Author: editor desk

पारोळा : प्रतिनिधी शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास कजगाव चौफुलीवर दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर धारदार हत्याराने वार करण्यात आले. यामध्ये दोघे जखमी झाले असून एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास कजगाव चौफुलीवर उभे असलेल्या रमेश महाजन (पारगल्ली, पारोळा) यांच्याकडे वंश काशिनाथ नरवाळे (रामदेवजी बाबानगर, पारोळा) याने काही कारण नसताना पैशांची मागणी केली. यावेळी त्यांनी त्यांच्या पुतण्या राकेश सुरेश महाजन व अनिल विठ्ठल महाजन यांना एक व्यक्ती पैसे मागत आहे व शिवीगाळ करत आहे, असे सांगत बोलावून घेतले. यावेळी यांच्यात शाब्दिक वाद होत वंश याने त्याच्या हातात असलेल्या धारदार हत्याराने राकेश आणि अनिल यांना…

Read More

जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पहूर येथील तरुण विद्यार्थ्याचा गावातील अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत असताना हृदयविकाराचा झटका आला. त्यात राहुल विजय चौधरी (३१) या तरुणाचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना शनिवारी दुपारी जामनेर तालुक्यातील पहूर कसबे येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल चौधरी हा बी.एस्सी.चे (कृषी) शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. शनिवारी दुपारी तो एकुलती रस्त्यावर असलेल्या अभ्यासिकेत अभ्यास करीत होता याचवेळी त्याच्या छातीत वेदना सुरू झाल्या. त्याला तातडीने खासगी डॉक्टरांकडे नेण्यात आले. त्यांनी जामनेर येथे नेण्याचा सल्ला दिला. परंतु जामनेर येथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. राहुल याची घरची परिस्थिती जेमतेम आहे. मोठा भाऊ सागर चौधरी हा जामनेर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी यावल येथे स्वावलंबन योजनेचा निधी मंजूर झाल्यानंतर त्यापोटी बक्षीस म्हणून एक लाख रुपये लाच मागितल्यानंतर लाच रक्कम स्वीकारल्याप्रकरणी चुंचाळे ग्रामपंचायतीचा ऑपरेटर सुधाकर धुडकू कोळी (35, चुंचाळे) यास जळगाव एसीबीने अटक केली तर चुंचाळे ग्रामसेवक हेमंत कमलाकर जोशी (चुंचाळे) हा फरार झाला आहे. हा सापळा शनिवार, 17 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास यशस्वी करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, चुंचाळे येथील 46 वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, चुंचाळे, ता.यावल गावी त्यांच्या वडिलांच्या नावाची संस्था असून त्यामध्ये 15 वित्त आयोगाच्या शिफारशीतून गावात शिलाई मशीन प्रशिक्षण देवून ग्रामीण भागातील महिला व युवतीना स्वावलंबी करण्यासाबाबत केंद्र शासनाकडून दोन लाख रुपये निधी मंजूर झाला होता. मंजूर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जळगाव जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त “जाणता राजा ” या महानाट्याचे आयोजन जळगाव जिल्ह्यातील शिवप्रेमी रसिकांसाठी करण्यात आलं असून छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पूर्वसंध्येपासून दिनांक 18, 19 आणि 20 फेब्रुवारी 2024 असे तीन दिवस दररोज सायं. 6.00 वा. जळगाव शहरातील पोलीस कवायत मैदानावर हे महानाट्य सादर होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम व शौर्य अनुभवण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील शिवप्रेमी नागरिकांनी हे नाट्य पाहायला यावे असे आवाहन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. या महानाट्याच्या आयोजनातून छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि जीवन सर्वांना…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुन्हेगारी मोठ्या संख्येने वाढत असतांना नुकतेच धरणगाव तालुक्यातील मुसळी फाट्याजवळ कपाशी व्यापाराची गाडी आडवून व्यापाऱ्याजवळील दीड कोटींची रक्कम घेवून अज्ञात तीनजण पसार झाल्याची घटना आज शनिवारी दुपारी घडली आहे. या घटनेमुळे धरणगाव तालुक्यासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील दुर्गेश इम्पेक्स नामक जिनिंगचे पेमेंट जळगावहून पिंप्रीला जाण्यासाठी कारमधून नेले जात होते. मुसळी फाट्या ते पिंप्री गावादरम्यान असलेल्या निलॉन्स कंपनी समोरील उड्डाण पुलाच्या खाली व्यापाऱ्याची गाडी येताच बोलेरो कारमधून आलेल्या अज्ञात तिघांनी व्यापाऱ्याची गाडी आडविली. व्यापाऱ्याची गाडी अडवून गाडीतून काही मिनीटात दीड कोटीचे पेमेंट असलेली रक्कमेची लुट करून तिन्ही…

Read More

नांदेड : वृत्तसंस्था मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आता राज्यातील आंदोलक आक्रमक झाले असून नुकतेच नांदेडमध्ये काँग्रेस आमदाराची कार फोडल्याची घटना घडली आहे. मराठा आंदोलकांनी ही कार फोडल्याची माहिती मिळत आहे. नांदेडमधील पिंपळगाव निमजीमध्ये ही घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. राज्य सरकारही मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेणार आहे. या अधिवेशनाआधीच मराठा आंदोलक मनोज जरांगे हे उपोषणाला बसले आहेत. सगेसोयरे अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करा, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरु केलं आहे. याच मागणीसाठी बुधवारी मराठा आंदोलकांनी बीड बंदची हाक दिली होतीराज्यात मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतलेल्या मराठा…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून पुणे – नाशिक महामार्गावर नेहमीच अपघाताच्या घटना घडत आहे. नुकतेच पेट घाटात भीषण अपघात झाला आहे. पेट घाटात टेम्पो, कंटेनर आणि कारचा तिहेरी अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा होरपळून मृत्यू झालाय, तर एक गंभीर जखमी आहे. अपघातात कारने अचानक पेट घेतला. त्यामुळं तिघांचा आगीत होरपळून मृत्यु झाला, तर एक गंभीर जखमी झाला आहे. पहाटे सहा वाजेदरम्यान हा अपघात झाला आहे. घाटात उतारावर कार चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यामुळं हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या अपघातामुळे महामार्गावर वाहतुक कोंडी झाली होती. रोहिदास राक्षे, विराज कदम, आणि अंकुश भांबुरे असे अपघातात होरपळुन मृत्यु…

Read More

जळगाव : प्रतिनिधी चॉपरसह धारदार लोखंडी चाकू घेवून दहशत माजविणाऱ्यांवर शहर पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी दुपारी कारवाई केली. त्यांच्याकडून शस्त्र जप्त करण्यात आले असून मनोज अंकूश गरुड (वय २४) व गोपाल प्रकाश अडकमोल (वय ३०, दोघ रा. गेंदालाल मिल) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरुण हातात चॉपरसह धारदार लोखंडी चाकू घेवून दहशत माजवित असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून मनोज गरुड व गोपाल अडकमोल या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडून चॉपर व धारदार लोखंडी चाकू जप्त करण्यात आला. याप्रकरणी अमोल ठाकूर यांच्या फिर्यादीवरुन दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पाळधी येथील वाहन चोरीप्रकरणी पोलीसांनी संशयित आरोपींकडून दोन रिक्षा आणि तीन दुचाकी जप्त करण्यात यश मिळवले आहे- येथील शनी नगर भागात वाहन चोरीप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून तीन जणांची माहिती मिळाल्याने त्यांनाही अटक करण्यात आली होती. या पाचही संशयित आरोपींकडून पाळधी पोलीसांनी दोन रिक्षा, तीन दुचाकी जप्त करण्यात यश मिळवले आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, चोपडा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणालकुमार सोनवणे यांच्या मार्गदर्शनात पो.नि. उद्धव ढमाले, स.पो.नि. सचिन शिरसाठ, विठ्ठल पाटील, विजय चौधरी, अर्जुन कुवारे, प्रवीण तांदळे आदींनी केली.

Read More

रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील के-हाळे बुद्रुक गावातून जाणाऱ्या रसलपूर रोडवर समोरून भरधाव वेगात आलेल्या वाळूच्या ट्रॅक्टरला हात दाखवून थांबवत परवान्याची मागणी केली असता, ट्रॅक्टर चालकाने तलाठी रवी शिंगणे यांना धक्काबुक्की केली. सोबत असलेल्या दुसन्या सहकार्याने त्यांच्या कारवाईलाही प्रतिबंध करून चोरून आणलेले वाळूचे ट्रॅक्टर पळवून नेले. ही घटना शुक्रवारी सकाळी सव्वादहा वाजण्याच्या दरम्यान घडली. मिळालेल्या माहितीनुसार, टॅक्टर चालकाचे नाव मोहंमद इतबार तडवी (रा. केन्हाळे खुर्द, ता. रावेर) असे आहे. त्याचा सहकारी अशफाक ऊर्फ करण तडवी (रा. केन्हाळे खुर्द, ता. रावेर) याने वाळूने भरलेले ट्रॅक्टर पळवून नेले. या दोघांविरुद्ध रावेर पोलिसांत दाखल करण्यात आला आहे. एक आरोपी मोहंमद इतबार तडवी यास पोलिसांनी…

Read More