Author: editor desk

चाळीसगाव : वृत्तसंस्था  तालुक्यातील मेहुणबारे येथील जामदा फाट्यावर उभ्या असलेल्या २९ वर्षीय तरुणीला बसने जोरदार धडक दिल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी सकाळी सव्वाआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात प्राची महेंद्र पवार (वय २९, रा. नवेगाव, मेहुणबारे) हिचा मृत्यू झाला. घटनेमुळे मेहुणबारे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्राची पवार ही ७ सप्टेंबर रोजी सकाळी चाळीसगाव येथे राहणाऱ्या आपल्या काकूला भेटण्यासाठी घरातून निघाली होती. दरम्यान, जामदा फाट्याजवळ ती उभी असताना धुळ्याकडून येणाऱ्या बसने (एमएच ४९, बीझेड ८२७६) तिला जोरदार धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच प्राचीचे वडील महेंद्र पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी प्राची बेशुद्ध अवस्थेत पडलेली…

Read More

चोपडा : प्रतिनिधी  सण-उत्सव, मिरवणुका व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ध्वनी प्रदूषणास प्रतिबंध करण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. त्याच पार्श्वभूमीवर चोपडा शहरात जाहारवीर गोगाजी महाराज जन्मोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान निर्धारित मर्यादेपेक्षा मोठ्या आवाजात DJ वाजविणाऱ्या चालकावर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली. या DJच्या आवाजाची कमाल तीव्रता तब्बल १२०.९ डेसिबल नोंदविण्यात आली. जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यात सण, उत्सव, मिरवणुका व सार्वजनिक कार्यक्रमांच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासोबतच ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार ६ सप्टेंबर २०२६ रोजी चोपडा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जाहारवीर गोगाजी महाराज जन्मोत्सव मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  पारोळा तालुक्यात रात्रीच्या वेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या ईको वाहनांच्या सायलेंसरमधील मौल्यवान धातू असलेले कॅटॅलिटिक कन्व्हर्टर चोरण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना पारोळा पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान रंगेहात ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी निळ्या रंगाची मारुती वॅगनार, ईको वाहनांचे तीन सायलेंसर, कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमधील मौल्यवान धातूंचे तुकडे तसेच चोरीसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण ६ लाख ३५ हजार रुपयांचा अंदाजे मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील म्हसवे गावाजवळ करण्यात आली. पारोळा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत ईको वाहनांच्या सायलेंसरमधील कॅटॅलिटिक कन्व्हर्टर चोरी करणाऱ्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील एमआयडीसी  परिसरातील ई-सेक्टरमध्ये असलेल्या श्री आनंद बॅटरी कंपनीत झालेल्या चोरीचा M.I.D.C. पोलिसांनी छडा लावला असून सहा आरोपींना जेरबंद केले आहे. आरोपींकडून चोरीस गेलेल्या ९७ हजार ५०० रुपये किमतीच्या शिशाच्या धातूच्या १६ विटा, एकूण ३९० किलो वजनाचा माल तसेच गुन्ह्यात वापरलेली ३० हजार रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल असा एकूण १ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ९ वाजेपासून १ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्रीपर्यंतच्या कालावधीत ही चोरी झाली होती. फिर्यादी लखन वासुदेव बुधानी, रा. कंवर नगर, जळगाव यांच्या मालकीच्या श्री आनंद बॅटरी कंपनीच्या सिमेंट…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  तिसऱ्या मजल्यावर बांधकामाची परवानगी मिळाल्याची खोटे व बनावट कागदपत्रे देण्यासह ताबा दिलेल्या जागेचा परस्पर इतरांशी व्यवहार करत हॉटेल व्यावसायिक व इस्टेट ब्रोकर सुरेश नंदलाल तलरेजा (६३, रा. गणपती नगर) यांची ३ कोटी ७२ लाख रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. हा प्रकार सन २०२१पासून सुरू होता. या प्रकरणी रविवारी (दि. ६ सप्टेंबर) के.पी. इन्फ्रास्ट्रक्चर व त्याचे प्रोप्रायटर, ममता अनिल साहित्या अनिल खूबचंद साहित्या, खुबचंद प्रेमचंद साहित्या, नितीन खूबचंद साहित्या (सर्व रा. मोहाडी रोड), जयराम इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स प्रा. लि. व विशाल रामगोपाल शर्मा (रा. मुंबई) यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या संदर्भात तलरेजा यांनी शहर पोलिस…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील पाळधी येथील शेतात पाणी भरत असताना विजेचा धक्का लागून कैलास संतोष माळी (वय ३५, रा. पाळधी ता, धरणगाव) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास चांदसर रस्त्यावरील शेतात घडली. घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने शेतातील पिकांवर त्याचा परिणाम होत आहे. पिके वाचविण्यासाठी शेतातील विहिरीतून पिकांना पाणी भरण्यासाठी कैलास माळी हा तरुण त्याचे पाहुण्यांसोत उक्त्याने करीत असलेल्या शेतात रविवारी सकाळी शेतात गेला होता. शेतात पाणी भरत असताना त्याला विजेचा जोरदार धक्का बसला आणि…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  पाळधी ते तरसोद सुरु असलेल्या बायपास महामार्गावर एकेरी वाहतुक सुरु आहे. मात्र त्याठिकाणी कोणताही सुचना फलक नसल्यामुळे दुसऱ्या मार्गावरील वाहने देखील तेथून जात आहे. त्यामुळे रविवार दि. ६ सप्टेंबर रोजी दुपारी ट्रेलर व कंटेनरची समोरासमोर धडक दिली. या भीषण अपघातात दोन्ही वाहनांच्या कॅबीनचा चुराडा होवून चालक गंभीर जखमी झाले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती. ही घटना रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तरसोद फाट्याजवळून काही अंतरावर घडली. वर्षभरापुर्वीच तयार झालेला पाळधी ते तरसोद बायपास महामार्ग पहिल्याच पावसामुळे खचला. त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु असून धुळ्याकडून नागपूरकडे जाणारी एकच बाजू वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान,…

Read More

चाळीसगाव  : प्रतिनिधी  पाचोरा तालुक्यातील सामनेर गावाजवळ रविवारी (दि. ६) दुपारी तहसीलदारांचे शासकीय वाहन शासकीय कामानिमित्त जळगावकडून चाळीसगाव येत असताना अपघात झाला. वाहनाच्या स्टेअरिंगमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटून हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. वेळी अपघाताच्या वाहनात केवळ चालक जावेद शेख हेच होते. या दुर्घटनेत त्यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी श्रीराम केअर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच चाळीसगावचे नायब तहसीलदार डॉ. संदेश निकुंभयांनी तत्काळ पाचोरा येथे धाव घेतली आणि जखमी चालकाची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. या अपघातात शासकीय वाहनाचे काही प्रमाणात…

Read More

पारोळा : प्रतिनिधी  तालुक्यातील खेडीढोक येथे भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा तब्बल २ लाख ५७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. शनिवारी दि. ५ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. भरदिवसा घरफोडी झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खेडीढोक येथील शेतकरी सुपडू नारायण पाटील हे पत्नीसमवेत शनिवारी सकाळी सुमारे ११ वाजता घराला कुलूप लावून चिखलोड शिवारातील आपल्या शेतात शेतीच्या कामासाठी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने घरातील स्वयंपाकघरात ठेवलेल्या स्टीलच्या डब्यातील ५० हजार रुपये रोख रक्कम…

Read More

१५ शिक्षकांना पालकमंत्री व मान्यवरांच्या हस्ते जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान जळगाव : प्रतिनिधी  शिक्षक फक्त विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकविणारा घटक नसून त्यांच्या जडणघडणीला आकार देणारा, आत्मविश्वास निर्माण करणारा आणि आयुष्याला योग्य दिशा देणारा आधार आहे. बदलत्या काळात शाळांची पटसंख्या वाढविणे आणि टिकविणे हे आज शिक्षकांसमोरील मोठे आव्हान आहे; मात्र हे आव्हान समर्थपणे पेलण्याची ताकदही आपल्या शिक्षकांमध्येच आहे. तंत्रज्ञानातून माहिती सहज उपलब्ध होऊ शकते; मात्र विद्यार्थ्यांना प्रेरणा, संस्कार आणि माणुसकीची शिकवण देण्याची खरी ताकद शिक्षकातच आहे. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ धडे शिकविण्यापुरते मर्यादित न राहता त्यांच्या आयुष्याला दिशा देणारे ‘भविष्याचे शिल्पकार’ बनावे, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील…

Read More