धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील पाळधी येथील नेहमीच सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाच्या बाबतीत अग्रेसर असलेले जीपीएस मित्रपरिवार यांचा वतीने आयोध्या येथील श्रीराम लल्ला यांचा प्राणप्रतिष्ठान सोहळ्याचा पार्श्वभूमीवर पाळधी सह परिसरातील गावांमध्ये श्रीराम ध्वजाचे वाटप करण्यात येत आहे.
येत्या 22 जानेवारी रोजी आयोध्या नगरीत श्रीराम लल्लांचे प्राणप्रतिष्ठान सोहळा पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर देशासह राज्यभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले या निमित्ताने प्रत्येक ठिकाणी विविध उपक्रम राबविले जात आहेत त्याचप्रमाणे पाळधी येथील जीपीएस मित्रपरिवार यांनी देखील सुंदर असा उपक्रम हाती घेत प्रत्येक घरावर श्रीरामांचा ध्वज असावा या प्रामाणिक धार्मिक हेतूने ध्वजाचे वाटप केले आहे. सदर उपक्रम हा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांचा कुशल नेतृत्वाखाली जीपीएस मित्रपरिवार परिवारातील सर्व सदस्य करीत आहेत.