भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील भडगाव पेठ ते वाकदरम्यान दोन दुचाकींची धडक होऊन अपघात झाला. यात एक जण जागीच ठार, तर तीन जण जखमी झाले. जखमींवर धुळे येथे उपचार केले जात आहेत. बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, प्रताप मोतीलाल परदेशी (४७ वडजी) हे बुधवारी दुपारी आपल्या दुचाकीने भडगावहून घरी वडजीला जात असताना शिंदी (भडगाव) येथील संजय हरी वाघ (३२), पत्नी शीतल वाघ (२७) व मुलगा धीरज वाघ (५) हे भडगावकडे येत होते. भडगाव पेठ ते वाकदरम्यान रस्त्यावरील वळणावर या दोन दुचाकींचा अपघात झाला, या अपघातात प्रताप परदेशी हे जागीच ठार झाले, संजय वाघ व मुलगा धीरज…
Author: editor desk
रावेर : प्रतिनिधी रसलपूर रस्त्यावरील विनायक महाजन यांच्या घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून रोकड, मोबाइल, दुचाकी असा एकूण ५ लाख ८१ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी रावेर पोलिसात १६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फैजपूरच्या सहायक पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या नेतृत्वाखाली फौजदार सुनील पाटील, पोहेकों गणेश मनुरे, पोकों सुमीत बाविस्कर, हसन अली यांच्या पथकाने ही कारवाई केली. रसलपूर रस्त्यावर विनायक सुनील महाजन (रा. बक्षीपूर, ता. रावेर) याच्या घरात जुगार खेळला जात होता. बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पोलिस पथकाने धाड टाकली. त्यांच्याकडील जुगाराचे साहित्य, १७ हजार ९० रुपयांची रोकड, ५४ हजार…
मुंबई : वृत्तसंस्था मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटलांचे जोरदार उपोषण सुरु असतांना आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा बडे ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी गुरुवारी पुन्हा एकदा मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांवर हल्ला चढवला आहे. मनोज जरांगे हे मारुतीचे शेपूट आहे. ते शांत बसणार नाहीत. त्यांनी आता वयोवृद्ध नागरिकांनाही उपोषणाला बसण्याचे आवाहन केले आहे. यात वृद्धांच्या जिवाला काही बरेवाईट झाले तर थेट जरांगेंना जबाबदार धरले जावे, असे आवाहन भुजबळ यांनी पोलिसांना केले आहे. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्याला छगन भुजबळ यांनी कडाडून विरोध केला…
धरणगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र सुवर्ण नगरोत्थान योजनेअंतर्गत धरणगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या उभारणीसाठी शासनाकडून एक कोटी 34 लाख रुपयांचा निधी आज मंजूर केला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुरावामुळे हा निधी मंजूर झालेला आहे. धरणगाव शहरातील नगर परिषदेच्या हद्दीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा उभारणीसाठी चौथार्याच्या कामासाठी 94 लाख 36 हजार रुपये हे मंजूर झालेले आहे. तर धरणगाव शहरातील नगरपरिषदेच्या हद्दीमधील रेल्वे उड्डाणपूल लगत नगरपालिकेच्या जागेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी शासनाकडून चाळीस लाख तेहतीस हजार निधी मंजूर आज केला आहे. त्यामुळे धरणगाव शहरातील सौंदर्यकरणात भर पडणार असून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था नोएडातील बरौला गावात शिव मंदिराजवळ राहणाऱ्या एका महिलेने आपल्या दोन मुलींना चौथ्या मजल्यावरून फेकून दिले. यानंतर महिलेने स्वत:ही उडी मारून आत्महत्या केली. यात एका मुलीचा जागीच मृत्यू झाला तर महिला सरिता आणि तिची एक मुलगी गंभीर जखमी झाली. या दोघांवर प्रयाग हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. आता या महिलेचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. सविस्तर वृत्त असे कि, बरौला गावात तीन वर्षांपासून भाड्याच्या घरात राहणारी 32 वर्षीय सरिता ही महिला तिचा नवरा मनोज प्रयाग हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये काम करतो. सकाळी साडेनऊच्या सुमारास मनोज घरातून जेवण करून कॅन्टीनमध्ये गेला. अवघ्या 10 ते 20 मिनिटांनी शेजाऱ्यांनी मनोजला…
मुंबई : वृत्तसंस्था देशातील बदलत्या हवामानामुळे अनेक राज्यात उन्हाचा चटका वाढत असताना दुसरीकडे पुन्हा एकदा पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. पुढील 24 तासात राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. सध्या राज्यात कमाल तापमानाचा पारा 35 अंशांच्या पार गेल्याने उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. मात्र आता राज्यात पावसाची शक्यता असल्याने उन्हापासून काहीसा दिलासा मिळणार आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्यामुळे 25 आणि 26 फेब्रुवारीच्या जवळपास बंगालच्या उपसागरातून आग्नेय वारे महाराष्ट्रात आर्द्रता घेऊन येणार आहेत. त्यामुळे याचा परिणाम राज्याच्या हवामानावर होताना दिसणार आहे. विदर्भात पुन्हा पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 25 ते 27 फेब्रुवारीदरम्यान विदर्भात पावसाचा…
पाचोरा : प्रतिनिधी शहरातील हिवरा नदीपात्रात एका अनोळखी तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सारोळा रस्त्यावरील हिवरा नदी पात्रातून दुर्गंधी येत असल्याचे नदी पात्राशेजारील नागरिकांनी संशय व्यक्त केला होता. २१ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अंदाजे ३० ते ३५ वयातील तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे हे पथक व रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. घटनास्थळी पंचनामा करुन मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील रेल्वे स्टेशनच्या मागील बाजूला सार्वजनिक ठिकाणी अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांवर शहर पोलिसांच्या पथकाने बुधवार दि. २१ रोजी कारवाई केली. याठिकाणाहून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रेल्वे स्टेनशनच्या मागील बाजूला उड्डाणपुलाजवळ सार्वजनिक ठिकाणी काही तरुण आमली पदार्थांचे सेवन करीत असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना मिळाली. त्यांनी तात्काळ पथक तयार करुन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथक बुधवारी सायंकाळच्या सुमारास त्याठिकाणी गेले असता, पथकाला याठिकाणी काही तरुण गांजा सारखे आमली पदार्थांचे सेवन करतांना दिसून आले. पथकाने त्यांच्यावर छापा टाकीत कारवाई…
चाळीसगाव : प्रतिनिधी पोलिस दलास हादरा देणाऱ्या चाळीसगाव येथील रहिवासी व मुंबई पोलिस दलातील पोलिस शुभम आगोणे खून प्रकरणातील मुख्य आरोपी अण्णा उर्फ आनंदा चिंधा कोळी याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. कोळी याने जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर २१ रोजी न्यायमूर्ती मोहिते यांच्या न्यायालयात कामकाज चालले. यात आगोणे खून प्रकरणातील मुख्य आरोपी अण्णा उर्फ आनंदा चिंधा कोळी यांचा जामीन अर्ज न्यायालयाकडून नामंजूर करण्यात आला. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून पंढरीनाथ पवार यांनी बाजू मांडली, आरोपींकडून प्रकाश पाटील यांनी तर फिर्यादी पक्षाकडून कैलास आगोणे यांनी बाजू मांडली.
मेष आजचा दिवस तुमच्यासाठी खास असणार आहे. आज तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. आई-वडिलांसोबत तीर्थस्थळी जाण्याची शक्यता आहे. जे लोक टूर आणि ट्रॅव्हलिंग व्यवसाय करत आहेत त्यांना आज अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होईल. नवीन वाहन खरेदीसाठी तुम्ही तुमच्या जोडीदाराचा सल्ला घेऊ शकता. मुलांनी आज आपल्या कामात सावध राहण्याची गरज आहे. आज खरेदीसाठी घराबाहेर पडण्यापूर्वी वस्तूंची यादी तयार करा. आज तुमची सामाजिक कार्यात रुची वाढेल. आज तुमचे काम काळजीपूर्वक करा. वृषभ आजचा दिवस खूप छान असणार आहे. जे शिक्षक आहेत ते आज विद्यार्थ्यांना काहीतरी नवीन शिकवतील. घरात दूरचे नातेवाईक येण्याची शक्यता आहे. आजची संध्याकाळ कुटुंबासोबत घालवली जाईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मिठाईचा…

