Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दुचाकीने अवैधरित्या पानमसाला वाहतूक : एकावर गुन्हा दाखल
    क्राईम

    दुचाकीने अवैधरित्या पानमसाला वाहतूक : एकावर गुन्हा दाखल

    editor deskBy editor deskJanuary 31, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    राजकमल टॉकीजजवळ किराणा दुकानासमोरून दुचाकीने अवैधरित्या सुगंधित पानमसाला आणि तंबाखूची वाहतूक करणाऱ्या राजेश गुरुमुखदास रामचंदानी (४७, रा. सिंधी कॉलनी) याच्यावर मंगळवार, ३० जानेवारी रोजी दुपारी शनिपेठ पोलिसांनी कारवाई केली.
    कारवाईत २६ हजार ६२० रुपयांचा सुगंधित पानमसाला व तंबाखू तसेच २० हजार रुपयांची दुचाकी मिळून ४६ हजार ६२० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. शनिपेठ पोलिसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  राजकमल टॉकीजजवळ एक जण सुगंधित पानमसाला आणि तंबाखू घेऊन जात असल्याची माहिती शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. त्यांच्यासह पोउनि योगेश टिकले, पोकॉ गिरीश पाटील, अश्विन हडपे, राहुल घेटे मुकुंद गंगावणे यांच्यासह अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्नसुरक्षा अधिकारी शरद पवार हे राजकमल टॉकीज परिसरात पोहचले. तेथे राजेश रामचंदानी हा दुचाकीवरुन (एमएच १९, एडब्ल्यू ८०४७) सुगंधित पानमसाला आणि तंबाखू घेवून जात असल्याचे आढळून आले.

    या पथकाने त्याच्याजवळ असलेला २६ हजार ६२० रुपये किमतीचा सुगंधित पान मसाला व तंबाखू आणि २० हजार रुपये किमतीची दुचाकी असा ४६ हजार ६२० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. सुगंधित पानमसाला आणि तंबाखू अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ताब्यात देण्यात आली. याप्रकरणी अन्नसुरक्षा अधिकारी शरद पवार यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून राजेश रामचंदानी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोकों योगेश माळी करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कुटुंब लग्नासाठी बाहेर, चोरट्यांनी साधला डाव; धरणगावात मोठी घरफोडी

    March 9, 2026

    बोर्ड परीक्षेत कॉपीचा मोठा भंडाफोड; सीसीटीव्हीमुळे 81 जणांवर कारवाई

    March 9, 2026

    जळगाव पोलीस कर्मचाऱ्याने चाळीसगावात संपविले आयुष्य !

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.