Author: editor desk

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची धामधूम सुरु असतांना आता देशाच्या राजधानीमध्ये राज्यातील एका खासदाराच्या गाडीचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. राज्यातील शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा राजधानी दिल्लीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात हेमंत गोडसे यांना गंभीर दुखापत झाली नाही, मात्र गाडीचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे हे आज राजधानी दिल्लीमध्ये आहेत. नवी दिल्लीमधील संसदेतील शिव जयंती उत्सव आटोपून हेंमत गोडसे हे आपल्या इनोव्हा कारमधून (क्र. MH 15 FC 9909) निवास्थानी जात होते. यावेळी दिल्लीतील बी डी मार्गावर त्यांच्या गाडीला एका भरधाव ईर्टिगा…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था देशातील सर्वच पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोठी तयारी सुरु केली असतांना आता लवकरच लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं जाणार आहे. या निवडणुकीत जास्तीत जास्त जागांवर विजय मिळवण्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागलेत. अशात शिवसेना ठाकरे गटाने लोकसभा निवडणूक समन्वयक यादी जाहीर केली आहे. यावेळी अनेक नवख्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलीये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्य वक्तव्य केल्याने अटक करण्यात आलेले मुंबईचे माजी महापौर आणि ठाकरे गटाचे उपनेते दत्ता दळवी यांचेही नाव समन्वयक यादीत आहे. दत्ता दळवी यांच्यावर ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आलीये. तर आमदार विलास पोतनीस यांच्यावर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली…

Read More

पुणे : वृत्तसंस्था छत्रपती शिवाजी महाराजांची 394 वी जयंती आज १९ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यासह देशात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीनिमित्त शासकीय जयंती सोहळा पार पडणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाले आहे. थोड्याच वेळात शिवनेरीवर शासकीय सोहळा पार पडणार आहे. यासाठी किल्ल्यावर संपूर्ण वातावरण शिवमय झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही विविध विकास कामांचे लोकार्पण देखील पार पडणार आहे. याशिवाय राज्यात मराठा आरक्षणाची आग धगधगत असताना मुख्यमंत्री आज यासंदर्भात काही बोलणार का हे पाहणे महत्वाचे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी दुचाकीला कट लागल्याच्या कारणावरून दोन गटांत वाद होऊन एकमेकांच्या दुचाकीचे दगड मारून नुकसान करण्यात आल्याची घटना १६ रोजी सुप्रीम कॉलनी परिसरात घडली. या प्रकरणी सात जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रीम कॉलनीत दुचाकीला कट लागल्याच्या कारणावरून दोन गटांत वाद होऊन दगड मारून दोन दुचाकींचे नुकसान केले, या प्रकरणी पोकॉ. नरेंद्र मोरे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दत्तात्रय शरद कोळी (१९), गोपाळ संभाजी पाटील (१९, दोघे रा.सुप्रीम कॉलनी), सचिन प्रभाकर सोनवणे (१८, रा. खूबचंद साहित्यानगर), राकेश कैलास पाटील (२३, रा. नितीन साहित्यानगर), सैय्यद अब्दुल रहिम अली मोहम्मद (२४, रा. मारुळ, ता.यावल),…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरापासून नजीक असलेल्या आसोदा येथे मित्राची व अन्य दोघांची बोलचाल सुरू असताना, त्या ठिकाणी गेलेल्या निखिल वसंत बिन्हाडे (१७) या तरुणावर धारदार शस्त्राने वार करून जखमी करत मारहाण करण्यात आली. ही घटना तालुक्यातील आसोदा येथे शुक्रवार, १६ फेब्रुवारी रोजी रात्री घडली. या प्रकरणी शनिवार, १७ फेब्रुवारी रोजी तालुका पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री निखिल बिन्हाडे याचा मित्र ऋतिक बिन्हाडे व अन्य दोघांमध्ये बोलचाल सुरू होती. त्यावेळी निखिल तेथे गेला, याचा राग आल्याने दोघांनी त्याला बेदम मारहाण करून कानाजवळ धारदार वस्तू मारत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी निखिल बिन्हाडे याने…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) रेल्वे स्थानकांवर आणि रेल्वेच्या आवारात चोरीच्या घटनांविरोधात मोहीम उघडली आहे. यात गेल्या तीन दिवसात रेल्वे प्रवाशांकडील मोबाईल चोरणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरपीएफ कर्मचारी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गस्त घालत असतात. १३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान ही कारवाई करण्यात आली. भुसावळ स्थानकावर आरपीएफ आणि सीपीडीएस कर्मचाऱ्यांना स्थानकाच्या परिसरात एक जण संशयास्पद फिरताना आढळला. कृष्णा सावंत नावाच्या आरोपीने सचखंड एक्स्प्रेसमधील प्रवाशाचा मोबाईल चोरल्याची कबुली दिली. एका प्रवाशाने दिलेल्या माहितीवरुन भुसावळ रेल्वे स्थानक परिसरात संशयास्पद फिरणाऱ्या एकास पकडण्यात आले. समीर पठाण असे या आरोपीचे नाव आहे. त्याने अमरावती एक्स्प्रेसच्या जनरल…

Read More

जळगाव : प्रतिनिधी धरणगाव तालुक्यातील भोद खुर्द शिवारात मुसळी फाट्याजवळ अनिल अग्रवाल व दुर्गेश अग्रवाल यांच्या मालकीच्या दुर्गेश इम्पेक्स जिनिंगचे पैसे कर्मचारी कारने जळगावहून घेऊन जात असताना शनिवार, १७ रोजी दुपारी धरणगाव बायपासजवळ त्यांच्या कारला समोरुन आलेल्या दुसऱ्या कारने धडक दिली होती. यावेळी चालकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून कारच्या डिक्कीतून एक कोटी ६० लाख रुपयांची रक्कम घेऊन चोरटे पसार झाले होते. हि घटना घडल्यानंतर पोलिसांनी आता दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कापूस व्यापाऱ्याची कार अडवून दीड कोटी रुपयांची रक्कम लुटून नेणारे चोरटे पोलिसांच्या हाती लागले आहे. अनिल उर्फ बंडा भानुदास कोळी (३२) व योगेश शालिक कोळी (२९)…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकाने कांदा निर्यातीवरली बंदी हटवली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने कांदा निर्यातील मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारने देशातील कांद्याच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी निर्यातीवर बंदी घातली होती. या निर्यात बंदीची डेडलाईन ३१ मार्चपर्यंत होती. मात्र डेडलाईन संपण्याच्या आधीच सरकारने ही बंदी हटवली आहे. आज तकने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. कांदा निर्यातीवरील बंदी हटवताना महाराष्ट्र आणि गुजरातमधील कांद्याच्या साठ्याचा विचार करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीबाबत अमित शाह यांना माहिती दिली होती. ज्यानंतर चर्चा करुन निर्यात बंदी मागे…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी अभ्यासानिमित्त फोनवर बोलण्याऱ्या तरुणीच्या बोलण्याचा गैरफायदा घेत तरुणीचे कुटुंब व होणाऱ्या पतीला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका तरुणावर अमळनेर पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रताप महाविद्यालयात एम. ए.च्या प्रथम वर्षाला शिक्षण घेणाऱ्या पिडीत तरुणी असून तिच्यासोबत हर्षल हिम्मतराव पाटील हाही त्याच वर्गात शिक्षण घेत होता. दोघांचे अभ्यासासंदर्भात एकमेकांशी बोलणे होत होते. मात्र त्याचा वेगळा अर्थ काढून हर्षल पाटील हा पिडीत तरुणीकडे वाईट नजरेने बघू लागला. डिसेंबर महिन्यात परीक्षा संपल्यानंतर पिडितेचे लग्न जमले. दरम्यान प्रताप महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या आपल्या लहान बहिणीस हर्षलने तुझी मोठी बहिण जर माझ्याशी बोलली नाही, तर मी तुझ्या घरातील सर्वांना…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी महिला वाहकाचा विनयभंग करणाऱ्या आगार व्यवस्थापक इम्रान पठाण यांच्याविरूध्द अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही अमळनेर आगारात वाहक म्हणून नोकरीस आहे. ३ फेब्रुवारी रोजी अमळनेर-पारोळा बसवर ड्यूटीला असताना आगारप्रमुख इम्रान पठाण यांनी पीडित वाहक महिलेच्या मोबाइलवर फोन करून मंदिरात येशील तेव्हा मला घरी येऊन भेट, असे सांगितले. दुपारी १२:३० वाजता ड्यूटी संपल्याने पीडित व एक महिला वाहक अशा दोघी मंदिरात दर्शनासाठी गेल्या. मात्र, सोबत असलेल्या वाहक महिलेची ड्यूटी असल्याने ती लगेच गेली. आगार व्यवस्थापक इम्रान पठाण यांच्या घरी गेल्यावर जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. आपण हाताला झटके…

Read More