Author: editor desk

गणपती, नवरात्रीच्या सणासुदीत अनावश्यक कारवाई होणार नाही; छोट्या हॉकर्सच्या पोटापाण्याचा प्रश्न सविस्तर चर्चेला.. जळगाव : प्रतिनिधी शहरातील रस्त्याच्या कडेला छोटासा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या हातगाडीवाल्या, फेरीवाल्या आणि छोट्या व्यावसायिकांच्या पोटापाण्याचा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थेट महानगरपालिका आयुक्तांसमोर मांडला. गणपतीचे दिवस, नवरात्रीचा उत्सव आणि आगामी सणासुदीचा काळ लक्षात घेता या काळात छोट्या व्यावसायिकांवर अनावश्यक अतिक्रमण कारवाई करू नये, अशी मागणी मनसेने केली. रस्त्याच्या कडेला उभी असलेली आईस्क्रीमची छोटी गाडी, पाणीपुरीची हातगाडी, भाजीची टोपली, फळांची गाडी, चहा-नाश्त्याचा छोटासा व्यवसाय, फुलांची विक्री, पूजेचे साहित्य, खेळणी, सजावटीच्या वस्तू किंवा अन्य हंगामी वस्तूंची विक्री—हे केवळ अतिक्रमण म्हणून पाहता येणार नाही. त्या प्रत्येक छोट्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ यांना प्रतिष्ठेचा ‘संसद रत्न पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला असून, हा सन्मान त्यांना सलग दुसऱ्या वर्षी मिळाला आहे. संसदेतील प्रभावी उपस्थिती, जनहिताचे प्रश्न सातत्याने मांडणे आणि लोकप्रतिनिधी म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त करताना खासदार स्मिता वाघ यांनी हा गौरव केवळ वैयक्तिक नसून जळगाव लोकसभा मतदारसंघातील जनतेने दाखविलेल्या विश्वासाचा सन्मान असल्याचे सांगितले. संसदेत उपस्थित केलेले प्रश्न, विकासकामांसाठी केलेल्या मागण्या आणि जनहितासाठी घेतलेले विविध पुढाकार यामागे मतदारसंघातील नागरिकांच्या अपेक्षा व समस्या केंद्रस्थानी असल्याचे त्यांनी नमूद केले तसेच “गतवर्षी मिळालेल्या पहिल्या ‘संसद रत्न’ सन्मानाने अधिक…

Read More

जळगाव  : प्रतिनिधी  चोरी करण्याच्या उद्देशाने तोंडाला रुमाल बांधून अंधारात लपून संशयास्पदरीत्या बसलेल्या २० वर्षीय तरुणास चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या गस्ती पथकाने ताब्यात घेतल्याची कारवाई गुरुवारी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास मजरे ते वाघळी रोडवरील वाघळी चौफुलीजवळ करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार,  वाघडली येथील प्रेमराज उर्फ मंगेश शिवाजी सोनवणे (वय २०) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पो.हे.कॉ. संदीप पाटील यांनी फिर्याद दिली आहे. चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथक स.पो.नि. विजय माळी यांच्या नेतृत्वात विभागीय गस्त घालत होते. पथकात पो.हे.कॉ.संदीप पाटील, पो.कॉ. विजय पाटील व चालक पो.कॉ. नितीन कोळी यांचा समावेश होता. गस्तीदरम्यान गुरुवारी पहाटे ३.३० वाजता पथकाचे वाहन मजरे ते…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील गिरणा पंपिग रोड परिसरात मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या एका ६८ वर्षीय सेवानिवृत्त वृद्धाला ‘हरिद्वारचे सिद्ध साधू’ असल्याचा बनाव करून भामट्यांनी हातचलाखीने लुटले. कारमधून आलेल्या दोघांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्धाला जवळ बोलावून त्यांच्या हातातील तब्बल ७० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी काढून ते पसार झाले. ही घटना उघडकीस आल्यानंतर वृद्धाने रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  शहरातील गुलमोहर हौसिंग सोसायटी, गिरणा पंपिंग रोड येथे राहणारे दिलीप बाबूराव सुरवाडे (वय ६८) हे नेहमीप्रमाणे सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मॉर्निंग वॉक संपवून पायी घरी परतत होते. वाघनगर जवळील ‘जय भवानी कॅटरर्स’च्या गोदामासमोर रस्त्यावरून जात…

Read More

फत्तेपूर, ता. जामनेर : जामनेर आगाराची बस शेवगे पिंप्रीकडून जामनेरकडे येत असताना हिंगणे पिंप्री गावापुढे फत्तेपूरकडून हिंगणे पिंप्रीकडे जाणाऱ्या पिकअपला धडकली. यात पिकअप चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना १० सप्टेंबरला सायंकाळच्या सुमारास घडली. जामनेर आगाराची बस (एमएच – १४, बीटी- ३९२०) ही १० सप्टेंबरला सायंकाळी हिंगणे पिंप्री मार्गे जामनेरकडे येत होती. हिंगणे पिंप्री गावापुढे लक्ष्मण रूपचंद भारंबे यांच्या शेताजवळ समोरून येणाऱ्या पिकअप (एमएच – १९, सीएक्स- १८६८) ला बसची धडक बसली. या अपघातात पिकअप चालक मंगल उत्तम नवघरे (रा. कापूसवाडी) तसेच हिंगणे पिंप्री येथील पांडूरंग लालमल काळे व काशिनाथ धोंडू गोपाळ हे गंभीर जखमी झालेत.…

Read More

मागील भांडणाच्या कारणातून हल्ला; शेताजवळच पोटात चाकूचे वार, उपचारापूर्वीच मृत्यू पारोळा : प्रतिनिधी पारोळा तालुक्यातील पळासखेडे बु. येथे जुन्या भांडणाच्या कारणातून १८ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मयुर दुर्वास पाटील (वय १८) असे मयत तरुणाचे नाव असून, या प्रकरणी अंकुश नेहरू पाटील (रा. पळासखेडे बु.) याच्याविरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. १० सप्टेंबर) दुपारी ३ ते ४ वाजेच्या सुमारास पळासखेडे बु. शिवारातील रविंद्र सुकदेव पाटील यांच्या शेताजवळ मयुर पाटील हा त्याचा चुलत भाऊ संदिप विष्णू पाटील याच्यासोबत गावाकडे येत होता. याचवेळी मयुर आणि अंकुश पाटील…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  शहरातील 35 वर्षीय रेल्वे कर्मचारी असलेल्या तरुणाची चाकूचे वार करीत हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना गुरुवार, 10 रोजी रात्री 8.30 वाजेनंतर शहरातील पाटीलमळा भागात घडली. तुषार गोविंद सोनवणे (35, समता नगर, भुसावळ) असे मृताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. खुनाचे स्पष्ट कारण मात्र कळू शकले नाही. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, तुषार सोनवणे हा तरुण भुसावळ रेल्वेत नोकरीला असल्याची प्राथमिक माहिती आहे. गुरुवरी रात्री तुषार हा परिचिताची दुचाकी (एम.एच.19 सी.एच.1405) घेवून पाटीलमळा भागातून जात असताना अल्पवयीन संशयीताशी त्याचा कुठल्यातरी कारणातून वाद झाला व संशयीताने पाठीमागून डोक्याखाली व पाठीवरील भागात चाकूचे सपासप वार केल्याने अतिरक्तस्त्रावाने जागीच तरुणाचा मृत्यू झाला.गुरुवारी रात्री साडेआठ…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  समाजात दहशत निर्माण करणाऱ्यांसह वारंवार गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या अजय तानाजी सोनवणे (भिल) (वय २८, रा. पुनगाव, ता. पाचोरा) व राकेश उर्फ सचिन राजेंद्र चौधरी (वय ३२, रा. पाचोरा) या दोघांना जळगाव, बुलढाणा, धुळे व छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले. आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. पाचोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अजय सोनवणे याच्याविरुद्ध दोन तर राकेश उर्फ सचिन चौधरी याच्याविरुद्ध खूनासह दोन गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यांच्यावरील हद्दपारीच्या कारवाईचा प्रस्ताव पोलीस निरीक्षकांनी पाठविला होता. त्या प्रस्तावाला मंजूर देत दोघांना जळगाव, बुलढाणा, धुळे…

Read More

बोदवड | प्रतिनिधी बोदवड येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयातील कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. शासकीय कर्मचारी नसलेल्या एका व्यक्तीकडे कार्यालयाच्या चाव्या देण्यात आल्याचा, तसेच त्याच्याकडून आवक टपाल स्वीकारून त्यावर कार्यालयीन शिक्का व स्वाक्षरी करून पोच देण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयातील गोपनीय कागदपत्रे, अधिकृत शिक्के आणि कार्यालयीन कामकाजाची जबाबदारी नेमकी कोणाकडे आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचे नाव अमोल सुरेश वराडे, रा. कुर्‍हा पानाचे, ता. भुसावळ असे सांगण्यात येत आहे. संबंधित व्यक्ती यापूर्वी रोजंदारीवर काम करत असल्याचे सांगितले जाते. मात्र १ सप्टेंबरपासून तो कामावर नसल्याचा दावा करण्यात आला आहे.…

Read More

प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत केली तत्पर मदत जळगाव : प्रतिनिधी  पाळधी बायपास रस्त्यावर एका वेगात जाणाऱ्या कंटेनरचा ताबा सुटून तो भीषणरीत्या पलटी झाला. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या अपघातात दोनगाव बुद्रुक येथील कोळी समाजातील एका तरुणाचा जागीच दुर्दैवी अंत झाला. या बातमीने संपूर्ण परिसर सुन्न झाला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताचे वृत्त समजताच, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांनी थेट घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरील हृदयद्रावक दृश्य पाहून मन हेलावून गेले तरीही स्वतःला सावरून पाटील बंधूंनी स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या सहकार्याने तातडीने…

Read More