Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील बीड प्रकरणी आता विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या प्रयत्न करीत असताना बीड प्रकरणात फडणवीस यांना अधिक कठोरपणे वागता आले असते. अजित पवार यांच्या नैतिकतेची तर कमालच म्हणायला हवी. त्यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करायला पाहिजे होते, पण अजित पवारांनी बीडची राष्ट्रवादी पक्षाची कार्यकारिणी बरखास्त केली. हे ढोंग आहे. बीडमध्ये बंदुकीचे राज्य होते. शिवाय लोकांना हालहाल करून मारण्यात आले. उत्तर प्रदेश आणि बिहारात अतीक अहमदसारखे गुन्हेगार याच पद्धतीने वागत व त्यांना राजकीय आश्रय होता. अतीक अहमदची हत्या झाली. बीडमध्ये अतीक अहमदपेक्षा भयंकर लोक राजकीय कृपेने धिंगाणा घालीत आहेत. एका कराडला ‘मोक्का’ लावून हा धिंगाणा कायमचा संपणार नाही. खरा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी मुंबई ते नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. कंटेनर, ट्रक आणि खासगी बस यांचा १५ रोजी पहाटे ३.३४ वाजता अपघात झाला. या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १४ जण जखमी झाले आहेत. मयतात दोघे अमळनेरचे आहेत. तर मुलगी जखमी झाली आहे. तर त्यामधील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई ते नाशिक महामार्गावरील शहापूर येथील पुलावर कंटेनर, ट्रक आणि श्री गणेश राम ट्रॅव्हल्स या खासगी बस एकमेकांना धडकल्याने हा अपघात झाला. महामार्गावर भीषण अपघात झाल्याचे समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळावर धाव घेत तत्काळ मदतीचा हात पुढे केला होता. त्यानंतर ग्रामस्थांनी अपघातग्रस्तांना तत्काळ…

Read More

भडगाव : प्रतिनिधी पेठ भागात वाळूच्या ट्रॅक्टरचालकाने एकाला चक्क गल्लीत टाकून चालू स्थितीत सोडून ट्रॅक्टर वरून पळ काढला. यावेळी ट्रॅक्टर समोर कुणीही नव्हते, अन्यथा अनर्थ झाला असता. सविस्तर वृत्त असे कि, भडगाव येथील पेठ भागात एक वाळूचा ट्रॅक्टर वेगाने जात होते. यावेळी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या ट्रॅक्टरचा पाठलाग सुरू केला. त्यामुळे चालकाने लागलीच रस्ता सोडून ट्रॅक्टर गल्लीत घुसवला. पाठलाग करणाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या भीतीने ट्रॅक्टर चालूच स्थितीत सोडून चालकाने वरून उडी मारली आणि फरार झाला. यावेळी सुरू असलेला ट्रॅक्टर बरेच अंतर विनाचालक गल्लीत चालत गेला. पुढे बांधकामाची खडी पडलेली असल्याने त्या खडीजवळ हा ट्रॅक्टर थांबला. ज्याठिकाणी हा ट्रॅक्टर सोडून चालक पळाला, त्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी भरधाव दुचाकी व कारची समोरासमोर धडक होऊन दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. दुचाकीस्वार तरुण दुचाकीसह शेजारी असलेल्या गटारीत जाऊन पडला व किरकोळ जखमी झाला. ही घटना बुधवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शिवरामनगरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शिवरामनगर परिसरातून एक तरुण दुचाकीने भरधाव वेगाने जात असताना समोरून येणाऱ्या कारची समोरासमोर धडक झाली. यात कारच्या पुढील भागाचा चुराडा झाला. एअरबॅग उघडल्यामुळे कारचालक बालंबाल बचावला. रात्री उशिरापर्यंत पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती.

Read More

जळगाव : प्रतिनिधी पाय घसरून नाल्याच्या पाण्यात पडल्याने सीताबाई मस्तरिया बारेला (५५, मूळ रा. मध्य प्रदेश, ह. मु जळके, ता. जळगाव) या महिलेचा बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (१५ जानेवारी) दुपारी म्हसावद शिवारात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील बजारीया येथील रहिवासी असलेल्या सीताबाई बारेला व पती गेल्या तीन वर्षांपूर्वी रोजगारासाठी जळके शिवारात आले आहेत. शेतात मजुरी काम करून बारेला दाम्पत्य उदनिर्वाह करतात. सीताबाई म्हसावद शिवारात कामासाठी गेल्या असताना पाय घसरून त्या नाल्यात पडल्या व त्यांच्या नाकातोंडात पाणी गेले. ही घटना काही ग्रामस्थांच्या लक्षात आली व त्यांनी घटनेची माहिती महिलेच्या…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था अभिनेता सैफ अली खानवर यांच्या वांद्रे येथील घरामध्ये धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री उशिरा एका अज्ञात व्यक्तीने अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्या मोलकरणीशी वाद घातला. जेव्हा अभिनेत्याने मध्यस्थी करून त्या माणसाला शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने सैफ अली खानवर हल्ला करून त्याला जखमी केले. यानंतर जखमी झालेल्या सैफला गंभीर अवस्थेत लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा एक अज्ञात व्यक्ती सैफच्या घरात घुसला. त्याने अभिनेत्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सैफ अली खान जखमी झाला आहे. त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी…

Read More

मेष राशी आज तुम्हाला जवळच्या लोकांचे सहकार्य मिळेल. सुविधा वाढतील. वाहने आणि इतर संसाधनांना प्रोत्साहन देईल. लाभ आणि प्रभाव वाढत राहील. अति भावनिकता टाळा. बाहेरच्या पदार्थांचे सेवन करू नका. सहकाऱ्यांचा विश्वास जिंकाल. वृषभ राशी नवीन जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. वैयक्तिक बाबींवर लक्ष केंद्रित कराल. कुटुंबाशी जवळीक वाढेल. घरामध्ये शुभ कार्ये होतील. कला आणि साहित्यिक लेखनाशी संबंधित लोक चांगले काम करतील. व्यावसायिकांना उच्च यश मिळू शकेल. मिथुन राशी आज तुम्ही करिअर आणि व्यवसायात व्यस्त असाल. अधिकाऱ्यांशी समन्वय वाढवण्यात रस राहील. समाजात चांगल्या कामासाठी सन्मान मिळेल. आनंदात वेळ जाईल. कलागुण दाखविण्याच्या संधी वाढतील. शुभ कार्यात सहभागी व्हाल. सौंदर्यदृष्टी वाढेल. कर्क राशी लोकप्रियतेत…

Read More

बीड : वृत्तसंस्था गेल्या अनेक दिवसापासून बीड जिल्ह्यातील सरपंच खून व खंडणी प्रकरण देशभर गाजत असतांना आता खंडणी प्रकरणात अटक असलेल्या वाल्मिक कराड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राज्यातील खंडणी प्रकरणातील आरोपी आणि धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराडच्या रिमांडवर आता केज न्यायालयाऐवजी बीड जिल्हा न्यायालयातील विशेष मकोका कोर्टात सुनावणी पार पडली. सुनावणी दरम्यान तपास अधिकाऱ्यांकडून नवनवीन दावे आणि माहिती कोर्टासमोर सादर करण्यात आली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने वाल्मीक कराडला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, एसआयटीने 10 दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. वाल्मीक कराडला विशेष मकोका न्यायालयाने 7 दिवसांची एसआयटी कोठडी सुनावली आहे. मकोका कायद्यांतर्गत ही…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख खंडणी अन् हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर महिन्यात दिले होते. त्यावेळी वाल्मीक कराड हा देशमुख हत्या प्रकरणात आरोपी नव्हता. पण आता त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. परिणामी, मकोकातील तरतुदी व मुख्यमंत्र्यांचे आदेश यामुळे त्याच्या शेकडो कोटींच्या संपत्तीवर टाच येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे वाल्मीक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांची अनेक ठिकाणी एकत्र जमीन असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला होता. त्यानंतर अंजली दमानिया यांनी या प्रकरणात उडी घेत या दोघांच्या जमिनीचा सामायिक सातबाराच X वर पोस्ट केला.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील 100 दिवसांचा कृति आराखडा घोषीत केल्याच्या त्याअनुषंगाने अन्न्‍ सुरक्षा आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक 13 जानेवारी, 2025 रोजी दुरदृश्र्य प्रणालीद्वारे घेतलेल्या बैठकीत अन्न व्यसायिकांचे परवाना/नोंदणी, धडक मोहिम, दुध व दुग्धजन्य पदार्थांचे नमुने, Fostac Training , Hygiene Rating, Eat Right Campus यांचे कामकाज प्रभावीपणे करण्याचे निर्देश दिलेले आहेत. तसेच, भेसळ रोखण्याकरिता व राज्यातील जनतेस उपलब्ध होणा-या दूध व दुग्धजन्य अन्न पदार्थांची गुणवत्ता तपासण्याच्या अनुषंगे संपूर्ण राज्यात दुध व दुग्धजन्य अन्न पदार्थांची सर्वेक्षण मोहिम राबविण्यात येत आहे. 100 दिवसांचा कृति आराखडा अंतर्गत प्रशासनाने अन्न आस्थापनांच्या तपासण्या व नमुने विश्लेषणासाठी घेण्याची…

Read More