जळगाव : प्रतिनिधी
कशाचे तरी अमिष दाखवित रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने अपहरण केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास या मुलीला कोणतरी कशाचे तरी अमिष दाखवित तीला पळवून नेत तिचे अपहरण केले. हा प्रकार कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला. मात्र तरी देखील ती मिळून आल्याने अखेर त्यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्या तक्रारीवरुन पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे हे करीत आहे.