लखनौ : वृत्तसंस्था
येथील आठ वर्षांच्या मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी पोलिसांनी एका मौलवीला अटक केली असून त्याच्या भावाचा शोध घेतला जात आहे, असे पोलिसांनी सांगितले.
पोलिस उपायुक्त (पश्चिम) विश्वजीत श्रीवास्तव यांनी सांगितले की, एका व्यक्तीने मलिहाबाद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, ज्यात त्याच्या आठ वर्षांच्या मुलीवर मदरशात शिकवणाऱ्या दोघांनी बलात्कार केल्याचा आरोप केला होता. दोन आरोपींची ओळख मोहम्मद अबेदिन आणि त्याचा भाऊ मोहम्मद अर्शद अशी आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध ‘३७६ ड’ (सामूहिक बलात्कार) आणि पोक्सो कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला, पोलिसांनी बुधवारी अबेदिन आणि पीडितेच्या आईला अटक केली. आमचे पथक दुसरा फरारी आरोपी अर्शदला अटक करण्याचा प्रयत्न करत आहे, असेही त्यांनी सांगितले.
पीडितेचे वडील आखाती देशात काम करतात आणि आठ महिन्यांपूर्वी भारत सोडून गेले होते. त्यानंतर पीडितेच्या आईचे अबेदिनसोबत संबंध आले. दोन आरोपींनी तिच्या मुलीवर बलात्कार केल्याची माहिती महिलेला होती