यावल : प्रतिनिधी शहरातील रेणुकादेवी मंदिर परिसरात राहणाऱ्या एका ४५ वर्षीय दिव्यांग इसमाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडीस आली. पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. या तरुणाचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेत असताना पोलिसांनी अंत्यसंस्कार थांबविले. त्याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आणि शवविच्छेदन करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, रेणुकादेवी मंदिरजवळ बाळू लक्ष्मण वाणी (वय ४५) याने घरात गळफास घेतल्याचे समोर आले. मात्र, त्याच्यावर अंत्यविधी होण्याआधीच पोलिसांनी स्मशानात जाऊन हा अंत्यविधी थांबविला आणि मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणला व त्याच्यावर शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी नीलेश नारायण वाणी यांनी पोलिसात माहिती दिली. त्यानुसार, आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस…
Author: editor desk
मेष आजचा दिवस चांगला जाईल. विनाकारण सुरू झालेले अडथळे संपतील. आज तुम्हाला तुमच्या आईकडून काही चांगली बातमी मिळू शकते. तुमचे मन प्रसन्न राहील. अचानक काही धार्मिक कार्यात मदत करण्याची संधी मिळेल. जे केल्याने तुमच्या आत सकारात्मक ऊर्जा जाणवेल. मुले त्यांच्या मनातील भावना त्यांच्या पालकांना सांगतील. त्यामुळे तुमच्या समस्या लवकरच दूर होतील. वृषभ आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. आर्थिक बाबतीत थोडे सावध राहण्याची गरज आहे. आज तुमची परदेशी कंपनीशी भागीदारी होऊ शकते. याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या काळात होईल. शेजाऱ्यांचे काही सामाजिक कार्यात सहकार्य मिळेल. यामुळे लोकांमध्ये तुमचा आदर वाढेल. तुम्ही एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाऊ शकता. कौटुंबिक संबंध दृढ होतील. नोकरीच्या…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कंडारी रायपूर परिसरातील वाघूर धरणात रंगपंचमी खेळून झाल्यावर पोहायला गेलेला तरुण बुडाल्याची धक्कादायक घटना सोमवारी दि. २५ रोजी दुपारी साडेबारा वाजता घडली होती. या तरुणाचा मृतदेह मंगळवारी दि. २६ मार्च रोजी २४ तासांनी दुपारी १ वाजता मिळून आला आहे. तरुणाच्या मृत्यूप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कुसुंबा येथील रोहित कैलास पाटील (वय १८) असे मयत इसमाचे नाव आहे. तो कुसुंबा गावात आई, मोठा भाऊ यांच्यासह राहत होता. एमआयडीसीतील एका चटई कारखान्यात तो कामाला होता. सोमवारी दि. २५ मार्च रोजी धुलिवंदननिमित्त गावात तरुणांनी होळी खेळली. त्यातील काही तरुण हे पोहण्यासाठी कंडारी-रायपूर…
मुंबई : वृत्तसंस्था देशात लोकसभा निवडणूक अनुषंगाने राज्यात आम्ही एकत्रित चर्चा करून राज्यात 48 जागांबाबत कोणी कोणती निवडणूक लढवणार आहोत, याबाबत 99 टक्के काम झाले आहे. 28 मार्च रोजी मुंबईत एकत्रित सर्व जागा घोषित होतील. रायगड लोकसभा मतदारसंघात महायुती उमेदवार म्हणून सुनील तटकरे हे निवडणूक लढवणार आहेत. विविध घटक पक्ष एकत्रित येऊन आम्ही राज्यातील सर्व जागा लढवत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, धनंजय मुंडे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, संजय बनसोडे उपस्थित होते. अजित पवार म्हणाले की, शिवाजीराव आढळराव पाटील हे 20 वर्षांपूर्वी आमच्या पक्षातून…
धरणगाव : प्रतिनिधी भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात विखरण येथील 55 वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाला तर दुचाकीवरून एक जण गंभीर झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडला. युवराज महाजन (55, रा.विखरण, ता.एरंडोल) असे मयताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव-चोपडा रस्त्यावरील जी.एस.ट्रेडिंगजवळ युवराज महाजन हे दुचाकी (एम.एच.19-4490) वरून सहकार्यासोबत जात असताना अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने महाजन यांचा जागीच मृत्यू झाला तर सहकारी गंभीर जखमी झाले. अपघातानंतर ट्रक चालक वाहनासह पसार झाला. अपघातानंतर माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, गोपाल पाटील, अमोल चौधरी, गौतम सोनवणे, विनोद रोकडे, गजानन महाजन आदींनी धाव घेत जखमीला उपचारार्थ हलवले.
धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव तालुक्यात सोमवारी रंगपंचमीचा सर्वत्र उत्साह सुरु असतांना एक दुर्दैवी घटना घडली आहे. रंगपंचमी खेळून अंघोळीसाठी गेलेल्या धरणगाव येथील एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. जितेंद्र माळी (20, रा.लोहार गल्ली) असे मयत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी रंगपंचमी खेळल्यानंतर जितेंद्र हा आपल्या तीन ते चार मित्रांसोबत धरणगावजवळ असलेल्या जांभोरा गावालगत असलेल्या तलावावर मित्रांसह पोहण्यास गेला होता. परंतु थोड्याच वेळात जितेंद्र बुडायला लागला. मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही. साधारण तीन ते चार तासाच्या प्रयत्नानंतर जितेंद्रचा मृतदेह तलावातून काढण्यात यश आले. दरम्यान, रंगपंचमीच्या दिवशीच तरुण मुलाचा बुडून मृत्यू झाल्यामुळे धरणगावात सर्वत्र हळहळ…
चाळीसगाव : प्रतिनिधी वाहनातून देशी विदेशी दारूची विनापरवाना वाहतूक करणाऱ्या इसमास पोलिस पथकाने सापळा रचून अटक केली आहे. या वाहनातून देशी- विदेशी दारू, बिअर व वाहन असा एकूण ५ लाख १८ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून एकास अटक करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली. मिळालेल्या माहितीनुसार, आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशान्वये अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अभयसिंह देशमुख यांच्या सूचनेप्रमाणे चाळीसगाव-नांदगाव रस्त्यावर खडकी गावाजवळील बाबा पेट्रोल पंपाजवळ चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनतर्फे नाकाबंदी करण्यात आली. २३ रोजी ७:३० वाजेच्या सुमारास पोनि. संदीप पाटील, योगेश बेलदार, नितेश पाटील, पंढरीनाथ पवार,…
चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील सत्रासेन गावाच्या हद्दीत अज्ञात इसम अवैधरीत्या गावठी पिस्तूल (कट्टा), जिवंत काडतुसे घेऊन जात असल्याची गुप्त खबर मिळाल्यावरून चोपडा ग्रामीण पोलिसांनी सापळा रचत शनिवारी रात्री उशिरा एका आरोपीला 5 अटक केली आहे. त्याच्याकडून कट्टा, काडतूस, बुलेट आणि रोख रक्कम असा मिळून १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहित दिवाकर वाघमारे (२४, माळीचिचोरे, ता. नेवासा, जि.अहमदनगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. रोहित हा गावठी कट्टा आणि ३ जिवंत काडतुसे घेऊन जात असल्याची माहिती मिळाली असता सापळ लावण्यात आला. त्याच्याकडून त्यास २५ हजार रुपय किमतीचे गावठी पिस्तूल, ३ हजान रुपये किमतीची तीन जिवंत काडतूसे…
जळगाव : प्रतिनिधी चालत्या रिक्षामध्ये त्रास होऊ लागल्याने ती रस्त्याच्या कडेला थांबवताच रिक्षातून खाली पडून संजय आधार शिंपी (५५, रा. अर्जुन नगर) यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवार, २४ मार्च रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरील रस्त्यावर घडली. शिंपी यांचा मृत्यू नेमका उष्माघाताने की हृदयविकाराने झाला, हे शवविच्छेदनानंतर समजणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन नगरमधील रहिवासी असलेले संजय शिंपी हे रिक्षाचालक होते. रविवारी दुपारी ते बसस्थानकाकडून जिल्हा क्रीडा संकुलाकडे रिक्षा (क्र. एमएच १९, सीडब्ल्यू ३१६७) घेऊन जात असताना पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरील रस्त्यावर त्यांना त्रास होऊ लागला त्या मुळे त्यांनी रिक्षा थांबवली व काह क्षणातच ते खाली कोसळले. शिंपी यांचा…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील शिरसाड या गावात रविवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास पाच जण उमेश एकनाथ धनगर यांच्या पान टपरीत चोरी करत असल्याचे नागरिकांचे निदर्शनास आले. यावेळी नागरिकांनी आरडाओरड करून टपरीकडे धाव घेतली असता चार जण पसार झाले तर फैजान उर्फ दानिश खान अरिफ खान (वय १९, रा. तांबापुरा, जळगाव) याला नागरिकांनी पकडून पान टपरीत बंद केले. मिळालेल्या माहितीनुसार, यावल पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक धारदार चाकूसह एक हत्यार, मोटरसायकल व एक मोबाइल असा ३२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या तरुणाने व त्याच्या साथीदारांनी गोकूळ नेवे उर्फ छोटूबाबा यांच्य घरातूनदेखील साहित्य…

