Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नंदुरबारच्या तरुणीवर जळगावात अत्याचाराचा प्रयत्न !
    क्राईम

    नंदुरबारच्या तरुणीवर जळगावात अत्याचाराचा प्रयत्न !

    editor deskBy editor deskMay 3, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील खोटे नगर परिसरात निर्जनस्थळी नेऊन नंदुरबार जिल्ह्यातील २६ वर्षीय तरुणीवर जळगावातील भागवत गोविंदा चव्हाण (रा. वाघ नगर) याने अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना घडली. तरुणीने विरोध केला असता, तिला जबर मारहाण करून तिचा मोबाइल व कागदपत्रे लांबवली. ही घटना १० एप्रिल रोजी घडली. या प्रकरणी नंदुरबार येथे गुन्हा दाखल होऊन तो जळगाव तालुका पोलिस ठाण्यात ३० एप्रिल रोजी वर्ग करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यातील एक २६ वर्षीय तरुणी खासगी नोकरीसाठी जळगावात राहते. तिची भागवत चव्हाण याच्यासोबत ओळख झाली. त्यानंतर ओळखीचा फायदा घेत १० एप्रिल रोजी रात्री त्याने सदर तरुणीला खोटे नगर परिसरातील निर्जनस्थळी नेले. त्याठिकाणी तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. तरुणीने विरोध केल्यामुळे संशयिताने तिला मारहाण करून पीडितेचा मोबाइल आणि तिची शैक्षणिक कागदपत्रे घेऊन तो पसार झाला. या प्रकरणी पीडितेने नंदुरबार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल झाला व जळगाव तालुका पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भुसावळात शस्त्रसाठा उघड; तरुणाच्या अटकेने सुरक्षा प्रश्न ऐरणीवर

    May 3, 2026

    शॉर्टसर्किटचा कहर; चटई कंपनीपासून तीन कंपन्यांपर्यंत आगीचा फैलाव

    May 3, 2026

    हळदीच्या कार्यक्रमाहून परतताना अपघात, तरुण ठार तर एक जखमी !

    May 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.