Author: editor desk

मुक्ताईनगर : प्रतिनिधी शहरातील गोदावरी नगर परिसरातील बंद घरात घुसून चोरी करण्याच्या इराद्याने आलेल्या दोघा अटल चोरट्यांपैकी एकाला पकडण्यात पोलिसांना यश आले. अनेक गुन्ह्यात या चोरट्याचा सहभाग असल्याची माहिती मिळत असल्याने अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रामा अण्णा पवार (वय २७, रा. भोकरदन, जि. जालना) असे या चोरट्याचे नाव आहे. तो गेल्या काही वर्षांपासून अनेक गुन्ह्यात फरार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे ११ डिसेंबरच्या रात्री दोन वाजेच्या सुमारास आरोपी राम अण्णा पवार व त्याचा एक साथीदार अशा दोघांनी गोदावरी नगर परिसरात राहणाऱ्या आरोग्य कर्मचारी जयश्री थेटे यांच्या घरात कडीकोंडा तोडून प्रवेश घेतला होता. या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी नगररचना विभागातील १५ हजारांच्या लाचप्रकरणी सहायक संचालक दिघेश तायडे यांची तिसऱ्या दिवशीही चौकशी करण्यात आली. दुसरीकडे मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे हे बुधवारी संध्याकाळी चौकशीसाठी एसीबीच्या कार्यालयात हजर झाले. त्यांची रात्री उशिरापर्यंत चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. नगररचना विभागातील रचना सहायक मनोज वन्नेरे याला १५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले होते. त्याने महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे व नगररचना विभागाचे सहायक संचालक दिघेश तायडे यांच्या नावाने लाच घेतल्याचे सांगितले होते. दरम्यान, लाचखोर वन्नेरे याने दोन प्रकरणात १५ हजार, तर अन्य जुन्या प्रकरणात चार हजारांची लाच स्वीकारल्याचे संभाषण ध्वनिमुद्रित झाले आहे. या संभाषणातील मजकुरानुसार चौकशीमध्ये विचारणा करण्यात आली. तसेच…

Read More

जळगाव : प्रतिनिधी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या निरीक्षकपदी संदीप भटू पाटील यांची नियुक्ती केली आहे. तसेच जिल्हा पोलिस दलातील १२ सहाय्यक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्याही बदलीचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षकांनी काढले. जनसंपर्क अधिकारी सपोनि शीतलकुमार नाईक यांची शहर पोलिस ठाणे, जिल्हा विशेष शाखेतील अनिल मोरे यांची भुसावळ शहर, राहुल तायडे यांची एमआयडीसी, राहुल मोरे यांची यावल, दंगा नियंत्रण पथकातील नीलेश गायकवाड यांची भुसावळ बाजारपेठ, जामनेर पोलिस ठाण्यातील सागर काळे यांची भडगाव, चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक दीपक जगदाळे यांची डायल ११२ व नियंत्रण कक्ष, एमआयडीसीतील शरद बागल यांची स्थानिक गुन्हे शाखा, नियंत्रण कक्षातील योगेश ढिकले यांची शनिपेठ, शनिपेठ पोलिस ठाण्यातील चंद्रकांत…

Read More

मेष राशी महत्त्वाची कामे पूर्ण झाल्याने उत्साह वाढेल. नोकरीचा शोध पूर्ण होईल. न्यायालयीन प्रकरणातील कोणताही अडथळा मित्राच्या मदतीने दूर होईल. व्यवसायात नवीन सहयोगी मिळतील. शेतीच्या कामात सरकारी योजनेचा लाभ मिळेल. व्यवसायात चांगली स्थिती राहील. उत्पन्नात वाढ होण्याची चिन्हे आहेत. तुमच्या जोडीदाराला नोकरी मिळू शकते. संपत्तीत वाढ होईल. वरिष्ठ नातेवाईकांच्या भेटीची शक्यता आहे वृषभ राशी आज तुम्ही बजेटपेक्षा जास्त खर्च करू शकता. तुम्हाला बँकेकडून कर्ज घ्यावे लागेल. कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या सहवासाचा प्रभाव राहील. व्यवसायात अनावश्यक धावपळ होईल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्याकडून तुम्ही आकर्षित होऊ शकता. कामात दुर्लक्ष करणे त्रासदायक ठरू शकते. आज लाभापेक्षा खर्च जास्त होईल. आवडीच्या वस्तूंची खरेदी सुरू राहील. नवीन…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी ऊसतोडणी कामाच्या निमित्ताने मराठवाड्यातील धाराशिव येथील साखर कारखान्यावर काम करत असताना दुर्दैवी मृत्यू झालेल्या चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे तांडा येथील कांतीलाल देविदास राठोड यांच्या वारसांना आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते ५ लाखांच्या मदतीचा धनादेश आज सुपूर्द करण्यात आला. यावेळी माजी जि.प. सभापती राजेंद्र राठोड, माजी पंचायत समिती सभापती विजय जाधव, माजी कृउबा सभापती कपिल पाटील, संजय गांधी समिती सदस्य दिनकर राठोड, जेष्ठ नेत्या नमोताई राठोड, राम पाटील आदी उपस्थित होते. तालुक्यातील हजारो कुटुंब हे ऊसतोडणीच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याच्या साखर कारखान्यांवर जात असतात. अतिशय जोखमीचे असणारे ऊसतोडणीचे काम करत असताना अपघात होऊन आजवर अनेक ऊसतोड कामगारांना आपला…

Read More

परभणी  : वृत्तसंस्था राज्यातील परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. या पुतळ्यासमोर काचेच्या आवरणात संविधानाची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे. या प्रतिकृतीची काच एका व्यक्तीने फोडली. त्यावरून आंबेडकरी जनता आक्रमक झाली आहे. या घटनेचे परभणीत तीव्र पडसाद उमटलेत. बुधवारच्या परभणी बंदमध्ये आंदोलकांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. तसेच काही गाड्यांचीही जाळपोळ केली. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रशासनाला उपरोक्त इशारा दिला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी परभणीतील संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेतील आरोपींना अद्याप अटक झाली नसल्याचा आरोप केला आहे. प्रस्तुत घटनेतील समाजकंटकांना 24 तासांत अटक करा, अन्यथा परिणामास तयार राहा, असा…

Read More

परभणी  : वृत्तसंस्था राज्यातील परभणीतील बंदला हिंसक वळण लागले आहे. आंदोलकांकडून शहरातील काही दुकानांची तोडफोड करण्यात आली. तर काही ठिकाणी वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. मात्र, जमावाकडून पोलिसांच्या दिशेने दगडफेक करण्यात आली. दंगल नियंत्रक पथकाला पाचारण करण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात आली आहे. दरम्यान, आंदोलकांमध्ये महिलांचा देखील समावेश आहे. अनेक महिला रस्त्यावर उतरल्या. त्यांनीही पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. परभणी बंद असताना जी दुकाने सुरू होती, अशी दुकाने आंदोलकांनी पेटवून दिल्याची माहिती आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात हा प्रकार घडला. परभणी शहर बंद दरम्यान, काही मोर्चेकरी महिला थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या. यावेळी पोलिसांनी त्यांना…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी नाशिक येथील ज्ञानसिंधु प्रकाशन संस्थेचा वतीने येथील तिळवण तेली समाजाचे अध्यक्ष तसेच कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनील पंढरीनाथ चौधरी यांनी सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात केलेल्या कामांची दखल घेत ज्ञानसिंधु प्रकाशन, नाशिक या संस्थेच्या एकदिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलनात त्यांना राज्यस्तरीय ज्ञानसिंधु समाज रत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे लेखी पत्रक संस्थेचा वतीने प्रकाशक व अध्यक्ष तान्हाजी खोडे यांनी सुनील चौधरी यांना दिले. सदर पत्रकात सुनील चौधरी यांना सहकुटुंब दि.२१ शनिवार रोजी ठिक १२ वाजता राणी भवन, अशोक स्तंभ चौक, नाशिक येथे पुरस्कार स्विकारण्यासाठी आमत्रित करण्यात आले आहे. पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे समाज बांधव व…

Read More

जळगाव : प्रतिनिधी दुर्धर आजाराला कंटाळून लीलाधर गोविंदा खडसे (वय ५३, रा. भादली ता. जळगाव) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवार दि. १० डिसेंबर रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील भादली येथील लीलाधार पाटील हे गेल्या काही महिन्यांपासून दुर्धर आजाराने त्रस्त होते. त्यामुळे त्यांनी मध्यरात्री राहत्या घरात गळफास घेतला. मंगळवारी पहाटे पाच वाजता त्यांचा मुलगा गणेश हा झोपेतून उठल्यावर त्याला वडिलांनी गळफास घेतल्याचे दिसले. त्याने वडीलांचा मृतदेह बघताच मनहेलावणारा आक्रोश केला. त्यानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी क्रिकेटचा बॉल घेण्यासाठी सरळ घरात येणाऱ्या तरुणाला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला पोलिसाचा विनयभंग व पोलिसांना अश्लील शिवीगाळ, दमदाटी करण्याचा प्रकार १० रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास शहरातील एका भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी मोईन ऊर्फ मोना सलीम खाटिक (२८) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. परजिल्ह्यातील पोलिस दलात कार्यरत महिला कर्मचारी सुटीसाठी शहरात आली होती. दुपारी तीन वाजता गल्लीत काही मुले क्रिकेट खेळत होती. त्यावेळी क्रिकेटचा बॉल घेण्यासाठी मोईन खाटिक घरात आला. त्याला महिला पोलिसांना रोखले. त्याने तिचा विनयभंग केला. त्यानंतर तेथे आलेल्या पोलिसांनाही शिवीगाळ केली. महिलेच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम ७४,२९६,३५२,३२९ (४) प्रमाणे गुन्हा…

Read More