सानेगुरूजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालय,अमळनेर (जि. जळगाव) : प्रतिनिधी शंखनाद, टाळमृदंग अन् ढोलताश्यांच्या गजरात ग्रंथांचे पूजन करून 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीस महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे व जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. रविंद्र शोभणे, संमेलनाध्यक्ष तथा राज्याचे ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, निमंत्रक तथा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, अमळनेरच्या मराठी वाड्:मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, माजी आमदार स्मिता वाघ यांच्या सह मराठी साहित्य महामंडळ व मराठी वाड्:मय मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत श्रीसंत सद्गुरू सखाराम महाराज विठ्ठल संस्थान (वाडी संस्थान) येथून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. ग्रंथदिंडीच्या पालखीत दासबोध, श्री…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी अमळनेर येथील तालुका क्रीडा संकुल उर्वरित बांधकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज झाले. याप्रसंगी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार आदी उपस्थित होते. यावेळी विश्वकर्मा योजनेंतर्गत क्रीडा संकुलांचे बांधकाम करणाऱ्या विजय तुळशीराम भील, बापूजी नवल पाटील, विनोद जयराम धनगर, लखन उखा भिल, राजेंद्र भानुदास साळी पाच मजुरांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी केली केले. अमळनेर तालुका क्रीडा संकुल ४ हेक्टर २० आर मध्ये साकार…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील ३२ वर्षीय विवाहितेच्या पतीने गावात करारवर शेती केलेली होती, फारसे उत्पादन न आल्याने कर्जाचा डोंगर चढला. या विवचतेनून जागृती अरुण कोळी (वय ३२) यांनी विषारी द्रव्य प्राशन केल्याची घटना जळगाव तालुक्यातील डिकसाई येथे घडली असून या महिलेवर उपचार सुरु असतांना त्यांची गुरुवारी प्राणज्योत मालवली. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील डिकसाई येथे जागृती कोळी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होत्या. त्यांचे पती अरुण कोळी हे स्वतःजवळील शेतीसोबतच गावातील इतरांची शेती करारवर घेऊन करत होते. मात्र, यंदा पाऊस कमी झाल्यामुळे अरुण कोळी यांना उत्पन्न कमी झाले. त्यात…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पहूर कसबेतील रहिवासी रामदास बिंबाजी जाधव हे सकाळी साडेआठच्या दरम्यान शेतात दुचाकीने जात असताना छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गाच्या बाजूला असलेल्या नामलीला जिनिंगजवळ चार युवकांनी दुचाकी अडवली. गळ्यातील एक तोळा व बोटातील तीन ग्रॅम वजनाची अंगठी हिसकावून पोबारा केला आहे. दिवसा घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता रामदास बिंबाजी जाधव हे छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पेट्रोल पंपावरून दुचाकीत पेट्रोल भरून जळगाव महामार्गावर असलेल्या नामलिला जिनिंगजवळ असलेल्या शेताजवळ पोहोचले. यादरम्यान जळगावकडून एका दुचाकीवर दोन युवक व पहूरकडून एका दुचाकीवरून दोन युवक अशा चौघांनी जाधव यांना अडविले. त्यांच्यावर पांढरी पावडर टाकण्याचा प्रयत्न केला. गळ्यातील सोनसाखळी व…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरात घरात कोणीच नसतांना भूषण प्रभाकर माळी (वय २८) या तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण स्पष्ट नाही. रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्यंकटेश नगरात भूषण माळी हा तरुण कुटुंबीयांसह वास्तव्यास होता. एका खासगी कंपनीत काम करुन तो कुटुंबाला हातभार लावित होता. गुरुवारी सकाळी घरात कोणीही नसतांना भूषण याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. कुटुंबीयांनी भूषणला खाली उतरवून तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी करीत मयत घोषीत केले. त्याच्या पश्चात आई, मोठा भाऊ, वहिनी असा…
जळगाव : प्रतिनिधी नशिराबाद येथील १७ वर्षीय मुलीने गुरुवारी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तंजीला बी. शेख अन्सार (वय १७) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तंजीला आपल्या आई, वडील व लहान बहिणीसोबत नशिराबाद येथील मणियार मोहल्ल्यात राहत होती. वडील शेख अन्सार शेख शकील हे हातमजुरीचा व्यवसाय करतात. तर आई गृहिणी आहे. गुरुवारी दुपारी वडील हे कामानिमित्त घराबाहेर गेले. होते. तर आई दुपारी २ वाजेच्या सुमारास लहान बहिणीला घेऊन, गावातच राहत असलेल्या भावाकडे (मुलीच्या मामाकडे) गेली होती. घरात…
जळगाव : प्रतिनिधी सुरत रेल्वे गेटपुढील मालधक्क्यावर माल उतरविल्यानंतर रेल्वेच्या बोगीवर राहिलेली चप्पल घेण्यासाठी गेलेल्या हमालाचा हाय व्होल्टेज तारांना स्पर्श झाल्याने मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी ३:३० वाजता ही दुर्घटना घडली. रेल्वे पोलिसांकडे नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी १२:३० वाजता रेल्वेच्या मालधक्क्यावर संतोष रामू कुमार (वय ४५) हा मजूर खतांचा माल उतरविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वेच्या बोगीवर चप्पल राहिल्याचे लक्षात आल्याने संतोष कुमार बोगीवर चढले. मात्र, उतरत असताना त्यांचा रेल्वेच्या हाय व्होल्टेज तारेला स्पर्श होऊन जागेवरच मृत्यू झाला. रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला.
जळगाव : प्रतिनिधी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतर्फे जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात दि.१ फेब्रुवारी रोजी रास्ता रोको करीत आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे कि, महाराष्ट्रात सर्व सामान्य नागरिकांचे हिताचे मुद्दे घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष आमदार श्री जयंत पाटील साहेब व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवा नेते आमदार रोहित दादा पवार हे सतत लढत असल्याने आंदोलनाच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्नांवर आवाज उठवून झोपेचे सोंग घेण्याच्या केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्य हे ईडी कार्यवाही व धाक दाखवून विरोधी पक्षाच्या नेत्यांचे खच्चीकरण करून या विरोधात आकाशवाणी चौक येथे राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांकडून रस्ता रोको करण्यात आला यावेळेस सरकार हमसे…
जळगाव : प्रतिनिधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला कर्जमाफीची ऑफर देऊन कर्जदारांना भुरळ घालणाऱ्या व दिशाभूल करणाऱ्या जाहिराती निदर्शनास आल्या आहेत. त्यामुळे अशा कुठल्याही जाहिराती, संदेशावर विश्वास ठेवू नका, यापासून सावध रहा, असे आवाहन आरबीआयने केले आहे. प्रसिद्धिपत्रकात म्हटले की, कर्जमाफी संदर्भात काही संस्था समाजमाध्यमाच्या प्लॅटफॉर्मवर (फेसबुक, इन्स्टाग्राम, यू-ट्यूब चॅनल आणि बनावट वेबसाइट) यावर अनेक मोहिमांचे सक्रियपणे प्रचार करीत असल्याचे दिसून आले आहे. अशा संस्थांना कोणत्याही अधिकाराशिवाय कर्जमाफी प्रमाणपत्रे जारी करण्यासाठी सेवा शुल्क आकारत असल्याच्या बातम्या आहेत. ज्यामुळे बँकांना आकारल्या जाणाऱ्या मालमत्ता तारणावर त्यांचे अधिकार लागू करण्यासाठी बँकांच्या कामकाजात अडथळा येतो. बँकांसह इतर वित्तीय संस्थांची थकबाकी भरण्याची गरज नाही, असा चुकीचा…
धरणगाव : प्रतिनिधी राज्यातील शरद पवार गटाचे आ.रोहित पवार यांच्यावर गेल्या काही दिवसापासून ईडीची चौकशी सुरु असल्याने राज्यातील राष्ट्रवादीतर्फे या घटनेचा निषेध म्हणून राज्यभर आंदोलन करीत आहे. याचाच एक भाग म्हणून धरणगाव शहरात देखील तहसीलदार यांना निवेदन देवून निषेध करण्यात आला. हे निवेदन तालुकाध्यक्ष धनराज माळी यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. निवेदनात म्हंटले आहे कि, राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व आ.रोहीत पवार हे सतत अन्यायाविरूध्द लढत असल्याने आंदोलनाच्या माध्यमातून नागरीकांच्या प्रश्नावर सतत आवाज उठवून झोपेचे सोंग घेणा-या केंद्रसरकार व महाराष्ट्र राज्य हे ई. डी. ची कार्यवाही व धाक दाखवून विरोधी पक्ष नेत्यांचे खच्चीकरण करीत आहेत. असे करणे त्वरीत थांबवावे. तसेच…

