भुसावळ : प्रतिनिधी शहरातील एका परिसरात २५ वर्षीय महिलेचा एकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून याप्रकरणी एका विरोधात भुसावळ बाजार पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एका परिसरात २५ वर्षीय महिला वास्तव्यास असून सप्टेबर २०२३ मध्ये महिलेच्या आईला रुग्णालयात दाखल केले असतांना संशयित आरोपीने महिलेला भुसावळ येथील त्याच्या मालकीच्या घरी नेत तुला मी घर खर्चासाठी, कपडे घेण्यासाठी, मुलाला चांगले शाळेत शिकविण्याचे आमिष देत वेळोवेळी २५ वर्षीय महिलेवर अत्याचार केला, याप्रकरणी महिलेने दि.२८ जानेवारी २०२४ रोजी भुसावळ बाजार पेठ पोलिसात धाव घेत संशयित आरोपी विरोधात अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास…
Author: editor desk
पुणे : वृत्तसंस्था जिल्ह्यातील पिंपरी येथे प्रियकराने अभियंता प्रेयसीला लॉजवर नेऊन गोळ्या झाडल्या. यात तरुणीचा मृत्यू झाला. हिंजवडी येथील लक्ष्मी चौकातील मारुंजी रस्त्यावरील हॉटेल एलिगंट ओयो टाउन हाउसमध्ये रविवारी (दि. २८) सकाळी आठ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. वंदना के. द्विवेदी (२६, सध्या रा. हिंजवडी, मूळ रा. लखनौ, उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. ऋषभ राजेश निगम (रा. लखनौ, उत्तर प्रदेश) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ऋषभ निगम आणि वंदना यांचे घर लखनौ येथे एकाच परिसरात आहे. त्यामुळे त्यांची जुनी ओळख असून, काही वर्षापासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. सॉफ्टवेअर अभियंता असलेली वंदना ही २०२२ मध्ये…
पुणे : वृत्तसंस्था राजकीय पार्श्वभूमी असलेल्या ३५ वर्षीय व्यक्तीने अभिनेत्री तरुणीवर बलात्कार करून तिच्या डोक्याला पिस्टल लावून धमकावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विमानतळ पोलिस ठाण्यात विराज रविकांत पाटील (३५, रा. रॉयल पाल्म, सोरेगाव, सोलापूर) याच्यावर बलात्कारासह आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडितेने (३२) शुक्रवारी फिर्याद दिली आहे. हा प्रकार २७ ऑगस्ट २०२३ ते २० जानेवारी २०२४ या कालावधीत विमाननगर व मुळशी येथील रिसॉर्टमध्ये घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विराज पाटील हा राजकीय पार्श्वभूमी असलेली व्यक्ती आहे. तर पीडिता अभिनेत्री आहे. आरोपी आणि फिर्यादी यांची ओळख सोशल मीडियावर झाली. आरोपी विराज पाटील याने पत्नीसोबत घटस्फोट घेऊन तुझ्यासोबत…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था आपण कुठल्याही हॉटेलमध्ये कुटुंबासह, मित्रासोबत जेवण्यासाठी जातो, तेव्हा जेवण झाल्यानंतर प्रथम वेटरकडे बिल मागतो. समजा तुमचे बिल २३६० रुपये झाले, तर तुम्ही वेटरला २५०० रुपये देता आणि तो कांऊटरवरून १४० रुपये परत आणून देतो. त्यानंतर वेटरला ती शिल्लक राहिलेली रक्कम टीप म्हणून देतात. तुम्हाला वेटरची सर्व्हिस चांगली वाटली याची ती पोच पावती असते आणि तुमच्याकडून ती वेटरला टीप म्हणून दिली जाते. टीप देण्याची एक मर्यादा असते, मात्र कोणी जर २० लाख रुपये टीप म्हणून दिले तर… ऐकायला विचित्र किंवा अविश्वसनीय वाटत असले तरी ही सत्य घटना आहे. दुबईच्या साल्ट बे हॉटेलमध्ये हा किस्सा घडला आहे. तेथे…
भुसावळ : प्रतिनिधी वरणगाव पोलिस ठाणे हद्दीत असलेल्या करंजी गावात दहशत निर्माण करण्याच्या ईराद्याने अवैध लोखंडी तलवार बाळगणाऱ्या सरपंचासह एकास अटक केल्याची घटना शनिवार रोजी दुपारी घडल्याने वरणगाव पोलिसात भारतीय हत्यार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोदवड तालुक्यातील करंजी गावी गणेश सुरेश पाटील (वय २६) व सरपंच नंदुलाल पंढरी पाटील (वय २५) यांनी तलवार कुंटीमध्ये लपवून ठेवल्याची गोपणीय माहीती पोलिसांना मिळाली होती. सहाय्यक पोलिस निरिक्षक भरत चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली उप पोलिस निरीक्षक परशुराम दळवी, पोहे कॉ प्रशात ठाकूर, प्रमोद कंखरे आदी पोलिसांनी करंजी गावी जाऊन गणेश पाटील यांचे जणावरांच्या वाडयात पोलिसांनी पाहणी केली असता. लोखंडी तलवार मिळून…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील वावडदा गावाजवळ दि.२६ जानेवारी रोजी विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव कारने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिल्यामुळे कारमधील धनराज नारायण पाटील (६२, रा. मुक्ताईनगर) व त्यांच्या पत्नी संगीता पाटील हे दाम्पत्य जखमी झाले. याप्रकरणी धडक देणाऱ्या कारचालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धनराज पाटील हे पत्नीसोबत कारने (क्र. एमएच १९, सीयू ११६७) जळगावकडून पाचोऱ्याकडे जात होते. यावेळी पाचोऱ्याकडून वावडदाकडे विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारने (क्र. एमएच १४ ईयू ९४४४) जोरदार धडक दिली. यामध्ये कारमधील दाम्पत्य जखमी झाले. याप्रकरणी धनराज पाटील यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून धडक देणाऱ्या कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…
भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील साकेगाव येथे बसस्टॅन्ड चौकात महामार्गाखाली असलेल्या ३.५ मीटर उंचीच्या बोगद्यात कापसाने भरलेले एक छोटा ट्रक अडकला. हा ट्रक बोगद्यात शिरल्यावर मागील भाग बोगद्यात अडकला. यामुळे हा दोन पायावरील घोड्याप्रमाणे उभा झाला. हा विचित्र प्रकार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, साकेगाव बसस्थानक चौकात असलेल्या महामार्गाखालील उड्डाणपुलाची फक्त साडेतीन मीटर उंची ठेवण्यात आल्यामुळे अंडरपास मधून वाहने अडकतात हे नित्याचेच प्रकार झाले आहेत. रविवारी २८ रोजी संध्याकाळी पाच वाजता साकेगाव येथील हेमंत वाघ या शेतकऱ्याचा कापूस जळगावकडे ट्रकने नेला जात असताना महामार्ग खालील बोगद्यात शिरल्यावर कापसाने भरलेला मागील भाग हा बोगद्याच्या सुरुवातीलाच अडकला. यामुळे पाहणाऱ्यांची गर्दी…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एकलग्न येथील ७५ वर्षीय वृद्ध चिंतामण किसन जोगी हे मुलाच्या घरी जात असताना वाटेतच एका झाडाला गळफास घेतला. मात्र, हा प्रकार याच रस्त्याने जाणाऱ्या काही लोकांच्या लक्षात आल्याने त्यांनी जोगी यांना खाली उतरवले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. वृद्धावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, एकलग्न येथील चिंतामण किसन जोगी हे शनिवार, २७ जानेवारी रोजी पारोळा तालुक्यातील तरवाडे येथे लहान मुलाकडेजाण्यासाठी घरून निघाले होते. पोहोचण्यापूर्वीच त्यांनी वाटेत एका झाडाला गळफास घेतला. त्याच वेळी या रस्त्याने त्यांचे काही नातेवाईक जात होते. त्यावेळी त्यांना जोगी यांनी गळफास घेतल्याचे दिसले. त्यांनी तातडीने त्यांना खाली उतरवले व…
पाटणा : वृत्तसंस्था देशात आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच बिहार राज्यात राजकीय भूकंप झाला असून नितीश कुमार यांनी 9व्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. तत्पूर्वी, नितीश कुमार यांनी सकाळी 11 वाजता राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला. नितीश यांनी भाजपच्या पाठिंब्याचे पत्र देऊन सरकार स्थापनेची चर्चा केली. तत्पूर्वी, नितीश यांच्या पक्षाच्या खासदार आणि आमदारांची सीएम हाऊसमध्ये बैठक झाली. येथे नितीश यांनी राजीनाम्याची घोषणा केली. मिळालेल्या माहितीनुसार, त्याचबरोबर भाजपने सम्राट चौधरी यांना विधिमंडळ पक्षनेते आणि विजय सिन्हा यांची उपनेतेपदी निवड केली आहे. या दोघांना उपमुख्यमंत्री केले जात आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा दुपारी पाटणा येथे…
जळगाव : प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी जळगाव जिह्यात पोलीस विभागात काही अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत प्रशासकीय पदस्थापना व बदल्या करण्यात आल्या आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण १५ अधिकारी बाहेरील जिल्ह्यातून जळगाव जिल्ह्यात येत असल्याचे आदेश निघाले आहे. यात अहमदनगर येथून पोनि.मधुकर साळवे यांची प्रभारी चोपडा शहर पोलीस स्थानकाला तर नाशिक ग्रामीण येथील पोनि.विकास देवरे अमळनेर पोलीस स्थानकाला, पोनि.सुनील पाटील भडगाव पोलीस स्थानकाला, पोनि.संदीप रणदिवे रामानंदनगर पोलीस स्थानकाला, भुसावळ बाजार पेठचे पोनि.बबन आव्हाड यांची प्रभारी एमआयडीसी पोलीस स्थानकाला, भुसावळ शहर पोलीस स्थानकाचे सपोनि. संतोष चव्हाण प्रभारी अडावद पोलीस स्थानकाला, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि.निलेश राजपूत यांची प्रभारी कासोदा पोलीस स्थानकाला, नाशिक ग्रामीण येथून सपोनि.प्रकाश काळे…

