मालेगाव : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच मनमाड-मालेगाव मार्गावर चोंडी घाटाजवळ एका अवघड वळणावर भरधाव बसने ट्रॅक्टरला मागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कांदे घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला बसने पाठीमागून धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रॅक्टर चालक जागीच ठार तर बस मधील ७ ते ८ प्रवाशी जखमी झाले आहे. आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान या अपघातामुळे काही काळ रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. जखमींना मालेगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.