नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात महागाई वाढत असतांना आज देशाचा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मांडला. यावेळी निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पातील पहिली मोठी घोषणा केली आहे. नागरिकांच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम मोदी सरकार सुरुच ठेवणार आहे. येत्या पाच वर्षात आणखी २ कोटी घरे निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत म्हटलं की, देशाची अर्थव्यवस्था योग्य दिशेने चालली आहे. सरकारचे लक्ष्य पारदर्शक कारभारावर आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पुढील 5 वर्षांत ग्रामीण भागात आणखी दोन कोटी घरे बांधली जातील. सोबतच 300 युनिट मोफत वीज देण्याचे उद्दिष्ट आहे. सर्वांगीण विकासावर आमचा भर…
Author: editor desk
रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील सावखेडा येथून जवळच असलेल्या चिचाटी – गौरखेडा शिवारात सुकी नदीपात्रात चिंचाटी येथील रसूल रशीद तडवी (वय ३७) या तरुणाचा मृतदेह २८ रोजी आढळून आला आहे. मयताचे वडील रशीद तुकडू तडवी यांनी सावदा पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मयताचे शवविच्छेदन रावेर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस करत आहेत. मयत रसूल रशीद तडवी हे शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. घरातील कर्ता पुरुष गेल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत रसूल तडवी यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, २ मुली, मुलगा, भाऊ असा…
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील जालना रोडवर सिडको एन 3 भागात एक गॅसचा टँकर दुभाजकाला धडकला. त्यानंतर टँकरमधून गॅसगळती होत आहे. याचा फटका वाहतूकीवर झालेला दिसतोय. जालना रोडवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प करण्यात आली असून पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे. तसेच, सिडको परिसरातील नागरिकांना घरातील गॅस न पेटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जालना रोडवरील वसंतराव नाईक कॉलेजसमोर गुरुवारी पहाटे एचपी गॅसचा टँकर उलटून गॅस गळती होत असल्याची घटना घडली. घटनास्थळी सहा पेक्षा अधिक अग्निशमन दलाचे बंब व पाण्याचेही टँकर दाखल होऊन पाण्याचा मारा सुरू आहे.…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेते आ.रोहित पवार यांची ईडी चौकशी सुरु होती ती चौकशी आज पुन्हा होणार आहे. ईडी चौकशीविरोधात शरद पवार गट चांगलाच आक्रमक झाला आहे. चौकशीचा निषेध म्हणून आज प्रदेश कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीचे नेते तसेच पदाधिकारी उपोषण करणार आहेत. तर उर्वरित महाराष्ट्रात राष्ट्रवादी जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार कार्यालयांबाहेर घंटानाद आंदोलन करणार आहे. रोहित पवारांच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांतर्फे ‘वारसा विचारांचा, मार्ग संघर्षाचा’, लडेंगे और जितेंगे अशा आशयाचे बॅनर लावत रोहित पवारांना बळ देण्यात येत आहे.
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यात लाच लुचपत विभागाकडून अनेक लाचखोर अधिकारी व कर्मचारी यांच्यावर धडाकेबाज कारवाई करीत आहे,दि.३१ रोजी चोपडा तालुक्यातील देवगाव पारगाव ग्रामपंचायतीचे लाचखोर ग्रामसेवक हेमचंद्र दत्तात्रय सोनवणे (वय.३९) याला ५ हजार रुपये लाच घेताना जळगाव लाच लुचपत विभागाकडून रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. यातील तक्रारदार यांची पारगाव गावी येथे शेत असून त्यामध्ये वेअर हाऊस बांधण्याकरता ग्रामपंचायतची परवानगी मिळावी म्हणून तक्रारदार यांनी सुमारे दीड महिन्यापूर्वी अर्ज केला होता.त्याप्रमाणे यातील आलोसे ग्रामसेवक सोनवणे यांनी तक्रारदार (वय-३३) यांना वेअर हाऊस बांधकामाची परवानगी दिली व केलेल्या कामाचा मोबदला /बक्षीस म्हणून तक्रारदार यांचे कडे ७ हजार ५०० रुपयांची लाचेची मागणी केली.आज दि.३१/०१/२०२४ रोजी पंचा…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरात इमारतीला रंगकाम (पेटिंग) करत असताना पहिल्या मजल्यावरून तोल जाऊन खाली पडल्याने अजय राजकुमार यादव (२४, मूळ रा. प्रतापगड उत्तर प्रदेश, ह.मु. रामेश्वर कॉलनी, जळगाव) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवार, ३१ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मिळालेल्या महितिन्सुअर, अजय यादव हा तरुण अन्य दोन मित्रांसह गेल्या सहा महिन्यांपासून रामेश्वर कॉलनीत वास्तव्याला होता. तीनही मित्र इमारतीला रंगकाम करायचे बुधवार रोजी रोजी वाटिकाश्रम परिसरात एका इमारतीचे रंगकाम करण्यासाठी अजय यादव हा भिंतीवर उभा होता. पहिल्या मजल्यावरून त्याचा अचानक तोल गेल्याने तो खाली पडला व त्याच्या डोक्याला जबर मार…
भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील साकेगाव येथील रहिवासी व रेल्वे इंजिनिअरिंग विभागातील कर्मचारी धनराज भरत पवार (३६) यांचा मंगळवारी रात्री भुसावळ ते भादली दरम्यान अप रेल्वे लाईनवर रेल्वे अपघातात मृत्यू झाला. सुरुवातीस बराच वेळेपर्यंत ओळख पटली नव्हती मात्र नशिराबाद पोलिसांनी तपास केला असता बुधवारी ओळख पटली. मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी नशिराबाद पोलिस ठाण्याचे रामेश्वर मोताळे यांनी भेट दिली होती. धनराज पवार हे रेल्वे कर्मचारी सोबतच क्रिकेट खेळाडू सुद्धा होते दोस्ती क्रिकेट क्लबचे ते कर्णधार होते त्यांच्या निधनाने साकेगावात शोककळा पसरली. बुधवारी ३१ रोजी दुपारी अडीच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. धनराज यांच्या पश्चात आई-वडील मुलगा, मुलगी, सैन्य दलात असलेल भाऊ तसेच वहिनी असा…
नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना नाशिक जिल्हा देखील गुन्हेगारीच्या विळख्यात अडकत आहे. नुकतीच एक धक्कादायक घटना नाशिक शहरात घडली आहे. पत्नीने संपत्तीसाठी आपल्या पतीलाच जीवे मारण्याचा कट रचलाय. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या बोरगड परिसरात अर्धांगिनीच आपल्या पतीच्या जीवावर उठली. संपत्ती हडपण्यासाठी पत्नीने आपल्या दोन साथीदारांची मदत घेतली. यावेळी तिने सुरूवातीला पतीला मारण्याचा प्लान आखला. ठरलेल्या प्लान प्रमाणे तिने दोन साथिदारांना घराजवळ बोलावले. त्यानंर तिने आपल्या पतीला भरपूर बियर पाजली. पतीला नशा चढल्यानंतर पत्नीने पतीचा गळा आवळला. गळा आवळून पतीचा मृत्यू होत नसल्याने पत्नीने क्रूरतेने पतीच्या अंगावर साप सोडला आणि पतीला सर्पदंशही दिला. सुदैवानं पतीचा जीव या…
मुंबई : वृत्तसंस्था देशातील काही राज्यात राज्यसभेची निवडणूक जाहीर होताच आता सर्वच पक्षाच्या वतीने हालचाली देखील वाढल्या आहेत. महायुतीने तशा दृष्टीने तयारी देखील सुरू केली आहे. तर 5 जागा कोणत्याही परिस्थितीत निवडून आणण्यासाठीचा निर्धार महायुतीने केला आहे. निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा जागा रिक्त होत आहेत. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवार गटाने मोर्चे बांधणी देखील सुरू केली आहे. भाजपने तर त्यांच्या तीन उमेदवारांची चाचपणी देखील सुरू केली असल्याची माहिती सुत्रांकडून दिली जात आहे. यामध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचे नाव आघाडीवर आहे. विनोद तावडेंसोबतच भाजप नेत्या पंकजा मुंडे…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील बस स्थानकाच्या आगारात दि.२९ जानेवारी रोजी बसची तपासणी करण्यात यावी या कारणावरुन तीन बसचालकांमध्ये वाद होऊन एका जणाने दोन चालकांच्या डोक्यात दगड मारला. या प्रकरणी शुभम संजय सूर्यवंशी या चालकाविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाहेर गावाहून बस आल्यानंतर तिची तपासणी करण्यासाठी ती आगारात नेण्यात येते. त्यानुसार सोमवार दि. २९ रोजी देखील काही बस तपासणीसाठी आगारात नेण्यात आल्या होत्या. त्या वेळी आपल्या बसची अगोदर तपासणी होऊन ‘रिमार्क’ मिळावा, यावरून चालक योगेश धर्मराज माळी (वय ४३, रा. पाळधी) व शुभम सूर्यवंशी यांच्यात वाद झाला. त्या वेळी तेथे योगेश माळी यांचे भाऊ…

