Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था अनेक परिवारात छोट्या मोठ्या कारणावरून वाद होत असतात, पण ते वाद काही वेळाने मिटत असतात, पण एक धक्कादायक घटना मुंबईतून समोर आली आहे. कौटुंबिक वादातून विवाहितेला सासरच्या लोकांनी जिवंत जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत महिला जवळपास ९० टक्के भाजली आहे. सध्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भांडूपच्या सोनापूरमधील या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घरात झालेल्या वादातून महिलेला आज (२७ डिसेंबर) सासरच्या मंडळींनी जिवंत जाळलं आहे. दीर, नणंद दोघांनी केरोसीन ओतून महिलेला जिवंत जाळल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांना दीर आणि नणंद दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. महिलेला आधी फोर्टिस रुग्णालयात…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील श्यामा मुखर्जी उद्यान परिसरातील एका टेलर्स दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने दुकानातील अंदाजे पाच ते सहा लाखांचा मुद्देमाल जळून खाक झाल्याची थरारक घटना मध्यरात्री घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील श्यामा मुखर्जी उद्यान परिसरात प्रमोद सोनवणे यांच्या मालकीची कापडाची दुकान असून मध्यरात्री १२ ते १ च्या सुमारास अचानक शॉर्टसर्किटमुळे दुकानाला आग लागली. दुकानातील विक्रीसाठी असलेले कपडे आणि शिलाई मशीन आदी जळून नष्ट झाले. तब्बल ५ ते ६ लाखांचा नुकसान यावेळी झाल्याचे अंदाज वर्तविण्यात येत आहे. तसेच दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान सदर घटना घडताच अग्निशमन विभागातील जवान वाहनचालक देविदास सुरवाडे फायरमन रोहिदास चौधरी, भगवान…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी  तालुक्यातील नगरदेवळा येथून जवळच असलेल्या बदरखे येथे सालाबादप्रमाणे पेमबुवा महाराजांची यात्रेनिमित्त तमाशाचा कार्यक्रम सुरु असतांना तमाशा बघण्यासाठी आलेल्या हनुमंतखेडा ता. सोयगाव. जि. संभाजीनगर येथील मनोज ज्ञानेश्वर निकम (२६) या युवकाचा मृतदेह २४ डिसेंबर रविवार रोजी तमाशा सुरू असलेल्या ठिकाणाहून काही अंतरावर २५ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तरुणाच्या मृत्यूची प्राथमिक माहिती मृताचे काका नंदकिशोर पाटील यांनी नगरदेवळा औट पोस्टला दिली असता तात्काळ पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे, सहाय्यक फौजदार कैलास पाटील, मनोहर पाटील, अमोल पाटील, दिनेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन सदरील जागेचा पंचनामा करून मृतदेह पाचोरा ग्रामीण…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील पुणे शहरात गेल्या काही महिन्यापासून अपघाताच्या घटना सुरु असतांना नुकतेच सोमवारी रात्री ११.३० एक भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने २ जण जागीच ठार झालेत. तर एक जण किरकोळ जखमी आहे. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीये. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे नगर महामार्गावर सोमवारी रात्री ११.३० वाजता बकोरी फाट्याजवळ हा अपघात झाला. रावसाहेब सिदाजी माने ( वय 21, रा. रामनगर, लोणीकंद ) व राहुल मोहन डुकले ( वय 19, रा. गोरे वस्ती, वाघोली ) असे अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. रावसाहेब हा फूड डिलिव्हरी करण्याचे काम करत होता, अशी माहिती पोलिसांनी…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था उत्तर प्रदेशच्या पिलिभित जिल्ह्यातील एका गावात रात्रीच्या वेळी घुसलेल्या वाघिणीला जवळपास १२ तासांच्या अथक प्रयत्नानंतर पिंजऱ्यात कैद करण्यात यश आले. वाघीण घुसल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघिणीला बेशुद्ध करत पकडले यावेळी या परिसरात गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. वाघिणीला पकडतानाचा व्हिडीओ बनवून अनेकांनी तो सोशल माध्यमावर टाकला. व्याघ्र संरक्षित क्षेत्र माला रेंजपासून चार किमी दूर अंतरावर स्थित अटकोना गावात वाघिणीने घुसखोरी केली होती. गावातील शेतकरी सुखविंदर सिंग आपल्या कुटुंबासोबत सोमवारी रात्री झोपलेले होते. रात्री १२ च्या सुमारास घराजवळील वाहनावर वाघिणीने उडी मारत मोठी डरकाळी फोडल्यानंतर संपूर्ण…

Read More

जळगाव : प्रतिनिधी गावातील भांडणाच्या कारणावरुन तरुणाशी वाद घालीत त्याच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास जिल्हा परिषद परिसरात घडली. याप्रकरणी तरुणाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील चेतन ज्ञानेश्वर पाटील हा तरुण नूतन मराठा महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. त्यांच्या गावातील जय सुपडू शेळके यांची म्हैस चेतन यांच्या खळ्यात शिरल्यामुळे त्यांच्यात भांडण झाले होते. मंगळवारी सकाळच्या सुमारास चेतन पाटील हा जळगावात क्लाससाठी आला होता. क्लास आटोपून चेतन हा घरी जाण्यासाठी जिल्हा परिषदजवळ आला. यावेळी जय शेळके हा त्याच्या मागे आला. यावेळी त्याने तू गावात काय…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अनेक लग्नकार्यांत मानापमान नाट्य रंगल्याचे आपण पाहिले आहे. अनेकदा जेवणावरूनही वादविवाद होतात; परंतु वन्हाडींना पंगतीत मटणाची नळीच वाढली नसल्यामुळे लग्न मोडल्याची अजब घटना तेलंगणाच्या हैदराबादमध्ये घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जगतियाल येथील मुलगा असून मुलगी निजामाबादमधील राहणारी आहे, नोव्हेंबर महिन्यात मुलीच्या घरीच साखरपुडा झाला. वधूपक्षाकडील लोकांनी पाहुण्यांसाठी मांसाहारी बेत ठेवला होता. परंतु जेवणात मटणाची नळी नसल्याची तक्रार वर पक्षातील लोकांनी केली. साखरपुड्यापूर्वी झालेल्या बोलणीत जेवणाच्या पदार्थांमध्ये मटणाच्या नळीचा समावेश नव्हता, असा दावा मुलीकडील लोकांनी केला. परंतु इतका वाढला की अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले. पोलीस अधिकाऱ्यांनी मुलाच्या कुटुंबीयांना वाद मिटवण्याचा सल्ला दिला; परंतु ते पोलिसांनाही जुमानत नव्हते.…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  शहरातील धुळे रस्त्यावर वीज मंडळ याठिकाणी दि.२५ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास स्फोट होऊन कारला अचानक आग लागल्याने कारमध्ये झोपलेला पिता आणि मुलगा, असे दोघे जखमी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कार्यालयासमोर राजस्थानमधील ओटा बुंदीया जिल्ह्यातील खेळणी व संसारोपयोगी साहित्य विक्रेत्यांनी अमळनेर शहराबाहेर आपले बस्तान मांडले आहे. त्यांची वस्तू वाहणारी ओमिनी गाडी त्यांच्या झोपडीशेजारी लावलेली होती. गाडीमध्ये रात्री कर्नल बागडीया (वय ६०) हे झोपलेले होते. रात्री ११ वाजेच्या सुमारास अचानक स्फोट होऊन गाडीला आग लागली. या आगीत ते आणि त्यांचा तरुण मुलगा रामलाल (वय ३०) हे जखमी झाले. आग लागताच नगर परिषदेचा अग्निशमन बंब…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  वापी-यावल बसला सुरत-नागपूर महामार्गावरील दहिवेलनजीकच्या बोडकीखडी गावाजवळ ब्रेक फेल झाल्याने बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात २० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर साक्री ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सुरत- नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील दहिवेलनजीक असलेल्या बोडकीखडी गावाजवळ वापीहून यावल जाणारी एमएच २०. बीएल ३३७७ क्रमांकाच्या बसचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे बस ट्रकला धडकली. अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळी न थांबता ट्रक पळवून नेला. दहिवेल औट पोस्टवरील पोलिस कर्मचारी राजू जाधव, सागर चौधरी, दिनेश मावची घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बसमधील २० जखमी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था शहरातून एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. आरबीआयच्या कार्यालयात खिलाफत इंडियाच्या ईमेलवरून बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली असून खिलाफत इंडियाच्या मेलवरून आरबीआय कार्यालयासहित एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेतही बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली. या धमकी सत्रानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या महितिन्सुअर, मुंबईतील भारतीय रिझर्व्ह बँकेला ई-मेलद्वारे धमकीचा मेसेज आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. आरबीआयच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आहे. आरबीआयच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आहे. खिलाफत इंडिया नावाच्या ई-मेलय आयडीवरुन ही धमकी देण्यात आलीय. आरबीआय, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेत…

Read More