नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच सर्वच पक्षांनी तयारी केली असून कॉंग्रेसने देखील भारत जोडो न्याय यात्रा सुरु केली आहे. यात बुधवारी 31 जानेवारी रोजी बिहारमधून पश्चिम बंगालमध्ये दाखल झाली. मालदा दौऱ्यावर असताना राहुल यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले की, काही अज्ञात लोकांनी राहुल यांच्या कारवर दगडफेक केली, त्यामुळे कारची मागील काच फुटली. अधीर रंजन म्हणाले की, असे हल्ले आम्ही मान्य करणार नाही. या हल्ल्यात राहुल यांना कोणतीही दुखापत झाली नाही. आज ही यात्रा पुन्हा एकदा बिहार सोडून पश्चिम बंगालमध्ये दाखल झाली आहे. या यात्रेचा हा 16 वा दिवस आहे. 29 आणि 30…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी मानले जाणारे शिवसेना आमदार अनिल बाबर यांचे निधन झाले आहे. खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे त आमदार होते. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. न्यूमोनिया झाल्याने त्यांना सांगलीतील रुग्णालयात मंगळवारी दुपारी दाखल करण्यात आले होते. तसेच बाबर यांना पाणीदार आमदार असेही म्हटले जात होते. अनिल बाबर हे खानापूर-आटपाडी मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार होते. एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर अनिल बाबर हे 40 आमदरांसह गुवाहटीला गेले. अनिल बाबर हे खानापूर-आटपाडी मतदार संघाचे विधानसभत प्रतिनिधित्व करत होते.. अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर हेही राजकीय जीवनात सक्रिय आहेत. सांगलीच्या खानापूर विधानसभा मतदारसंघाचे…
जळगाव : प्रतिनिधी जुन्या भांडणातून पुन्हा वाद घालत तीन ते चार जणांनी घरात घुसून कैलास उखा पवार (३२, रा. सुप्रिम कॉलनी) यांच्यासह त्याची १० वर्षांची मुलगी तेजस्विनी कैलास पवार हिच्यावर चॉपरने हल्ला केला. यात दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना मंगळवार, ३० जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास सुप्रिम कॉलनीत घडली. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रिम कॉलनीतील कैलास उखा पवार हे मजुरीचे काम करतात. मंगळवार, ३० जानेवारी रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरून त्याच परिसरात राहणारे तीन ते चार जणांनी पवार यांच्या घरात घुसून त्यांच्यावर चॉपरने हल्ला केला यावेळी…
जळगाव : प्रतिनिधी रस्त्याने घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी रुचीलक्ष्मी काबरा (४५, रा. अभियंता कॉलनी) यांच्या गळ्यातील सोन्याची चेन व मणी, मंगळसूत्र असलेली पोत चोरून नेली. ही घटना सोमवार, २९ जानेवारी रोजी रात्री हनुमान कॉलनीत घडली. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील अभियंता कॉलनीमधील रहिवासी असलेल्या रुचीलक्ष्मी काबरा या सोमवारी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास घराकडे जात होत्या, त्यावेळी दुचाकीवरून दोनजण आले व या महिलेच्या गळ्यातील २६ हजार रुपये किमतीची साडेचार ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, ४७ हजार रुपये किमतीची आठ ग्रॅम वजनाची मणी, मंगळसूत्र असलेली पोत असा एकूण…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका दुकानामध्ये आल्यानंतर तेथून साडी घेतली नाही म्हणून दुकानदार अमित दिलीपकुमार प्रथ्यानी (४५, रा. मोहाडी रोड) यांनी महिलेसह तिच्या आई व भावाला शिवीगाळ, धक्काबुक्की करत मारहाण केली. ही घटना सोमवार, दि. २९ जानेवारी रोजी संध्याकाळी फुले मार्केटमधील दुकानात घडली. याप्रकरणी दुकानदाराविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. वाघनगर परिसरातील रहिवासी असलेल्या संगीता बिस्मिल्ला तडवी (३०) या त्यांच्या आई व भावासह फुले मार्केटमधील अमर क्लॉथ सेंटर या साडीच्या दुकानात खरेदीसाठी गेल्या होत्या. तेथून त्यांनी साडी खरेदी केली नाही यावरून दुकानदार अमित प्रथ्यानी यांनी या तिघांना शिवीगाळ, धक्काबुक्की करत मारहाण केली. तसेच ‘तुमको क्या करने…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हा पोलिस दलातील वैद्यकीय तसेच कौटुंबीक कारणावरुन ७६ पोलिस कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या असून, सहा बदलीपात्र कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी मंगळवार, ३० जानेवारी रात्री काढले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस दलातील बदल्यांचे सत्र सुरु आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हा पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यावेळी विनंती बदलीचे आदेश प्रलंबित होते. आता कौटुंबिक, वैद्यकीय कारणास्तव जिल्हा पोलिस दलातील ७६ पोलिस कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत. सहा जणांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे. बदली झालेल्यांमध्ये पोलिस शिपाई ते सहाय्यक फौजदारापर्यंत सर्व कर्मचाऱ्यांची विनंती बदली करण्यात…
जळगाव : प्रतिनिधी राजकमल टॉकीजजवळ किराणा दुकानासमोरून दुचाकीने अवैधरित्या सुगंधित पानमसाला आणि तंबाखूची वाहतूक करणाऱ्या राजेश गुरुमुखदास रामचंदानी (४७, रा. सिंधी कॉलनी) याच्यावर मंगळवार, ३० जानेवारी रोजी दुपारी शनिपेठ पोलिसांनी कारवाई केली. कारवाईत २६ हजार ६२० रुपयांचा सुगंधित पानमसाला व तंबाखू तसेच २० हजार रुपयांची दुचाकी मिळून ४६ हजार ६२० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. शनिपेठ पोलिसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजकमल टॉकीजजवळ एक जण सुगंधित पानमसाला आणि तंबाखू घेऊन जात असल्याची माहिती शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. त्यांच्यासह पोउनि योगेश टिकले, पोकॉ गिरीश पाटील, अश्विन हडपे, राहुल घेटे मुकुंद गंगावणे…
अहमदनगर : वृत्तसंस्था राज्यातील गुन्हेगारी नेहमीच वाढत असतांना नुकतेच अहमदनगर येथील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाणे हद्दीत एक धक्कादाक घटना उघडकीस आली आहे. घरामध्ये एका तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा मृतदेह योगेश शेळके या तरुणाचा असल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय योगेश आपल्याच गावात शेती व्यवसाय करत होता. रात्री ३ च्या सुमारास ही विचित्र घटना घडली. ४ अज्ञात व्यक्ती योगेशच्या घरात घुसले होते. त्यांनी त्याला मारहाण करतच गळा चिरून त्याची हत्या केली. पोलीस तपासात ही माहिती समोर आली आहे. शेतकरी तरुणाचा खून नेमका कोणी केला? त्याचे कुणाशी वैर…
जळगाव : प्रतिनिधी निमखेडी रस्त्यावरील दर्शन कॉलनीसह परिसरात घरफोडी करणार्या दोन आरोपींना जळगाव तालुका पोलिसांनी जळगाव शहरातील दाणा बाजार परिसरातून अटक केली. जिमाउल्ला खान अलहउल्ला खान (60) व सैय्यद अफसर सैय्यद अजगर (22) अशी अटकेतील संशयितांची नावे असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हायवे दर्शन कॉलनी व निमखेडी रस्त्यावर घरफोडीच्या दोन घटना झाल्या होत्या. यातील चोरट्यांचा शोध सुरू असताना जिमाउल्ला खान अलहउल्ला खान व सैय्यद अफसर सैय्यद अजगर यांनी ही चोरी केल्याची माहिती जळगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांना मिळाली. शर्मा यांना संशयित गावात आल्याची कळताच त्यांनी सहाय्यक निरीक्षक…
बीड : वृत्तसंस्था राज्यातील प्रत्येक शहरात अल्पवयीन मुलीसह तरुणीवर विनयभंग व अत्याचाराच्या नेहमीच घटना घडत असतांना अशीच एक धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातून समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शिक्षणाची पंढरी समजली जातेय. पण इथे आता महाविद्यालयीन तरूणींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. अंबाजोगाईत महाविद्यालयीन तरुणीची छेडछाड काढत विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यामुळे विद्यार्थिनींमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. पीडित तरूणी इयत्ता अकरावीच्या वर्गात शिकते. तिच्याच गल्लीत राहणाऱ्या एका तरूणीने तिची छेड काढली आहे. छेडछाड करत बळजबरीने तिचा हात त्या तरूणाने धरला. हात धरून तिला कॉफी शॉपमध्ये नेलं. मात्र, यावेळी तरुणीने आपली सुटका करत घर गाठलं. या…

