अमळनेर : प्रतिनिधी होळीच्याच दिवशी घराला आग लागून गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यात घरातील कर्त्या पुरुषाचा होरपळून मृत्यू झाला. ही दिलीप पाटील दुर्दैवी घटना पिंपळी (ता. अमळनेर) येथे रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. दिलीप नामदेव पाटील, असे मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी दिलीप पाटील यांच्या पत्नी संगीता दिवा लावता असतानाच घरात अचानक आग लागली अन् त्यातच गॅस सिलिंडरचा स्फोटही झाला. घराचे लाकडी छता आणि कापूस यामुळे आग पसरली दिलीप पाटील यांच्या पत्नी, मुलगा विकी आणि नात खुशी तातडीने घराबाहेर पळाले. मात्र दिलीप यांना चक्कर आल्याने ते घरात अडकून पडले. ग्रामस्थ मिळेल त्या साधनांनी आग आटोक्यात…
Author: editor desk
मेष आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम राहील. कौटुंबिक स्तरावर तुमचा आनंद वाढू शकतो. तुमच्या मुलाच्या शिक्षणात प्रगती होण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिशियन म्हणून काम करणारे लोक आज नेहमीपेक्षा जास्त उत्पन्न मिळवतील. तुमच्या कामात वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकते. वृषभ आजचा दिवस तुमच्यासाठी छान असेल. या राशीचे व्यापारी जर नवीन कामात पैसे गुंतवत असतील तर त्यांना फायदा होऊ शकतो. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडल्यावर तुम्हाला समाधान वाटेल. कला क्षेत्राशी निगडित लोकांना सन्मान मिळू शकतो. मिथुन आज तुमचा दिवस चांगला जाईल. या राशीचे व्यापारी आजचा दिवस स्वतःसाठी अनुकूल करण्यात व्यस्त राहतील. नशीबाची साथ मिळवण्यासाठी प्रयत्न करावा लागू शकतो. संयमाने केलेल्या कामात यश मिळेल. घरातून निघताना आई-वडिलांचा…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यात अवैधरित्या सुरु असलेल्या गावठी हातभट्टीची दारु तयार करणाऱ्यांवर पोलिसांकडून सात ठिकाणी धडक कारवाई करण्यात आली. यामध्ये १ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला असून सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात अवैधरित्या गावठी दारु तयार करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिल्या होत्या. त्यानुसार संबंधित पोलीस ठाण्यांतर्गत पथक तयार करुन पोलिसांनी दि. २२ रोजी गावठी हातभट्टी दारु तयार करणाऱ्यांसह विक्रेत्यांविरुद्ध धडक मोहीम राबविली. यामध्ये जामनेर तालुक्यातील महुखेडा, वाडी शिवार, गोंडखेल शिवार याठिकाणी कारवाई केली. या कारवाईत हजारो लिटर गावठी हातभट्टीची दारु, कच्चे रसायन व पक्के रसायन असा…
धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. व्ही. डी. पाटील यांनी धरणगाव येथील निवडणूक आचारसंहिता अंमलबजावणी अधिकारी धर्मेंद्र सूर्यवंशी यांची भेट घेऊन पंतप्रधान विश्वकर्मा योजनेबद्दल निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याबद्दल तक्रार केली व तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाने पंतप्रधान विश्वकर्मा योजना लागू केली असून सध्या लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतांना जनतेकडून सेतू सुविधा केंद्रावरून या योजनेअंतर्गत अवजारे खरेदीसाठीच्या नावाने पंधरा हजार रुपये मिळण्यासाठीचे अर्ज भरून घेतले जात आहेत. सरकारकडून पंधरा हजार रुपये मिळणार या आशेने जनतेने गावागावात सेतू सुविधा केंद्रावर गर्दी केली आहे. हे आदर्श आचारसंहितेचे सरळसरळ उल्लंघन असून मतदारांनी सत्तापक्षाला…
चाळीसगाव : प्रतिनिधी ऊस तोडणी कामगारांच्या ५ झोपड्यांना शनिवारी दुपारी ४ वाजता अचानक आग लागल्याची घटना तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे घडली आहे. या आगीत संसारोपयोगी साहित्य, कपडे, धान्य, पैसे आदी सर्वच वस्तू जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे हे कामगार रस्त्यावर आले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ऊस तोडणी कामगार काही महिन्यांपासून ऊस तोडणीसाठी बाहेरगावी गेले होते. हे कामगार शुक्रवारी घरी परतले. शनिवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास अचानक त्यांच्या झोपड्यांना आग लागली. कुटुंबातील सर्वजण दुपारी जेवण करून बाहेर झोपले होते. आगीत झोपड्या जळून खाक झाल्याचे त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिल्यावर त्यांना अश्रू आवरणे अवघड झाले होते. आग इतकी भीषण…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील दोघांना पोलिस दलात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने १४ लाखांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी भुसावळ शहर पोलिसात मुंबईतील तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, विजय नारायण सोनवणे (३५, आरपीएफ बॅरेक, द्वारकानगर, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, २०२२ ते १४ जून २०२२ दरम्यान संशयितांची ओळख झाल्यानंतर त्यांनी पोलिस खात्यात नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून सोनवणे यांची सहा लाखांत, तर साक्षीदार आकाश प्रकाश भालेराव यांची आठ लाख रुपयांत फसवणूक केली. रक्कम देऊनही नोकरी न लागल्याने फसवणूक झाल्याची खात्री होताच संशयितांविरोधात तक्रार नोंदविण्यात आली. याप्रकरणी राघवेंद्र महादेव पाटील व गौरी राघवेंद्र पाटील (मुंबई टिटवाळा, कल्याण) व अनिल सपकाळ (खडकपाळा, कल्याण)…
मेष : जीवनसाथीच्या आरोग्याकडे योग्य लक्ष देणे आणि देखभाल करण्याची गरज असेल. आज तुम्हाला अनेक नवीन आर्थिक योजना सादर केल्या जातील – कोणतेही वचन देण्याआधी सदर योजनेच्या चांगल्या-वाईट बाबी तपासून पाहा. क्वचित भेटीगाठी होणाºया लोकांशी आज संपर्क करण्यासाठी चांगला दिवस. प्रेमामध्ये जोरजबरदस्ती टाळा. अचानक आज तुम्ही कामातून सुट्टी घेण्याचा प्लॅन बनवू शकतात आणि आपल्या कुटुंबातील लोकांसोबत वेळ घालवू शकतात. तुमच्या जोडीदाराने दिलेल्या मनस्तापाचा तुमच्या प्रकृतीवर परिणाम होईल. वृषभ : अत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. पण आरोग्यालाल गृहित धरू नका. आयुष्याची काळजी घेणे ही आपली गरज आहे. पारंपरिक पद्धतीची गुंतवणूक कराल तर तुम्हाला त्यातून चांगली धनप्राप्ती होईल. मित्र आणि…
बुलढाणा : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना एक थरारक घटना बुलढाण्यातून समोर आली आहे. जागेच्या वादातून अंगणवाडी सेविकेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करत अमानुष मारहाण केल्याची भयंकर घटना घडली असून मारहाण करणाऱ्या नराधमाच्या तावडीतून सोडविण्यासाठी महिलेचा भाऊ पुढे आला. तेव्हा त्याला देखील बेदम मारहाण करून दहशत निर्माण करण्यात आली. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंगणवाडी सेविकाने तातडीने मेहकर पोलिसांत धाव घेतली. दिलेल्या तक्रारीवरून तीन आरोपींवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला ही तिच्या आईसोबत मेहकर येथील अण्णाभाउ साठे नगर येथे असलेल्या मोकळ्या जागेची साफसफाई करत…
मुंबई : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीसाठी आता अनेक मतदार संघात उमेदवारी निश्चित झाली आहे मात्र काही मतदार संघात मात्र उमेदवारीची तिढा सुटलेला नसताना नुकतेच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शाहू महाराज छत्रपती यांची उमेदवारी काँग्रेसने जाहीर केली आहे. त्यांच्या उमेदवारीला वंचित बहुजन आघाडीने पूर्ण पाठिंबा दिला आहे. शाहू महाराजांना निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले. महाविकास आघाडीच्या जागा वाटप संदर्भात देखील त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केले. तुम्ही आम्हाला सहकार्य केले असते, तर जागा वाटपाचा तिला सुटला असता, असे देखील प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटप संदर्भात मला विचारून…
बुलढाणा : वृत्तसंस्था राज्यातील अनेक भागात खळबळजनक घटना घडत असतांना एक संतापजनक घटना बुलढाणा जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात घडली आहे. एका जिल्हा परिषद शाळेतील मुख्याद्यापिकेने शाळेतील ८ वर्षीय चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार केलाय. शाळेतील केळी वाटपादरम्यान मला निकृष्ट दर्जाची केळी दिल्याची तक्रार या विद्यार्थ्याने पालकाकडे केली होती. याचा राग मनात धरून मुख्याद्यापिकेने विद्यार्थ्यासोबत अश्लिल वर्तन केले. याप्रकरणी पीडित विद्यार्थ्याच्या पालकाने दिलेल्या तक्रारीवरून शेगाव ग्रामीण पोलिसांनी मुख्याध्यापिकेविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ८ वर्षीय चिमुकला शेगाव तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतो. १५ मार्च रोजी शाळेतील…

