जळगाव : प्रतिनिधी आकाशवाणी चौक परिसरात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोबाईल हिसकावून मोटारसायकलवरून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पकडण्यात आले. पोलिसांनी संशयितांची मोटारसायकल ताब्यात घेत पीडिताचा मोबाईल त्याच्याकडे परत केला. त्यानंतर दोन्ही संशयित व मोटारसायकल पुढील कायदेशीर कारवाईसाठी जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, एएसआय दीपक बनसोडे (ब.नं. २७१०) आणि पोलिस कॉन्स्टेबल भूषण मोरे (ब.नं. ७०२) हे आकाशवाणी चौक येथे वाहतूक पॉईंट ड्युटीवर होते. त्यांची ड्युटी सकाळी ९ ते दुपारी १ आणि सायंकाळी ५.३० ते रात्री ९ वाजेपर्यंत होती. दरम्यान, दत्त मंदिराजवळून एक व्यक्ती जात असताना दोघा इसमांनी त्याला अडवून त्याचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर दोघांनी मोटारसायकलवरून घटनास्थळावरून पळून…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी घटस्फोट झालेल्या पतीसोबतचे फोटो पीडित महिलेसह तिच्या नातेवाईकांच्या व्हाट्सअॅपर पाठवून त्यांची बदनामी केली. ही घटना दि. २८ ऑगस्ट ते दि. ६ सप्टेंबर दरम्यान घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका भागात २६ वर्षीय महिला वास्तव्यास आहे. दरम्यान, त्या विवाहितेचे तिच्या घटस्फोट झालेल्या पतीसोबतचे फोटो तिच्या संमतीशिवाय मानसिक त्रास देवून समाजात बदनामी करण्याच्या उद्देशाने संशयित हा तिच्या नातेवाईकांना पाठवित आहे. तसेच सोशल मीडियावर देखील व्हायरल करीत असल्यामुळे पीडितेची समाजात बदनामी होत आहे. दरम्यान, हा प्रकार लक्षात येताच पीडितेने शनिपेठ पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील प्रॉपर्टी संबंधी गुन्ह्यांना आळा घालण्यासह गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांवर वचक निर्माण करण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिस दलाच्या वतीने ७ सप्टेंबर रोजी संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी “प्रतिबंधात्मक ऑपरेशन ३०५” ही विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत भंगार दुकाने, रेकॉर्डवरील आरोपी, संशयित वाहने तसेच अवैध धंद्यांची तपासणी करून कारवाई करण्यात आली.तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या धडक मोहिमेमुळे गुन्हेगारी वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. या विशेष मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी, संशयित वाहनांची तपासणी आणि भंगार दुकानांची तपासणी करण्यात आली.…
जळगाव मिरर | ९ सप्टेंबर २०२६ चोपडा तालुक्यातील अडावद पोलिस ठाण्याच्या हद्दीत तुरीच्या पिकामध्ये गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. देवझिरी गावातील शेतशिवारात पोलिसांनी छापा टाकून गांजाची तब्बल १७५ झाडे जप्त केली. या कारवाईत देवसिंह बरेला याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देवझिरी गावातील शेतशिवारात गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार डीवायएसपी सुनील पाटील आणि अडावद पोलिस ठाण्याचे प्रभारी एपीआय प्रशांत कंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने संबंधित ठिकाणी ८ सप्टेंबर रोजी कारवाई केली. पोलिसांनी शेताची पाहणी केली असता तुरीच्या पिकामध्ये गांजाची झाडे लावण्यात आल्याचे आढळून आले. कारवाईदरम्यान गांजाची एकूण १७५ झाडे जप्त करण्यात आली. या…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला अवघ्या २०० रुपयाची स्वीकारताना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. भगवान रोहिदास गायकवाड (वय ५१) असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव असून या कारवाईने खळबळ उडाली. तक्रारदार यांनी जामनेर तालुक्यातील त्यांच्या शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी २ सप्टेंबर २०२६ रोजी जामनेरच्या भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. मोजणीनंतर आवश्यक असलेल्या स्कीम पत्रक व टिपण उताऱ्याच्या साक्षांकित प्रती देण्यासाठी लोकसेवक भगवान गायकवाड यांनी ७०० रुपयांची मागणी केल्याची तक्रार ७ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. तक्रारीच्या अनुषंगाने ८ सप्टेंबर रोजी जामनेर येथील भूमी अभिलेख कार्यालयात पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. यावेळी गायकवाड…
जळगाव : प्रतिनिधी तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या नावाने सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर एआय जनरेटेड व्हिडिओ तसेच विविध पोस्ट प्रसारित केल्याच्या प्रकरणाने आता नशिराबादपर्यंत धडक घेतली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी चेन्नई वेस्ट झोन सायबर क्राईम पोलिसांचे पथक नशिराबाद पोलीस ठाण्यात दाखल झाले असून, नशिराबाद येथील होमगार्ड मोहम्मद जुनेद शेख कुतुबुद्दीन (रा. ताजनगर) याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. सी. जोसेफ विजय हे सध्या तामिळनाडूचे मुख्यमंत्री असून (टीव्हीके) या पक्षाचे प्रमुख आहेत. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणात मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने अथवा त्यांच्या ओळखीचा आभास निर्माण करणारे सोशल मीडिया अकाउंट तयार करण्यात आल्याचा संशय आहे.…
जळगाव : प्रतिनिधी दुचाकीच्या डिक्कीतून पकडलेले एफेड्रीन या अमली पदार्थाचे गुजरात कनेक्शन समोर आले असून गांधीनगर येथील सॉफ्टवेअर अभियंता इकरामोद्दीन कुतुबुद्दीन शेख (वय ३१, गांधीनगर, गुजरात) याने जळगावातील पेडलरला हे अमली पदार्थाचा पुरवठा केला होता. त्याला देखील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोग्यासाठी घातक असलेल्या एफेड्रीन या अमली पदार्थाचा १ किलो ९६३ ग्रॅम व गांजाचा २ किलो ११४ ग्रॅमचा साठा दुचाकीच्या डिक्कीत घेवून फिरणाऱ्या नूर मोहम्मद अब्दुल सलाम पटेल याला दि. ३१ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलिसांनी एमआयडीसी परिसरातून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याच्याकडून अमली पदार्थ…
जळगाव मिरर | ८ सप्टेंबर २०२६ पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील सावखेडा रस्त्यावर असलेल्या ‘महासर माता राईस मिल’वर दि. ७ सप्टेंबरच्या मध्यरात्री तहसीलदार व पुरवठा विभागाने अचानक धाड टाकत मोठी कारवाई केली. भडगाव परिसरात रेशनचा ट्रक पकडल्यानंतर या मिलचा काळाबाजार उघडकीस आला. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास झालेल्या या गुप्त कारवाईने महसूल व पुरवठा वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या राईस मिलमध्ये सार्वजनिक वितरण प्रणालीचा (रेशनिंगचा) मोठ्या प्रमाणावर तांदूळ साठवून ठेवल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. शासकीय योजनेतून गोरगरीब व गरजू लाभार्थ्यांसाठी मिळणारे धान्य बेकायदेशीररीत्या गोळा करून ते राईस मिलमध्ये पॉलिश करायचे आणि खुल्या बाजारात चढ्या भावाने विकायचे, असा संशय व्यक्त…
जळगाव : प्रतिनिधी पुर्व वैमानस्यातून चिकन विक्रेते गोपाल मधुकर चौधरी यांच्यावर कोयत्याने हल्ला करीत जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये चौधरी यांच्या डोक्याला, चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. ही घटना रविवार दि. ६ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता बी. जे. मार्केट परिसरात घडली. याप्रकरणी हल्ला करणाऱ्या सुनिल रसाळ राठोड (रा. कांचन नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कासमवाडी परिसरात राहणारे गोपाल चौधरी यांची शहरातील बी. जे. मार्केट परिसरात चिकनची हातगाडी आहे. यापुर्वी गोपाल चौधरी आणि सुनिल राठोड यांच्यात भांडण झाल्यामुळे त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून ते प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहेत. दि.…
जळगाव : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच सणाच्या काळात शांततेला बाधा आणणाऱ्या समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या दृष्टीने पोलिस दलाने धडक कारवाई सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी (७ सप्टेंबर) एकाच दिवसात जिल्ह्यातील पोलिसांच्या रेकॉर्डवरील १४ जणांना हद्दपार करण्यात आले. यापैकी काहींना सहा महिने, तर काहींना एक वर्षासाठी जिल्ह्याबाहेर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या हद्दपारीचे आदेश प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी काढले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात शांतता भंग होण्याची शक्यता असलेल्या तसेच वारंवार गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींवर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. हद्दपार करण्यात आलेल्या १४ जणांमध्ये नशिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सहा,…

