read More

नवी दिल्लील : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून आपल्या दरबाराच्या माध्यमातून चर्चेत आलेले बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री आता लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. लवकरच लग्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही हिंदू संस्कृतीचे सैनिक आहोत. सनातनमध्ये सर्व काही आई-वडील आणि गुरूंच्या आज्ञेनुसार घडते. आमचे आई-वडील जेथे सांगतील तेथे लग्न करणार. बागेश्वर धामच्या दरबार हॉलमध्ये रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. राम मंदिर उभारणी हा हिंदूंचा सर्वात मोठा विजय असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, 22 जानेवारी रोजी कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेचे पूजक प्रभू श्रीराम भव्य मंदिरात विराजमान होतील. मी रसगुल्ला खाऊन खूप नाचणार. पंडित शास्त्री म्हणाले…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील अनेक मोठ्या शहरात प्रेमाच्या नावावर अनेक गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतीच एक धक्कादायक घटना चेन्नई शहरातून समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या सॉप्टवेअर इंजिनिअर मैत्रिणीची हत्या केली. वाढदिवशी सरप्राईज गिप्ट देण्याच्या बहाण्याने मैत्रिणीचे डोळे बांधले त्यानंतर साखळीने बांधत तिला जिवंत जाळल्याची घटना चेन्नईत घडलीय. संशंयित आरोपीची ओळख पटवण्यात आली असून त्याचं नाव वेट्रिमारन आहे. आरोपी एक ट्रान्स पुरुष आहे. त्यानेच त्याची सॉफ्टवेअर मैत्रिणीला जिवंत जाळल्याचं सांगितलं जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केलीय. मिळालेल्या माहितीनुसार, सॉप्टवेअर इंजिनिअर असलेली २५ वर्षीय नंदिनी मदुराई येथील रहिवाशी असून हे दोघेही एकमेंकांना ओळखत होते. विशेष म्हणजे काही काळ ते…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबई पोलीस दलातून एक दुर्देवी बातमी समोर आली आहे. मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्याचा ड्युटीवरुन घरी जात असताना मांजाने गळा चिरुन पोलीस अंमलदाराचा मृत्यू झाला आहे. समीर जाधव असं मृत पोलीस अंमलदाराचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिंडोशी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले समीर जाधव हे नियमितपणे ते रविवारी देखील आपलं कर्तव्य बजावून घरी निघाले होते. बाईकवरुन जात असताना मांजाने गळा चिरुन ते गंभीर जखमी झाले होते. वाकोला ब्रिज येथे हा प्रकार घडला होता. समीर यांना जखमी अवस्थेत सायन रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. समीर यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबियांना दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात कोरोनाच्या जेएन.१ या नव्या विषाणूने शिरकाव करण्यास सुरुवात केली आहे. आता ठाण्यात रविवारी जेएन.१ व्हायरसचे ५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये एक महिलेसह ४ पुरुषांचा समावेश आहे. एकाचवेळी शहरात ५ नवे रुग्ण आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दुसरीकडे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. शहरातील कोरोना तपासण्या वाढवण्यात आल्या आहेत. सर्दी, खोकला, घसादुखी, ताप यासारखी लक्षणे दिसल्यास नागरिकांनी डॉक्टरांचा सल्ला घ्या, असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. दरम्यान, रविवारी दिवसभरात राज्यात जेएन.१ विषाणूचे तब्बल ९ रुग्ण आढळून आले आहेत. नव्या बाधित रुग्णांमध्ये ठाणे महापालिका हद्दीत ५, पुणे महापालिका हद्दीत ०२, पुणे जिल्हा…

Read More

पुणे : वृत्तसंस्था जेवण तयार न केल्याने पत्नीला बेदम मारहाण कारून तिचा खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (दि. २२) कात्रज भागातील दत्तनगर परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मधुरा तानाजी कांबळे (वय ४२, रा. स्वामी समर्थनगर, दत्तनगर, कात्रज) हे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती तानाजी शिवाजी कांबळे (वय ४३) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत मुलगा पियूष तानाजी कांबळे (वय १९) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. तानाजीला दारूचे व्यसन आहे. तो शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास तो घरी आला. जेवण तयार न झाल्याने तो पत्नी मधुरा यांच्यावर चिडला. त्याने रागाच्या भरात मधुरा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील हरिविठ्ठल नगरातील एक ३८ वर्षीय मजूर आठवडाभर काम केल्यानंतर मजूरीचे पैसे घेण्यासाठी जातांना रेल्वे रुळ ओलांडतांना रेल्वेची धडक लागून रवींद्र अशोक मिस्तरी (शिरसाठ) (वय ३८) यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास हरिविठ्ठल नगर परिसरातील रेल्वे रुळावर घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगरात रविंद्र मिस्तरी हे कुटुंबियांसह वास्तव्यास असून ते इमारतींना रंग देण्याचे काम करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. आठवडाभर काम केल्यानंतर त्याचा मोबदला घेण्यासाठी ते हरिविठ्ठल नगरातून खंडेराव नगरकडे जात होते. त्या वेळी विश्वकर्मा मंदिरानजीक रेल्वे रुळ ओलांडतांना रविंद्र मिस्तरी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जीवनात प्रयत्नांत यश असते. समाजाप्रती पूर्वीच्या गुरुजी विषयी असलेली प्रतिमा शिक्षकांनी जोपासावी. अवगत असलेले गुण विद्यार्थ्यांनी जोपासून विविध नैपुण्य प्राप्त करून आपल्या शाळेचा नावलौकिक वाढवावा. विद्यार्थ्यांनी विज्ञानाचा ध्यास घेऊन संशोधन करावे असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता विभागचे मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते जळगाव येथील स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालयात आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी समर्थ ग्रुपचे अध्यक्ष मनोजकुमार पाटील सर हे होते. शिक्षण विभाग पंचायत समिती जळगाव तर्फे येथील स्वामी समर्थ विद्यालय कुसुंबा येथे जळगाव तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उदघाटक म्हणुन पालक मंत्री ना गुलाबराव…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  तालुक्यातील  वरणगाव राष्ट्रीय महामार्गावर खासगी बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री १ वाजेच्या सुमारास घडला आहे. जगतारसिंग बिक्करसिंग बिलींग (वय ४५), रा. वरणगाव असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव येथे जगतारसिंग उर्फ तारा बिक्करसिंग बिलींग हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. शनिवार, २३ डिसेंबर रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास ते त्यांच्या दुचाकीने मोटार सायकल क्र. एमएच १९, डीयू -१२१८ याचेवर मागे पत्नी बसुन घरी जात असतांना त्यांच्या दुचाकीला मागून भरधाव वेगाने येर्णाया खासगी बस क्रमांक एम.एच.४० ए.टी.०२८९ ने जोरदार धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. पत्नी जखमी झाली या दोघांना १०८…

Read More