मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरु होते. याच मराठा बांधवांसाठी आज ऐतिहासिक दिवस आहे. मराठा समाजासाठीच्या आरक्षण विधेयकाला विधानसभेत एकमताने मंजुरी मिळाली आहे. मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १०-१० आरक्षणाला मंजुरी देण्यात आलं आहे. मराठा आरक्षणासाठी सरकारनं राज्य विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावलं होतं. विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत हे विधेयक मांडलं. आवाजी मतदानाने या विधेयकाला मंजुरी देण्यात आली. राज्य सरकारने आज, मंगळवारी बोलावलेल्या राज्य विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षणाची तरतूद असणारे…
Author: editor desk
धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव येथील मातोश्रीनगर येथे सावित्रीबाई फुले या उद्यानामुळे परिसरातील नागरिकांना चांगले आरोग्य व मन: शांतीसाठी हे उद्यान उपयोगी पडेल तसेच या उद्यानामुळे निसर्ग सौंदर्यात भर पडली असून सर्वांनी याचा काळजी पूर्वक वापर करावा. मातोश्री नगर मध्ये होत असलेल्या सर्वसमावेशक कार्याचे कौतुक केले. आयुष्यात जीवन सुकर होण्यासाठी अशीच एकजूट कायम ठेवां. माजी नगरसेवक अभिजीत पाटील यांनी हमालवाडा परिसरात कोणत्याही निधीची वाट न पाहता स्वखर्चाने येथील नागरिकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात केलेल्या पाण्याची व्यवस्था या उपक्रमाचे पालकमंत्री यांनी कौतुक केले. या भागातील उद्यान सुशोभीकरण व काँक्रीटीकारणासाठी ३० लाखाचा निधी उपलब्ध करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. धरणगाव येथील मातोश्री…
जळगाव : प्रतिनिधी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. त्यांचे नुसते नाव विचारले तरी स्फुलिंग जागृत होते. त्यांचा इतिहास आपल्या सर्वांच्या अंगावर रोमांच उभा करणारा आहे. छत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या विचारांचा व कार्याचा आदर्श प्रत्येकाने कृतीत उतरण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केले. ते जळके येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. सुरुवातीला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून शिवप्रेमी सोबत आरती करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी – जय शिवाजीच्या घोषणा देण्यात आल्या. बसस्थानक परिसरात भगवे झेंडे, कमानी व बॅनर मुळे वातावरण…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था लडाखमध्ये असलेल्या कारगिलमध्ये रात्री ९.३५ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ५.२ इतकी होती. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे जीवित व वित्तहानी झाल्याचे अद्याप कोणतेच वृत्त नाही. परंतु भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यापूर्वी १६ फेब्रुवारीलाही जम्मू-काश्मीरच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. शुक्रवारी श्रीनगर आणि गुलमर्गमध्ये ३.९ तीव्रतेचे धक्के जाणवले होते. जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये संध्याकाळी साडेसातच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. या काळात भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.४ मोजण्यात आली होती. भूकंपाची खोली ५ किमी होती. या भूकंपामुळे कोणतेच नुकसान झाले नाही. भूकंपाच्या दृष्टीकोनातून जम्मू-काश्मीर अत्यंत संवेदनशील मानले जाते, अशी माहिती सिस्मोलॉजी डिपार्टमेंटने दिलीय.
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज राज्य सरकारचं विशेष आज पार पडत आहेत. राज्य मागासवर्ग आयोगाने सादर केलेल्या अहवालावर आज विधीमंडळात त्यावर चर्चा होणार आहे. मराठा आरक्षणाबाबत आज मोठा निर्णय घेतला जाणार आहे. त्याआधी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधून मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळावं अशी मागणी केली. मराठा समाजाला आरक्षण देताना सगेसोयरे मुद्दा महत्त्वाचा आहे. सगेसोयरेंबाबत आधी अंमलबजावणी करावी, त्यासंबंधीचा कायदा तयार करावा. विशेष अधिवेशनात सगेसोयऱ्यांबाबत चर्चा झाली नाहीतर पुढे भयंकर असे मराठा आंदोलन उभं राहील. आंदोलन पाहून पश्चाताप काय असतो हे सरकारले कळेल, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. ज्या मराठ्यांच्या…
जळगाव : प्रतिनिधी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी एका संशयितास जिल्हा पेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र या पोस्टमुळे सोमवार, १९ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास शाहूनगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यामुळे परिस्थिती वेळीच नियंत्रणात आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, शहर व जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल व अनिल भवारी व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांना शांततेसह अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. घटनेची माहिती…
यावल : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागात आज देखील वाळू चोरी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. अवैध वाळू वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील चिखली खुर्द गावाजवळच्या एका शेतात अवैध वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याची घटना घडली. या संदर्भात यावल पोलिस स्थानकात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, चिखली खुर्द येथील शेताजवळ यावल तालुक्यातील टाकरखेडा येथील विनोद राजू कोळी (वय ३६) हा अवैध वाळू विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून वाहून नेत होता. दरम्यान, अचानक ट्रॉली उलटली. यात ट्रॉलीमध्ये बसलेला विष्णू तिलकचंद सोनवणे (४१, रा. भालशिव, ता. यावल) हा…
मुक्ताईनगर : प्रतिनिधी तालुक्यातील पिंप्राळा शिवारातील धुपेश्वरनजीक पूर्णा नदी पात्रात एका अनोळखी इसमाचा मृतदेह सोमवारी आढळला, सकाळी नऊच्या सुमारास एका पुरुषाचे प्रेत नदीपात्रात तरंगत असल्याचे शेतकऱ्यास दिसल्याने परिसरात मोठी खळबळ माजली होती. त्याने याची माहिती पिंप्राळा येथील पोलिस पाटील महादेव झाल्टे यांना दिली. त्यांनी पोलिस दूर क्षेत्रास खबर दिल्यावरून पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह नदीतून बाहेर काढला. घटनास्थळी शवविच्छेदन करून जागीच अंत्यसंस्कार केले. मयताची ओळख पटली नसून, ५ फूट उंची, वय ४५ ते ५०च्या आसपास आणि अंगात काळ्या रंगाचे स्वेटर, राखाडी रंगाचा शर्ट व काळी पँट असे वर्णन आहे. ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप दूनगहू…
भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील यावल शहराजवळ चोपडा रस्त्यावर ट्रकवर ताडपत्रीचा दोर बांधताना तोल जाऊन पडल्याने चालक जागीच ठार झाला. ही दुर्घटना रविवारी रात्री नऊ वाजता घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. मयत चालकाचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला, मयताचे नाव संतोष रामसिंग भूरिया असे आहे. तो मध्य प्रदेशातील इंदूर येथील रहिवासी आहे. त्याच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे. यावल शहराबाहेर चोपडा रस्त्यावर महाजन पेट्रोल पंपाजवळ संतोष हा ट्रकवरील ताडपत्रीला दोर बांधत असताना त्याचा तोल गेला. रस्त्यावर कोसळून त्याच्या डोक्याला जबर दुखापत होऊन तो जागीच ठार झाला. या दुर्घटनेची माहिती आरडाओरड करून ट्रक वरील क्लीनर उपेंद्र राजकुमार…
जालना : वृत्तसंस्था उद्या मराठा आरक्षणासाठी एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर केला जाणार आहे. उद्या मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर झाल्यास मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळेल. याच पार्श्वभूमीवर आज पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी महत्वाचे विधान केले आहे. “ओबीसी समाजला धक्का न लागता मराठा आरक्षण मिळेल. मराठा आरक्षणाने ओबीस आरक्षणाला धक्का लागण्याचा प्रश्नच येत नाही. उद्या जो कायदा होणार आहे त्याचं कौतुक, आनंद होणारच आहे. मात्र सरकारला सगे सोयऱ्यांबाबत भूमिका मांडावीच लागेल, फक्त अधिसुचना काढून चालणार नाही, त्याची अंमलबजावणी करावी लागेल,” असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. “उद्या अधिवेशनात मराठा…

