Author: editor desk

नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने गुरुवारी रात्री ५७ उमेदवारांच्या नावाची तिसरी यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील सात उमदेवारांचा समावेश आहे. यामध्ये कोल्हापुरातून छत्रपती शाहू महाराज, सोलापूरमधून प्रणिती शिंदे, पुण्यातून रवींद्र धंगेकर, नंदुरबारमधून अॅड. गोवाल के. पाडवी, लातूरमधून शिवाजी काळगे, नांदेडमधून वसंत चव्हाण, अमरावतीमधून बळवंत वानखेडे यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. विधानसभेच्या अकोला पश्चिम मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी पक्षाने उमेदवार जाहीर केला असून तेथे साजिद खान पठाण यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. यावेळी अरुणाचल प्रदेशातील २, गुजरातमधील ११, कर्नाटकातील १७, राजस्थानातील ६, तेलंगणातील ५, पश्चिम बंगालमधील ८ आणि पुद्दुचेरीमधील एका उमेदवाराचीही घोषणा करण्यात आली. नुकतीच भाजपकडूनही महाराष्ट्रातील २०…

Read More

जळगाव : प्रतिनिधी धावत्या रेल्वेखाली आल्याने भादली येथील २७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नशिराबाद ते तरसोद फाट्याजवळ गुरुवारी सकाळी ५:३० वाजता उघडकीस आली. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. देवेंद्र रामकृष्ण कोल्हे (वय २७ रा. भादली ता. जळगाव) असे मयत तरूणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र कोल्हे हा तरूण आई, वडील, पत्नी आणि दोन मुलांसह भादली येथे वास्तव्याला होता. शेतीचे काम करून उदरनिर्वाह करीत होता. बुधवारी सायंकाळी ७ वाजता गावात जावून येतो असे सांगून देवेंद्र हा घरातून निघून गेला होता. धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने गुरुवारी सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास नशिराबाद ते तरसोद रेल्वे…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात शेळी बांधण्यावरून काका व पुतण्यामध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली असून, तिघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावात घडलेल्या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, एक तरुण गुरांचा चारा घेऊन घरी आला असता कैलास पाटील यांच्या शेळीने तो चारा खाल्ला. या तरुणाने पाटील यांना शेळी बांधण्यास सांगितले. त्याचा राग येऊन कैलास पाटील यांनी या तरुणास त्याच्या बहिणींना मारहाण केली तसेच मारून टाकण्याची धमकी दिली. तरुणाचे आई-वडील हे संध्याकाळी शेतातून आल्यावर मुलांना झालेल्या मारहाणीचा जाब विचारायला गेल्यावर कैलास पाटील, त्यांची पत्नी रजूबाई व मुलगा उमेश यांनी आई-वडिलांनाही मारहाण केली. तसेच तरुणीचा विनयभंग…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील रेल्वे नॉर्थ कॉलनीत राहणाऱ्या सख्ख्या भावांना रेल्वेमध्ये टीसीची नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून भावांची तीस लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी दि. २० रोजी भुसावळ शहर पोलिसांत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेंद्र प्रकाश संसारे आणि त्यांचा भाऊ सचिन संसारे यांना संशयित आरोपी सागर शिवदास वानखेडे (रा. शांतीनगर) याने रेल्वेमंत्री आणि बड्या रेल्वे अधिकाऱ्यांशी ओळख असल्याची बतावणी केली तसेच रेल्वेत टीसी म्हणून नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी वानखेडे याने संसारे यांच्याकडून २ मे २०१७ ते डिसेंबर २०२३ या काळात वेळोवेळी तीस लाख रुपये घेतले. मात्र रेल्वेत नोकरी मिळाली नाही. आणि…

Read More

मेष : कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या मौजमजा, विरंगुळ्यासाठी वेळ खर्च करा. जे लोक शेअर बाजारात पैसा लावतात आज त्यांना नुकसान होऊ शकते. वेळेवर सचेत राहणे तुमच्यासाठी उत्तम असेल. घरातील आयुष्य शांततापूर्ण आणि मोहक असेल. आज तुमची काही वाईट सवय तुमच्या प्रेमीला वाईट वाटू शकते आणि ते तुमच्याशी नाराज होऊ शकतात. मेहनत आणि सहनशीलता या आधारे तुम्ही उद्दिष्ट गाठू शकाल. पर्यटन आणि प्रवास यामुळे तुम्हाला आनंद मिळेल आणि त्यातून खूप काही शिकायलाही मिळेल. तुमचा/तुमची जोडीदार आज तुमच्यासमवेत अधिक काळ घालवेल. वृषभ : चार भिंती बाहेरील खेळांचे तुम्हाला आकर्षित करतील. ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल. घराच्या दृष्टीने…

Read More

अहमदनगर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक मोठ्या शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच आज गुरुवारी शिर्डी शहरात भरदिवसा गोळीबाराची घटना घडली. भर दुपारच्या सुमारास गोळीबार झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनूसार संशयिताने दोन गोळ्या झाडल्या. शिर्डी पाेलिस घटनास्थळी पाेहचले असून घटनेचा तपास सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डी शहरातील एका खासगी पार्किंगमध्ये आज दुपारच्या सुमारास गाेळीबाराची घटना घडली. संशयिताने झाडलेल्या दोन गोळ्यांपैकी एक गाेळी हॉटेलच्या खाेलीत घुसली. या घटनेनंतर संशयितांना घटनास्थळावरुन धूम ठाेकली. या घटनेनंतर संबंधित हाॅटेल परिसरात आणि शिर्डी शहरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती समजताच शिर्डी पाेलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दिलेल्या माहितीनूसार या घटनेत कोणतीही जिवीत हानी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 चा कार्यक्रम जाहीर केला असून सर्वत्र आदर्श आचारसंहिता सुरू झाली आहे. त्यादृष्टीने आचारसंहितेत करावयाच्या कार्यवाहीला वेग आला आहे. जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या सूचनेनुसार आचारसंहितेची घोषणा झाल्यापासून 72 तासात जळगाव लोकसभा मतदार संघ क्षेत्रातील एकूण 31 हजार 562 विविध राजकीय पक्षांचे बॅनर्स, पोस्टर्स, कट आउट, फ्लेक्स, झेंडे, स्टिकर्स हटवण्यात आले आहेत तर रावेर लोकसभा मतदारसंघातील 20 हजार 166 बॅनर्स, स्टिकर्स, पोस्टर्स, झेंडे, हटविण्यात आले असून कोनशिला झाकण्याची कार्यवाही देखील करण्यात आली असल्याची माहिती आचारसंहिता कक्ष प्रमुखांनी दिली आहे. आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र : विजय पाटील  भारतीय जनता पार्टीने जळगाव लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांना डावलून त्यांच्या जागी स्मिता वाघ यांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून राजकीय घडामोडीत अलिप्त असलेले खासदार पाटील यांच्याबाबत राजकीय वर्तुळांमधून ठाकरे गटाकडून केवळ निवडणूक लढवू शकता अशी चर्चा आता रंगू लागली आहे. याबाबत ठाकरे गटाकडूनही त्यांना संपर्क केला गेल्या असल्याबाबतची ही विश्वसनीय माहिती समोर येत आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपकडून प्रचाराला सुरुवात झाली असून कार्यकारणीच्या बैठकांनाही सुरुवात झाली आहे. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीकडून जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट ही…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकारकडून सामान्य लोकांना पाठवण्यात येणारे विकसित भारताचे मेसेज त्वरीत बंद करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिलेत. निवडणूक आयोगाने निवडणूक आयोगाने यासंदर्भात इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला नोटीसही बजावली आहे. व्हॉट्स अ‍ॅपवर पाठवण्यात येणारे ‘विकसित भारत’चे मेसेज त्वरीत बंद करावेत, ते सामान्य लोकांना हे मेसेज पाठवू नये असे आदेश आयोगाने दिलेत. मेसेज पाठवण्याप्रकरणी मंत्रालयाकडून आचार संहिता अनुपालनााच अहवाल मागवण्यात आलाय. सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची घोषणा आणि आदर्श आचारसंहिता लागू होऊनही नागरिकांच्या फोनवर असे संदेश पाठवले जात असल्याच्या अनेक तक्रारी आयोगाला प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर निवडणूक आयोगाने मेसेज बंद करण्याचे निर्देश दिलेत. आयोगाच्या निर्देशानंतर आयटी मंत्रालयाने आयोगाला उत्तर…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून मनसे लोकसभा निवडणुक लढविण्यासाठी ठाम असतांना नुकतेच राज ठाकरे हे अमित शहा यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेले होते. वास्तविक आमची भूमिका ही आहे की राज ठाकरे यांना सोबत घेण्याची गरज नाही. राज ठाकरेंबाबत भाजप काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल. पण राज ठाकरे युतीसाठी भेटलेले असावेत वाटत नाही. मात्र ते आल्याने फार फायदा होईल, असं मला वाटत नाही. त्यामुळे वरिष्ठ योग्य निर्णय घेतील, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. दरम्यान रामदास आठवले पुढे बोलताना म्हणाले की, काँग्रेसच्या कार्यकाळात कधीही होऊ न शकलेली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रलंबित स्मारके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात…

Read More