सोलापूर : वृत्तसंस्था शाळेत खोड्या करतो, सतत मोबाईल मागतो म्हणून जन्मदात्या पित्यानेच पोटच्या मुलाचा जीव घेतल्याची घटना सोलापूर शहरात घडली आहे. या घटनेत मृत झालेल्या मुलाचे नाव कीर्ती बट्ट असून क्रूर पित्याचे नाव विजय बट्ट आहे. हा धक्कादायक प्रकार १५ दिवसांनंतर समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोलापुरातील जोडभावी पेठ पोलीस ठाणे परिसरात राहणारे विजय बट्ट यांनी आपल्या पोटच्या मुलाची संक्रातीच्या दिवशीच कोल्ड्रिंगमध्ये विषारी पावडर टाकून हत्या केली. शाळेतील सततच्या तक्रारी, खोडकरपणा, अभ्यास न करणे, सतत मोबाईल पाहणे या कारणावरून वडिलांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. विजय बट्ट यांनी संक्रातीच्या दिवशी मुलगा कीर्ती बट्ट याला निर्मनुष्य ठिकाणी…
Author: editor desk
चोपडा : प्रतिनिधी राज्यात बंदी असणारा गुटखा मध्यप्रदेशातून चोपड्यामार्गे जळगावकडे जात असताना नाशिक येथील विशेष पोलिस महानिरीक्षक पथकाने केलेल्या कारवाईत ६२ लाख ६१ हजार १०४ रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी एका शाळेजवळ ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाल्याने त्यांनी सोमवारी सकाळी सापळा लावला. मध्य प्रदेशातून उमर्टी, चोपडामार्गे जळगावकडे जाणाऱ्या ट्रकची (एमएच१९/सीवाय६९७२) चोपडा-शिरपूर रस्त्यावर शहराबाहेरील चावरा शाळेजवळ तपासणी केली. त्यात गुटखा असलेली एकूण ७५ पोती सापडली. त्याची किंमत ६२ लाख ६१ हजार १०४ रुपये असून, मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कारवाई करणाऱ्या पथकाने जळगाव अन्न भेसळ विभागाला कळवून अन्नसुरक्षा…
जळगाव : प्रतिनिधी दोन वर्षांसाठी हद्दपार असताना तलवार घेऊन दहशत पसरविणाऱ्या व २२ गंभीर गुन्हे दाखल असलेला दिनकर ऊर्फ पिण्या रोहिदास चव्हाण (वय २६, रा. सुप्रीम कॉलनी) याला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेत तलवार जप्त केली, पिण्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दिनकर ऊर्फ पिण्या रोहिदास चव्हाण याच्यावर दोन वर्षांसाठी हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. तो हद्दपार असताना सुप्रीम कॉलनी परिसरात तलवार घेऊन दहशत पसरवीत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यांनी गुन्हे शोध पथकातील पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, राहुल रगडे, सचिन पाटील, विशाल कोळी, सतीश गरजे,…
रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील बोहर्डे येथील पूर्वाश्रमीच्या प्रियकराविरुद्ध एकदा विनयभंगाचा गुन्हा दाखल करूनही त्याच्याकडून होत असलेल्या बदनामीला कंटाळून विवाहितेने चक्क धारदार विळ्याने तिच्या पूर्वाश्रमीच्या प्रियकरावर वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना दि. २८ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी रावेर पोलिसात या विवाहितेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विवाहितेला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोहर्डे येथील जितेंद्र एकनाथ पाटील या ३० वर्षीय युवकाचे एका २८ वर्षीय विवाहितेशी प्रेमसंबंध जमले. दरम्यान, त्यांचे रंगलेले प्रेमप्रकरण पतीच्या निदर्शनास आल्यानंतर व सासरी सर्व हकिगत समजल्यानंतर विवाहितेच्या माध्यमातून त्या प्रियकराविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी यासह १३ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आकाश उर्फ डोया मुरलीधर सपकाळे (२३) व गणेश उर्फ काल्या रवींद्र सोनवणे (२०), रा. कांचननगर यांना जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. तसे आदेश पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी सोमवार, २९ जानेवारी रोजी काढले. आकाश सपकाळे व गणेश सोनवणे या दोघांविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यासह जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, चोरी, दंगल, घातक हत्यार बाळगणे, गंभीर दुखापत, मारामारी, मालमत्तेचे नुकसान यासह वेगवेगळे १३ गंभीर गुन्हे दाखल आहेत
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था एपीआय कॉर्नरजवळ सोमवारी सकाळी कौटुंबिक वादातून डॉक्टर पत्नीने थेट घरच पेटवून दिल्याची घटना घडली. याप्रकरणी पतीने दिलेल्या तक्रारीवरून पत्नीविरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. गोविंद सुभाषराव वैजवाडे (४०) हे एका रुग्णालयात कार्यरत आहेत. तर पत्नी डॉ. विनिता (दोघेही रा. नालंदा कॉम्प्लेक्स) या नक्षत्रवाडीच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. २०१९ मध्ये त्यांचे लग्न झाले. मात्र, विनिता सातत्याने पतीच्या चारित्र्यावर संशय घेऊन वाद घालत होत्या. रविवारी रात्री त्यांच्यात पुन्हा वाद झाला. आरडाओरड सुरू झाल्याने त्यांचे शेजारी मनोज मर्दा यांनी दोघांची समजूत घातली, परंतु, वाद सुरूच असल्याने त्यांनी विनिता यांना रुग्णालयात नेऊन सोडले. सकाळी ६…
चाळीसगाव : प्रतिनिधी आपले शहर,गाव, तालुका सुरक्षित ठेवण्यासाठी, कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन अहोरात्र परिश्रम घेत असते, मात्र पोलीस प्रशासनाला अपेक्षित असणाऱ्या सोयी – सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लोकप्रतिनिधींचा पुढाकार मिळाला तर काय बदल होऊ शकतो याचे एक चांगले उदाहरण चाळीसगाव शहरात घडले आहे. जळगाव जिल्ह्यातील एक महत्वाचे तसेच छत्रपती संभाजीनगर, धुळे, नाशिक या तीन जिल्ह्यांच्या सीमेवरील चाळीसगाव शहर हे दळणवळणाचे मोठे केंद्र आहे. त्यामुळे साहजिकच शहराच्या सुरक्षा पाहणाऱ्या पोलिसांची जबाबदारी देखील वाढते. मात्र चाळीसगाव शहरात पोलिसांना गस्तीसाठी व नागरिकांना तात्काळ मदतीसाठी असणाऱ्या नागद चौफुली व रेल्वे स्टेशन जवळील पोलीस चौक्या मोडकळीस आल्याने काही वर्षांपासून बंद होत्या. त्यामुळे पोलिसांसह…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक राज्यात धक्कादायक घटना घडत असतांना नुकतेच मध्यप्रदेशातून अशीच एक घटना उघडकीस आली आहे. पती पत्नीसह एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. घटनास्थळी मिळालेल्या चिठ्ठीवरुन या आत्महत्येचे धक्कादायक कारणही समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, सिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हुरावली भागात राहणारे जितेंद्र झा हे मजुरीचे काम करतात. जितेंद्र यांची पत्नी त्रिवेणी आणि मुलगा अचल झा त्यांच्यासोबत राहते. गेल्या दोन दिवसांपासून त्यांचे बंद होते. रविवारी (२८, जानेवारी) शेजारी राहणाऱ्या लोकांना…
अमरावती : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापूर्वी राज्यात गरम तव्यावर बसण्याचा दावा करणारा गुरुदास बाबा ऊर्फ सुनील कावलकर मोठ्या चर्चेत आले होते पण सध्या ते अडचणीत आले आहे. एका महिलेच्या असह्यतेचा त्याने फायदा घेतल्याचं समोर आलं आहे. महिलेला आश्रमात बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याचा या बाबावर आरोप आहे. या बाबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरण उजेडात आल्यानंतर तवावाला बाबा गायब झाला आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहे. दरम्यान, या प्रकरणाने अमरावतीत एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील मार्डीच्या आश्रमातील गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकरवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील जबलपूरमधील महिला भाविकेचे शोषण करून व्हिडिओ…
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था अहमदनगर – छत्रपती संभाजी नगर महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरने दोन दुचाकींना पाठीमागून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की दुचाकीवरील एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांचा समावेश आहे. ही घटना पांढरी पूल परिसरात रविवारी २८ जानेवारी सायंकाळच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह अनिल बाळासाहेब पवार (वय २८), सोनाली अनिल पवार (वय २२), माऊली अनिल पवार (वय ११) अशी मृतांची नावे आहेत. तर दुसऱ्या दुचाकीवरील भगवान आव्हाड हे जखमी झाले आहेत. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. नागरिकांचा रोष पाहताच…

