नागपूर : वृत्तसंस्था देशात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली असून भाजपने राज्यात पहिला अर्ज देखील भरला आहे तर आज केंद्रीय मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे नेते नितीन गडकरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून यापूर्वी त्यांनी आपल्या निवासस्थानी विधिवत पूजा करत मिरवणूकीच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महायुतीच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. नितीन गडकरी यांनी संविधान चौकातून मिरवणुकीला सुरुवात केली असून आकाशवाणी चौकात ते जनतेला संबोधित केले आहे. मिरवणुकीत भारतीय जनता पक्षासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांचा जळगाव व रावेर लोकसभा तथा विधानसभा मतदार संघातील सर्व पदाधिकारी यांचा “विचार विनिमय तथा मार्गदर्शन मेळावा”चे आयोजन करण्यात आले आहे. मिळाव्यात लोकसभा निवडणुकीबाबत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीचे पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट हे सक्रिय झाला आहे. लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवाराबाबत प्रचार व राजकीय रणनीती बाबत मार्गदर्शन व विचारविनिमय हे या मेळाव्यात केले जाणार आहे.प्रमुख मार्गदर्शक मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील उपस्थित असतील.कार्यक्रम शनिवार दि. 30 मार्च सकाळी 11:00 वाजता, लाड वंजारी मंगल कार्यालय, आकाशवाणी चौक येथे होणार आहे. तरी जळगाव लोकसभा…
मुंबई : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीची आचार संहिता जाहीर झाल्यावर देखील महाविकास आघाडीकडून उमेदवारांची घोषणा झाली नसताना आज ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. ठाकरे गटाने जाहीर केलेल्या यादीत १७ नावांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या जागावाटपावर अनेकांचं लक्ष लागलं होतं. काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये काही जागांवरून तिढा होता. यामुळे मागील दोन-तीन दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बैठकांचा सपाटा लावला होता. त्यानंतर आज बुधवारी सकाळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लोकसभा निवडणुकीसाठी १७ उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली. खासदार संजय राऊत यांनी ‘एक्स’ सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली. ‘ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि…
चंद्रपूर : वृत्तसंस्था राहुल गांधींची भारत जोडो यात्रा ज्या राज्यांमध्ये गेली तिथे काँग्रेस फुटली. नेत्यांनी काँग्रेसला सोडले, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी चंद्रपुरात केले. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप व महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या समर्थनार्थ झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, यंदाची लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असा लढा आहे. त्यामुळे मुनगंटीवार यांना दिलेले प्रत्येक मत हे मोदींना दिलेल्या मतासारखे राहणार आहे. माझ्यासाठी साऱ्या जाती समान आहेत. ही निवडणूक जनतेची आहे. माझी लढाई काँग्रेसच्या उमेदवाराविरुद्ध नाही तर विकासासाठी आहे. जात किंवा सहानुभूतीवर नाही तर विकासाच्या मुद्द्यावर मी निवडणूक लढतोय, असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी…
पुणे : वृत्तसंस्था पुण्यातून पर्दाफाश झालेल्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणात महिन्याभरापासून फरार असलेला आरोपी आईला भेटण्यासाठी पुण्यात आला अन् पोलिसांच्या जाळ्यात सापडला. आरोपीला गुन्हे शाखेने अटक केली असून, त्याच्याकडून १० लाखांचे ५१ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. सविस्तर वृत्त असे कि, शोएब सईद शेख (रा. कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो गेल्या एक महिन्यापासून फरार होता. चौकशीत तो फरार काळात जळगाव, पंढरपूर, शिर्डी अशा ठिकाणी फिरत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, तो हैदर शेख याच्यासोबत माल पुरवणे आणि गोडाउनमध्ये ठेवणे तेथून पुढे पाठवणे असे काम करत होता. न्यायालयाने आरोपीला २७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
जळगाव : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जळगाव लोकसभा मतदार संघातील जिल्हा कार्यकारिणी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे व मदत व पुर्नवसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या मान्यतेने जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी जाहीर केली. जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्षपदी संजय पवार, उपाध्यक्षपदी कल्पना पाटील, भूषण सोनवणे, विजय पाटील, डॉ. अशोक पाटील, रमेश पाटील, अनिल शिसोदे, शेख अल्लाउद्दीन शेख चिराउद्दीन, राजधर ठाकरे, डॉ. सुरेश पाटील यांची तर जिल्हा सरचिटणीस म्हणून यशवंत पाटील, धर्मराज पाटील, रणजीत पाटील, चंद्रकांत पाटील, डॉ. भगवान पाटील विशाल महाजन, निंबा पाटील, शिवाजीराव पाटील, प्रकाश महाजन यांची तर चिटणीसपदी रमेश पाटील, किशोर पडोळ, भाईदास महाजन, संजय राठोड, कैलास पाटील, मुश्ताक अहेमद…
धरणगाव : प्रतिनिधी सुखनाथ महाराजांचा दर्शन घेवून परतणाऱ्यांच्या दुचाकीला समोरुन भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वाजता धरणाव चोपडा रस्त्यावर घडली. या अपघातात युवराज काशिनाथ महाजन (वय ५०, रा. विखरण, ता. एरंडोल) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले मच्छिंद्र सिताराम पाटील (वय ५०, रा. विखरण) हे गंभीर जखमी झालेल्यांचा उपचारादरम्यान, मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील वर्डी येथे सुखनाथ महाराजांचा भंडार असल्याने एरंडोल तालुक्यातील विखरण येथील युवराज महाजन व मच्छिंद्र पाटील हे (एमएच १९, ४४९०) क्रमांकाच्या दुचाकीने गेले होते. कार्यक्रम आटोपून ते माघारी येत असतांना धरणगाव चोपडा रस्त्यावरील…
चाळीसगाव : प्रतिनिधी भरधाव बसने कारला दिलेल्या धडकेनंतर झालेल्या भीषण अपघातात कारचालकासह दोघे जागीच ठार झाले, तर १४ प्रवासी जखमी झाले. हा अपघात देवळी गावानजीक मंगळवारी दुपारी घडला. काही जखमींवर चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर दोन गंभीर रुग्णांना धुळे तर एकाला मालेगाव येथे हलवण्यात आले आहे. शरद वासू माळी (३२) व शेख रेहमान शेख बाबू (४०, दोन्ही मालेगाव) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाव आगाराची बस क्रमांक (एमएच १४ बीटी ०३७५) ही • मंगळवारी दुपारी चाळीसगाववरून मालेगावकडे सुसाट वेगाने जात असताना देवळीजवळील वळणावर कार (एमएच ०४ सीटी २४९२) वर समोरून आदळली. अपघातात कार चालकासह एका…
जळगाव : प्रतिनिधी पती व सासरे धार्मिक कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले असताना, घरी असलेल्या जयश्री अमित महाजन (२३, रा. नशिराबाद) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवार, २५ मार्च रोजी नशिराबाद येथे घडली. तीन वर्षाच्या बालिकेच्या रडण्याचा आवाज आल्यामुळे ही घटना उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, खासगी व्यवसाय करणारे अमित महाजन हे त्यांच्या वडिलांसह एका धार्मिक कार्यक्रमासाठी मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथे गेले होते. त्यामुळे जयश्री या तीन वर्षीय मुलीसह घरी होत्या. गल्लीतील मुले धूलिवंदन साजरे करत असताना, जयश्री महाजन यांनी घरात गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या तीन वर्षांच्या मुलीचा रडायचा आवाज आल्याने शेजारील मंडळींनी घरात पाहिले असता, विवाहितेने गळफास घेतल्याचे…
जळगाव : प्रतिनिधी नशिराबाद येथील उड्डाणपुलाजवळ सोमवारी मध्यरात्री झालेल्या एका दुचाकीच्या अपघातात एक तरुण ठार झाला असून, दुसरा गंभीर जखमी झाला. नशिराबाद पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नीलेश गणेश सावंदे (वय ३१, रा. चिंचोली, ता. यावल ह. मु, तुरखेडा, ता जळगाव), असे मयत तरुणाचे नाव आहे. नीलेश सावंदे हा तुरखेडा येथे वीटभट्टीवर मजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, मुले असा परिवार आहे. सोमवारी रात्री तो मित्र प्रदीप पंडित (२९) याच्यासोबत चिंचोली येथून घरी तुरखेड्याकडे जात होता. नशिराबाद उड्डाणपुलाजवळ आले असताना त्याच्या दुचाकीचा अपघात झाला. प्रदीप पंडित याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू…

