मुंबई : वृत्तसंस्था विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे वाढते ओझे कमी करून शिक्षण अधिक आनंददायी, सुलभ आणि कृतिप्रधान करण्याच्या दृष्टीने राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. केंद्र सरकारच्या ‘स्कूल बॅग पॉलिसी-२०२०’ची राज्यातील सर्व प्रकारच्या शाळांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार विद्यार्थ्याच्या दप्तराचे वजन त्याच्या शारीरिक वजनाच्या साधारणतः १० टक्क्यांपेक्षा अधिक असता कामा नये, याची काटेकोर दक्षता घेण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी परिपत्रकाद्वारे हे निर्देश दिले आहेत. जड दप्तरामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीचा कणा, खांदे तसेच शारीरिक वाढीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे दप्तराचे वजन कमी करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षणाच्या पलीकडे…
Author: editor desk
नागपूर : वृत्तसंस्था डान्स क्लासला जाण्यावरून झालेल्या घरगुती वादाचे रुपांतर इतके टोकाला गेले की, एका महिलेचा जीव गेला. नागपुरात 38 वर्षीय यामिनी कृष्ण लाल यादव यांचा पतीने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिचा पती कृष्ण लाल यादव (41) याला अटक केली असून त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, यामिनी आणि कृष्ण लाल यादव हे पती-पत्नी असून त्यांना दोन लहान मुले आहेत. यामिनीला आपल्या सोसायटीत सुरू असलेल्या डान्स क्लासला जायचे होते. मात्र त्याच वेळी पती कामावरून घरी आला आणि त्याने स्वतःसह मुलांसाठी जेवण बनवण्यास सांगितले. यामिनीने डान्स क्लासला…
जळगाव : प्रतिनिधी ऑगस्ट महिन्यात मोहाडी (ता. जळगाव) येथे तरुणाच्या आत्महत्येच्या तपासात पोलिसानी धक्कादायक रहस्याचा उलगडा केला आहे. मुलगा दारु प्राशन करुन आई वडिलांना त्रास देत होता. या जाचाला कंटाळून त्याच्या आई वडिलांनी मुलाचा गळफास देत खून केला. तसेच दिशाभूल करण्यासाठी तरुणाने आत्महत्या केली, असा बनाव संशयितांनी केला होता, अशी खळबळजनक माहिती तपासातून समोर आली आहे. याप्रकरणी तरुणाच्या आईवडिलांसह त्याच्या भावाला अटक करण्यात आली आहे. ३१ जुलैला दुपारी दीड वाजेच्या सुमारास राधेश्याम हरचंद राठोड (वय २६, रा. मोहाडी) या तरुणाने दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती. याप्रकरणी सुरुवातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली…
अमळनेर : प्रतिनिधी एका शिक्षिकेला अडवून माझ्याशी लग्न कर असे म्हणत जळोद येथील तरुणाने विनयभंग केल्याची घटना १ रोजी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास मंगळ ग्रह मंदिराच्या पार्किंगसमोरील रस्त्यावर घडली. या संदर्भात पीडित शिक्षिकेने फिर्याद दिली आहे. १ रोजी पावणे तीन वाजेच्या सुमारास त्यांच्या सहकाऱ्यांसोबत आपापल्या दुचाकीने मंगळ ग्रह मंदिराच्या पार्किंग समोरील रस्त्याने जात होते. या वेळी पीडित शिक्षिका ही एका सहकाऱ्यासोबत डबलसीट जात होत्या. या वेळी जळोद येथील हिरालाल ज्ञानेश्वर रायसिंग हा दुचाकीने आला अन् त्याने त्यांची दुचाकी अडवली. त्यानंतर खाली उतरून शिक्षिकेचा हात धरून तू माझ्याशी लग्न कर, असे म्हणत त्यांचा विनयभंग केला. या संदर्भात पीडित शिक्षिकेने घरी…
भडगाव : प्रतिनिधी स्थानिक पत्रकारांच्या प्रसंगावधानामुळे भडगावात शालेय पोषण आहाराचा संशयास्पद तांदूळ घेऊन जाणारी गाडी पकडण्यात यश आले आहे. या धडक कारवाईत भारत बेन्झ कंपनीची ट्रक (एमएच ५२, ०१३८) भडगाव – पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे. या गाडीत ‘विनायक फूड’ असे छापील लेबल असलेल्या सुमारे ३०० तांदळाच्या र गोणी आढळल्या आहेत. ही ट्रक चाळीसगावहून भडगाव मार्गे पाचोऱ्याकडे जात असताना पत्रकारांना न त्यातील साहित्याबाबत संशय आला. वे चाळीसगाव रस्त्यावरील एका पेट्रोल न पंपाजवळ त्यांनी गाडी थांबवण्याचा द प्रयत्न केला. परंतु, चालकाने गाडीचा वेग वाढवून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पत्रकारांनी तत्काळ महसूल व पोलीस प्रशासनाला ही माहिती दिली. दरम्यान, तहसीलदार शीतल सोलट…
आमदार राजूमामा भोळे यांचे विशेष सहकार्य; पत्रकारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी कौतुकास्पद उपक्रम जळगाव : प्रतिनिधी बातमीच्या शोधात शहरापासून ग्रामीण भागापर्यंत दिवसभर दुचाकीवरून धावपळ करणाऱ्या पत्रकार आणि छायाचित्रकारांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने प्रेस फोटोग्राफर फाउंडेशन, जळगाव यांच्यातर्फे महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. फाउंडेशनच्या वतीने जळगाव शहरातील सदस्य, वृत्तपत्रांचे छायाचित्रकार तसेच डिजिटल मीडिया प्रतिनिधींसाठी मोफत अपघाती विमा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत सुमारे १०० पत्रकार व मीडिया प्रतिनिधींचा प्रत्येकी १० लाख रुपयांचा अपघाती विमा काढण्यात आला. त्यामुळे संबंधित पत्रकाराचा अपघाती मृत्यू किंवा विमा योजनेतील नियमानुसार अपघाती दुखापत झाल्यास त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळण्यास मदत होणार आहे. पत्रकारांचे काम हे केवळ कार्यालयापुरते…
अमळनेर : प्रतिनिधी येथील अंबरीष महाराज टेकडीवर प्रेमी युगुलांचा आणि त्यांना लुटणाऱ्या तरुणांचा पो.नि. दत्तात्रय निकम यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. या संदर्भात तीन महिला कॉन्स्टेबलसह दामिनी पथकाला गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अंबरीष महाराज टेकडी असंख्य झाडे लावल्याने ऑक्सिजन पार्क झाला असून जंगलही वाढले आहे. तर, निसर्गरम्य वातावरणात सकाळी आणि सायंकाळी फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पर्यटनस्थळ म्हणून लोक येथे फिरायला येतात. मात्र, शहर व तालुक्यातील तसेच बाहेरगावच्या प्रेमी युगुल दाट जंगलाचा फायदा घेऊन अंबरीष महाराज टेकडीवर दुपारी प्रेमचाळे करायला येतात. हे प्रकार वाढल्याने आजूबाजूच्या परिसरातील टवाळ तरुण अश्लील चाळे करणाऱ्या प्रेमी युगुलांचे गुपचूप फोटो व व्हिडीओ काढून त्यांना…
जळगाव : प्रतिनिधी भारतीय प्रशासन सेवेतील (आयएएस) अधिकारी योगेशकुमार मीना यांची जळगावचे प्रांताधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने गुरुवारी भारतीय प्रशासन सेवेतील दहा अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले. त्यानुसार जळगावचे विद्यमान प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्या जागी योगेशकुमार मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. योगेशकुमार मीना हे सध्या हिंगोली येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. राज्य शासनाच्या नव्या नियुक्ती आदेशानुसार त्यांच्यावर आता जळगाव प्रांताधिकारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ते सोमवारी जळगाव येथे प्रांताधिकारी म्हणून पदभार स्वीकारण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मीना हे २०२४ च्या तुकडीतील भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी असून, त्यांनी बी.टेक.पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. प्रशासकीय सेवेत…
धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव तालुक्यातील रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 09033/34 उधना–मालदा स्पेशल एक्सप्रेसला धरणगाव (DXG) रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. धरणगाव येथे या गाडीला थांबा मिळावा, यासाठी धरणगाव तालुका प्रवासी मंडळाने सातत्याने मागणी, पाठपुरावा आणि प्रभावी प्रयत्न केले होते. प्रवाशांची वाढती गरज, उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या तसेच व्यापारी, नोकरदार, कामगार, विद्यार्थी आणि सर्वसामान्य प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन मंडळाने हा विषय सातत्याने रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला. मंडळाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची अखेर सकारात्मक दखल घेत धरणगावला या महत्त्वाच्या रेल्वे गाडीचा थांबा मंजूर झाला आहे. त्यामुळे धरणगाव व परिसरातील हजारो प्रवाशांना मोठा…
जळगाव : प्रतिनिधी नशिराबाद परिसरातील एका मोठ्या प्रतिष्ठानच्या सुपरवायझरने एका चिकूच्या मळ्यात १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चॉकलेट व खाऊचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत नराधम संशयित आरोपीला जेरबंद केले आहे. सुनील सावके (वय ४२) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, तो नशिराबाद परिसरातील एका मोठ्या प्रतिष्ठानमध्ये सुपरवायझर म्हणून नोकरीला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित सुनील सावके याने १३ वर्षीय पीडित अल्पवयीन मुलीला चॉकलेट व खाऊचे आमिष दाखवून एका चिकूच्या मळ्यात नेले. तेथे त्याने तिच्यावर बळजबरी करत अत्याचार केला. या प्रकारानंतर घाबरलेल्या पीडित मुलीने घरी जाऊन घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. घटनेचे गांभीर्य…

