जामनेर : प्रतिनिधी गणपती विसर्जनावेळी बुडणाऱ्या लहान मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात एका तरुणाने आपला जीव गमावल्याची दु:खद घटन जामनेरमध्ये घडली आहे. किशोर राजु माळी (२७, रा.गणेशवाडी, जामनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास कांग नदीच्या पुलाखाली गणपतींचे विसर्जन सुरु होते. यावेळी किशोरला एक लहान मुलगा पाण्यात बुडत असताना दिसला, त्याला वाचविण्यासाठी किशोरने पाण्यात उडी मारली. त्या मुलाला त्याने वाचविले. परंतू, किशोरचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. कांग नदी पात्रातून त्याचा मृतदेह काढण्यात आला. किशोरचा मृतदेह उपजिल्हारुग्णालयात आणल्यावर त्याच्या पत्नी व मुलांनी एकच आक्रोश केला. यावेळी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या घटनेने जामनेमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
Author: editor desk
धरणगाव : प्रतिनिधी गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले याचे अजूनपर्यंत शासनाने कुठलीही दखल घेतलेली नाही तर अनुदानही दिलेले नसल्यामुळे धरणगाव तालुक्यातील शेतकर्यांनी तहसीलदार व कृषी अधिकारी यांना निवेदन देवून मागणी केली आहे. गतवर्षी २०२१-२०२२ या वर्षामध्ये गंगापुरी व तालुक्यातील गावामध्ये अतीवृष्टी झाली होती. त्यामुळे सोनवद महसूल मंडळातील गंगापुरी परिसरात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. शासनाने त्याचे नुकसानीचे पंचनामे करून अनुदान देखील तालुक्यातील काही मंडळांना मिळाले पण आपल्या महसूल मडळाला अजून एक पण हफ्ता मिळाले नाही. तालुक्याचे शेतकरी तालुक्याचे नेते राजेन्द्र किसन पाटील यांनी धरणगाव तहसील कार्यालयातील नायब तहसिलदार श्री सातपुते यांना शेतकरी संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. सोबत…
धरणगाव : प्रतिनिधी सोनवद परिसरातील शेतकऱ्यांचे वीज पंपावरील बालू शेठ डीपी खांबावरील विजेचे तार गेल्या चार महिन्यापासून चोरट्यांनी चोरून नेल्या आहे. याप्रकरणी अधिकारी कुठलीही उपाययोजना करीत नसल्याचा तीव्र निषेध शेतकऱ्यांनी आज केला. सविस्तर वृत्त असे की, येथील शेतकऱ्यांचे वीज पंपावरील बालू शेठ डीपी खांबा वरील विजेचे तार गेल्या चार महिन्यापासून चोरट्यांनी चोरी केलेले आहेत. अनेक वेळा शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष भेटून सुद्धा वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करीत आहेत सध्या स्थितीत पावसाने उघडी प दिल्याने शेतकऱ्यांच्या पिकाला पाण्याचे अत्यंत गरज आहे तरी खांब्यावरील तार त्वरित बसून मिळावे अन्यथा शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन केले जाईल असा इशारा परिसरातील शेतकऱ्यांनी भाजपाचे युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष निर्दोष पवार…
पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या महिलेचा मासे विक्रेत्याकडून घरात घुसून विवाहितेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून शंकर अशोक भोई (रा.नगरदेवळा ता.पाचोरा) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार २ सप्टेंबर रोजी ४.३० वाजेच्या पिडिता घरी आंगणात एकटी बसलेली होती. यावेळी गावात नेहमी मासे विक्री करणारा शंकर अशोक भोई (रा. नगरदेवळा ता. पाचोरा) हा आला होता. त्याने मासे हवेत का?, अशी विचारणा केली. त्यावर पिडीत महिलेने पतीला फोन लावून मासे घेण्याबाबत विचारणा केली. परंतू पतीने नकार दिल्यामुळे पिडीत विवाहितेने मासे विकत घेण्यास नकार दिला. त्यावर शंकर भोई याने मासे…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पष्टाणे येथे साडेचार लाखांचे दागिने आणि ४५ हजाराची रोकड असा एकूण तब्बल ५ लाख ५ हजाराचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे. सविस्तर वृत्त असे की, कल्याणे होळ गावातील अनिल वना पाटील यांनी दि. ८ सप्टेंबर रोजी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ६ सप्टेंबरची रात्री ९ ते ७ सप्टेंबरच्या सकाळी ४ वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने अनिल पाटील यांचे बंद घराचे कुलुप तोडुन घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील ४ लाख ६० हजार रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागीने आणि ४५ हजार रुपयाची रोकड असा एकूण ५ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी देखील अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…
अमळनेर : प्रतिनिधी शहरातील मुंबई गल्लीत चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. ही घटना ८ रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास घडली. देविदास उर्फ सूर्यकांत आत्माराम चौधरी असे आरोपीचे नाव असून त्याला रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील वारूळ येथील माहेर असलेल्या योगिता चौधरी हीचा विवाह अमळनेर येथील देविदास उर्फ सूर्यकांत चौधरी याच्याशी झाला होता. बचत गट वाले कर्जाचे पैसे मागणीसाठी तगादा लावत होते, त्यामुळे ८ रोजी योगीताने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनव पती देविदासने केला. अगदी पोलिसात खबर देतांना त्याने आत्महत्यानंतर ती खाली पडून आली…
जळगाव : प्रतिनिधी तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांपैकी दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू घटना घडली आहे. निलेश राजेंद्र मिस्त्री (वय १७) आणि सूर्यवंशी शिवाजी पाटील (वय १५ , दोन्ही रा. भोलानाथ नगर, शिरसोली) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. तर ९ वीत शिक्षण घेणारा जय जालिंदर सोनवणे यातून बचावला आहे. तिघे मित्र शिरसोली येथील भोलानाथ नगरातील रहिवाशी असून ते तलावात पोहण्यासाठी आज दुपारी धारागिरी शिवारात असलेल्या तलावात गेले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा यात बुडून मृत्यू झाला. तर तिसरा थोडक्यात बचावला आहे. घटनास्थळी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचारी आणि पोलीस पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी धाव घेऊन विलास भिल्ल, हिरामण प्रताप भिल्ल,…
चोपडा : प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या तांत्रिक चुकीमुळे एम.एस.डब्ल्यू अंतिम वर्षाच्या वार्षिक परीक्षेत सोशिअल वेल्फेअर अँड सोशिअल जस्टिस या एकाच विषयात सर्वच समाजकार्य महाविद्यालयांचे सर्वच विद्यार्थी नापास झाले आहेत. याशिवाय रूरल अँड ट्रायबल मूव्हमेंट इन इंडिया या विषयाची परीक्षा दिलेले चोपडा येथील भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालयाचे एकाच विषयात ५३ विद्यार्थी नापास दाखविले आहे. सोशल जस्टीस या विषयाचे चोपडा येथील भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालयातील ५३ विद्यार्थी नापास झाले आहेत. क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत समाजकार्य अभ्यासक्रमाचे पाच महाविद्यालय आहेत. विद्यापीठात देखील समाजकार्य विभाग आहे. समाजकार्य महाविद्यालयांचा अंतिम वर्षांचा निकाल १ सप्टेंबरला विद्यापीठाने ऑनलाइन…
जळगाव : प्रतिनिधी गोशामहल विधानसभा मतदारसंघातील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांना 23 ऑगस्ट 2022 या दिवशी अटक करण्यात आली. त्यांच्यावर एका पंथीयांच्या श्रद्धास्थानांचा कथित अवमान केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी न्यायालयाने त्यांना जामीनही दिला आहे. त्यानंतर अन्य एका जुन्या प्रकरणात आमदार टी. राजासिंह यांना पुन्हा 25 ऑगस्ट 2022 या दिवशी अटक करण्यात आली. एकूणच या प्रकरणात आमदार टी. राजासिंह यांना जाणीवपूर्वक लक्ष करून त्रास दिला जात आहे. आता तर त्यांच्यावर ‘पी.डी. ॲक्ट’अंतर्गत गुन्हा नोंद करून त्यांना किमान एक वर्ष जेलमध्ये अडकवून ठेवण्याचा भयंकर कट रचण्यात आला आहे. त्यांना अटक करण्यापूर्वी आणि अटक केल्यानंतर जिहादी प्रवृत्तीच्या धर्मांधांकडून जीवे मारण्याच्या धमक्या…
जामनेर : प्रतिनिधी अज्ञात चोरट्याने बोदवड-पुणे बसमधून एका वृद्ध महिलेची पर्स लांबवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी विजया मधुकर पाठक (वय ७६, व्यवसाय वयोवृद्ध रा. शिव कॉलनी जामनेर) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या संदर्भात अधिक असे की, विजया पाठक ह्या दि. ७ सप्टेंबर रोजी साडेनऊ वाजेच्या सुमारास बोदवड-पुणे बसमधून प्रवास करत होत्या. अज्ञात चोरट्याने त्यांची फिक्कट गुलाबी रंगाची पर्स चोरुन नेली. या पर्समध्ये १६ ग्रॅम वजनाची पोत तसेच साडेनऊ हजार रुपयाची रोकड होती. दरम्यान, याप्रकरणी विजया पाठक यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना राजू तायडे हे करीत आहेत.

