जालना : वृत्तसंस्था मराठा आरक्षणासाठी गेल्या काही महिन्यापासून रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे यांनी बुधवारी आपल्या आंदोलनाची पुढील भूमिका स्पष्ट केली. सरकारने सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी केली नाही तर मराठा आरक्षणाचे आंदोलन अधिक त्वेषाने लढले जाईल. त्यात 24 तारखेपासून राज्यातील गावोगावी सकाळी 10.30 ते दुपारी 1 सायंकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत 2 सत्रांत रास्ता रोको होईल. त्यानंतर 3 मार्च रोजी महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत एकाच ठिकाणी एकाच वेळी दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत रास्ता रोको केला जाईल, असे ते म्हणाले. हा रास्ता रोको जगातील सर्वात मोठा असेल, असे जरांगे यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी, मनोज जरांगे यांनी सरकारकडे सगेसोयरे अधिसूचनेच्या माध्यमातून मराठा समाजाला सरसकट…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीशेठ फडके यांचे आज (दि.२१) निधन झाले. रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना गोल्डन मॅन म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. बैलगाडा शर्यतींचा विषय निघाल्यानंतर पहिलं नाव येते, ते म्हणजे विहिघर येथील प्रसिद्ध पंढरीनाथ फडके. १९८६ पासून वडिलांमुळे पंढरीनाथ फडकेंना बैलगाडीचा नाद लागला. शर्यत जिंकल्यावर कोंबडा किंवा मेंढा मिळायचा, तरीही शर्यत जिंकायची क्रेझ वेगळी होती. तिथपासून सुरू झालेली आवड फडकेंनी कायम ठेवली होती. आत्तापर्यंत ४० ते ५० शर्यतींची बैल त्यांनी राखून ठेवली होती. कोणत्याही शर्यतीमध्ये एक नंबरला असलेल्या बैलावर पंढरीशेठ यांची नजर असायची. त्यानंतर कितीही किंमत…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकारसोबतची बोलणी फिस्कटल्यानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा दिल्लीकडे कूच करण्यास सुरुवात केली आहे. जेसीबी-पोकलेन मशीन घेऊन शेतकरी मोठ्या संख्येने दिल्लीकडे रवाना होत आहेत. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी दिल्लीला लागून असलेल्या राज्यांच्या सीमा सील केल्या असून ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. अशातच हरियाणातील शंभू सीमेवर शेतकरी आणि पोलिसांमध्ये पुन्हा एकदा चांगलीच झटापट झाली आहे. घोषणाबाजी करत सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच सौम्य लाठीमार देखील केला. यावेळी शेतकऱ्यांची मोठी पळापळ झाली. या थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. पीटीआयने आपल्या अधिकृत…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था सरकारी नोकर भरतीच्या जाहिराती निघाल्या ही त्याच्या परीक्षेला बसणाऱ्यांची संख्या लाखोंमध्ये असते. मात्र सध्या उत्तर प्रदेश पोलीस भरतीच्या परीक्षेला चक्क सनी लियोनी बसल्याची चर्चा सोशल मीडियावर झाली आहे. त्यामागचे कारण सुद्धा खास आहे. उत्तर प्रदेश पोलीस भर्तीमध्ये एका व्यक्तीच्या परिक्षेच्या ओळखपत्रावर चक्क सनी लिओनीचा फोटो छापण्यात आला. काल हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला. ही बाब निदर्शनास आल्यानंतर पोलीस चौकशीसाठी उमेदवाराच्या घरी पोहोचले. धर्मेंद्र कुमार असे प्रवेशपत्र असलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातील रगौलिया बुजुर्ग गावचा रहिवासी आहे. रविवारी १८ फेब्रुवारी रोजी गुन्हे शाखेचे पथक चौकशीसाठी त्याच्या गावी पोहोचले. चौकशीदरम्यान धर्मेंद्र कुमारने सांगितले…
बुलढाणा : वृत्तसंस्था राज्यातील अनेक भाविकांचे मंगळवारी उपवास होते. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील खापरखेड सोमठाणा येथील विठ्ठल –रूख्मिणीच्या मंदिरातील उपवासाचे फराळ खाल्ल्याने गावातील तब्बल ५०० महिला आणि पुरूषांना विषबाधा झाली. त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. या ग्रामस्थांना पोलीस आणि इतर ग्रामस्थांना बिबी येथील ग्रामीण रूग्णालयात नेले आहे. तर काही रुग्णांना मेहेकर, सुलतानपूर, लोणार, अंजनी खुर्द या ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. ठिकठिकाणी वैद्यकीय अधिकारी हे गैरहजर दिसून आले आहेत. त्यामुळे पोलीस आणि महसूल प्रशासनाने परिसरातील खासगी डॉक्टरांना वैद्यकीय उपचारासाठी पाचारण केले. रात्री उशिरा हा धक्कादायक…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक महिन्यापासून मनोज जरांगे पाटील लढा देत आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय शत्रूत्व सर्वश्रूत आहे. पण आता ठाकरे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मनात कोणतीही आढी न ठेवता थेट मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानलेत. यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेषतः उद्धव ठाकरे लवकरच शिंदेंच्या नेतृत्वात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर पाठिंबा देईल असा दावा आमदार रवी राणा यांनी केला होता. त्यातच ठाकरेंनी शिंदेंचे आभार मानले आहेत हे विशेष. मराठा आरक्षणाचे विधेयक आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मंजूर करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव…
जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ म्हणजेच मार्केटिंग फेडरेशनच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांची बिनविरोध निवडून येण्याची परंपरा कायम राहीली असुन भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रोहित निकम देखील बिनविरोध निवडून आले आहे. दूध संघाप्रमाणेच राज्य मार्केटिंग फेडरेशनवर दोन्ही मित्र निवडून आले आहे. महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या निवडणुकीची आज माघारीचा शेवटचा दिवस होता. गेल्या सात ते आठ महिन्यापूर्वी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शासनाने या निवडणुकीला स्थगिती दिली होती. स्थगिती उठल्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री ना. दिलीपराव वळसे पाटील, ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन,…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातून सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळविले. ही घटना दि. १८ रोजी उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी वास्तव्यास आहे. ही मुलगी घरात एकटीच असतांना तीला दि. १८ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. ही घटना उघडकीस आल्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी तीचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तरी देखील ती मिळून न आल्याने अखेर त्यांनी दि. १९ रोजी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव : प्रतिनिधी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेता मेहरुण गावात १६ रोजी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रकरणी सोमवारी चार जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोणत्याही ठिकाणी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यासाठी १५ दिवस अगोदर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र तसे न करता मेहरुण गाव शिवारात १६ फेब्रुवारी रोजी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार सुरेश भोळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. हा प्रकार लक्षात आल्याने जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाचे अधिकारी गणेश भांडारकर यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आयोजक वैभव युवराज सानप, विवेक वासुदेव सानप, प्रणव हरिचंद्र गवळी, संकेत सोपान…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु असून आज मराठा आरक्षण विधेयक राज्य विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात विधानसभेत एकमतानं मंजूर झालं असलं तरी, मराठा आरक्षणासाठी गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत. उपोषणाला बसलेल्या जरांगे यांनी स्वतःच हाताला लावलेली सलाइन काढली. आंदोलनाची पुढील दिशा उद्या ठरणार असल्याचं सांगितलं. उद्या आंदोलनासंदर्भात घोषणा करणार असल्याचेही ते म्हणाले. राज्य विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात विधानसभेत मराठा आरक्षण विधेयक एकमतानं मंजूर झालं असलं तरी, मराठा आरक्षणासाठी गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत. उपोषणाला बसलेल्या जरांगे यांनी स्वतःच…

