Author: editor desk

नाशिक : वृत्तसंस्था मुंबई एलटीटी – गोरखपूर गोदान एक्स्प्रेस शुक्रवारी दुपारी नाशिक रोड रेल्वे स्थानकातून मार्गस्थ होताच शेवटच्या पार्सलच्या कम्पार्टमेंटला आग लागली. या बोगीतून मोठ्या प्रमाणात धूर येऊन आग लागल्याचे वेळीच लक्षात आल्याने ही गाडी त्वरित थांबविण्यात आली. शेजारील डब्यातील प्रवाशांनी बाहेर उड्या मारल्याने जीवितहानी टळली. यामुळे मुंबईला जाणाऱ्या व येणाऱ्या काही गाड्या उशिराने धावल्या पार्सलच्या कंपार्टमेंटमध्ये कुर्ला व कल्याण येथून दुचाकी व इतर सामानाचे बॉक्स ठेवले होते. कल्याणमधून प्रयागराजचे पाच व शाहगंजचे चार पार्सल ठेवण्यात आले, त्यामध्ये एक दुचाकीही होती. आगीमध्ये आठ ते नऊ दुचाकी जळून खाक झाल्याचा अंदाज आहे. त्या दुचाकीमध्ये एक इलेक्ट्रिक दुचाकी असल्याचे समजते, तसेच टी-शर्टचे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील धामणगाव येथील बसस्थानक येथे काहीही एक कारण नसतांना कुटुंबातील तीन जणांना चाकूने वार करत मारहाण केल्याची घटना बुधवार २० मार्च रोजी रात्री ११ वाजता घडली. याप्रकरणी गुरूवार २१ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यश कैलास सपकाळे (वय १८) रा. धामणगाव ता. जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बुधवार २० मार्च रोजी रात्री ११ वाजता गावातील बसस्थानकजवळ उभा होता. त्यावेळी काहीही एक कारण नसतांना किरण विलास सपकाळे, निलेश उर्फ राजू सपकाळे, राजू रघुनाथ सपकाळे आणि यश राजू सपकाळे सर्व रा. धामणगाव ता. जळगाव…

Read More

जळगाव : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या नाकाबंदीत विना पावती २० लाखांच्या दागिन्यांसह जळगावच्या सराफा व्यावसायिकाला ताब्यात घेण्यात आले आहे. मुक्ताईनगरातील प्रवर्तन चौकात शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली. भवरलाल जेठमल जैन असे व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांच्याकडे विना पावती/विना परवाना २७९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आढळून आले असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली. मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकात पोलिसांच्या पथकाला एक चारचाकी वाहन जाताना दिसले. या वाहनाबाबत संशय आल्याने पोलिसांनी हे वाहन अडवले.संबंधित सराफाची चौकशी केली असता त्यांच्याकडे दागिन्याच्या पावत्या आढळून आल्या नाहीत. त्यावरून फिरत्या नाकाबंदी पथकाचे प्रमुख अनिल नेरपगार यांना तत्काळ बोलवून कायदेशीर कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक नागेश मोहिते, सहायक…

Read More

मेष आजचा दिवस आनंद घेऊन येईल. कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी आजचा दिवस अतिशय शुभ आहे. कौटुंबिक वातावरण शांततापूर्ण असेल. तुमच्या व्यावसायिक इच्छा पूर्ण होतील. तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही व्यवसाय सुरू करू शकता. या काळात तुम्हाला तुमच्या खर्चावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करताना तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयींकडेही लक्ष द्यावे. वृषभ तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडाल. तुमची जीवनशैली बदलेल. कठीण काळात योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न कराल. व्यावसायिक जीवनात लोक तुमच्यामुळे प्रभावित होतील. आज समोर येणाऱ्या आव्हानांना आपल्या बुद्धीने आणि सामंजस्याने सामोरे जाण्याचा प्रयत्न कराल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत जेवायला जाल. नवविवाहित जोडपे आज कुठेतरी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी दोन दिवसांपुर्वी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात सुमारे ७२ लाख ८० हजार रूपये किंमतीचे ९१० ग्रॅम एमडी ड्रग्ज पकडल्याची मोठी कारवाई झाली असतांना लागलीच दुसऱ्या दिवशी जळगाव शहरातील शाहू नगरात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या तरूणाला आणि ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या दोन जणांना शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने गुरूवारी २१ मार्च रोजी मध्यरात्री अटक केली असून त्यांच्याकडून १२२ ग्रॅम वजनाचा ९ लाख ७७ हजार ७६० रूपये किंमतीचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी शुक्रवारी २२ मार्च रोजी दुपारी २ वाजता पत्रकार परिषदेत दिली. यामध्ये इम्रान उर्फ इम्मा हसन भिस्ती रा. शाहू नगर, जळगाव आणि…

Read More

मुंबई : प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या निवडणुका एकूण सात टप्प्यात होणार असून त्यासाठी मागच्या शनिवारपासून देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने ‘सीव्हिजिल सिटीझन ॲप’ विकसित केले आहे. या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर पहिल्या १०० मिनिटांत पहिली कार्यवाही केली जात आहे. आचारसंहिता कालावधीत काय करावे आणि काय करु नये याविषयी निवडणूक उमेदवार, प्रशासन आणि राजकीय पक्षांना माहिती दिली जाते. पण, काहीवेळेला या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होते. त्याची तक्रार करणे आता पूर्वीपेक्षा…

Read More

मलकापूर : वृत्तसंस्था पळसखेड ता. चिखली येथील 22 वर्षीय विवाहित शेतमजूर महिलेला दुचाकीवर तोंड बांधून आणून तिघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केल्याची घटना मलकापुर शहरातील तुलसी नगर भागात घडली. याबाबत पीडीतीने मलकापूर शहर पोस्टला दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध कलम 363,366,376 376(ड),506 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.याप्रकरणी तिघाही आरोपींना शहर पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांना आज न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. चिखली तालुक्यातील 22 वर्षीय शेतमजूर विवाहिता दि.19 मार्च मंगळवार रोजी पळसखेड ते डोंगर शेवली रस्त्यावरील मळ्यात शेती कामावर गेली होती. सायंकाळी पाच वाजेदरम्यान दुचाकीवर आलेल्या अनोळखी दोघांनी तिला मोटरसायकलवर मध्ये बसवून तिचे तोंड बांधून…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील आनोरे येथील विवाहित महिलेने पती व सासू, सासरे यांच्या जाचास कंटाळून गुरुवारी सकाळी ८ वाजता आनोरे शिवारातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात कौतिक भिका पाटील यांच्या फिर्यादीवरुन पतीसह सासू, सासऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शीतल संतोष पाटील (वय ३४) असे मयत विवाहितेचे नाव आहे. दरम्यान, धरणगाव तालुक्यातील अनोरे येथील संतोष पाटील यांचे धुळे जिल्ह्यातील वाडीभोकर येथील शीतल पाटील यांच्याशी विवाह झाला होता. दरम्यान, वाडीभोकर येथील माहेर असलेल्या शीतल पाटील या विवाहितेचा सासरच्यांनी सन २०१३पासून वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ सुरु ठेवला होता. या जाचाला कंटाळून अनोरे येथील संतोष दगा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी कामानिमित्त स्थायिक झालेल्या चोरट्याने दुचाकी चोरुन तो मध्यप्रदेशात कमी किंमतींमध्ये त्याची विक्री करणाऱ्यांचा एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून चोरीच्या सहा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहे. मात्र यातील मुख्य संशयित अद्याप फरार असून त्याचा कसून शोध घेतला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील खंडवा येथील संशयित कामानिमित्त एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास होता. शहरातील विविध भागातून तो दुचाकी चोरुन नेत मध्यप्रदेशातील पिपलोद येथे त्या दुचाकी कमी किंमतीमध्ये आपल्या साथीदारांच्या मदतीने विक्री करीत होता. दरम्यान, या संशयितांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी लांबवल्याची माहिती पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यांनी लागलीच पथक…

Read More

जळगाव : प्रतिनिधी टोळीने चोरी, जबरी चोरी सारखे गुन्हे करणाऱ्या पहूर पेठ येथील चार जणांच्या टोळीवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. त्यांना एक वर्षाकरीता जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. महेश्र्वर रेड्डी यांनी गुरुवारी सायंकाळच्या सुमारास काढले. पहुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टोळी प्रमुख प्रदीप राबदास पाटील (वय २४, रा. पहुर पेठ, ता. जामनेर), टोळी सदस्य शहारुख बनेखा तडवी (वय २३, रा. पहुरपेठ, ता. जामनेर), इरफान लालखॉ तडवी (वय २३, रा. पहुरपेठ, ता. जामनेर) व शेख राज शेख समद (वय २४, रा. पहुरपेठ, ता. जामनेर) या टोळीने जबरी चोरी, चोरी सारखे गुन्हे केले आहे. तसेच ही टोळी परिसरात ठिकठिकाणी दहशत…

Read More