मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील सर्व सामान्य जनतेच्या पाल्यांना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी महायुती सरकार अनेक महत्वाचे निर्णय घेत असतांना नुकतेच राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. शालेय शिक्षणात महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार असल्याचा विश्वास देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. त्यात आता राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्नचा अंगीकार करून त्यात राज्याप्रमाणे आवश्यक बदल करण्यासंदर्भातही फडणवीस यांनी सूचना दिल्या आहेत. याबाबत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी माहिती दिली आहे. शिवाय राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रगीता पाठोपाठ राज्यगीत अनिवार्य होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शालेय विभागाची बैठक झाल्यानंतर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून आसाराम महाराज यांना अटक झाल्यानंतर जामीन मिळत नव्हता तर आता राजस्थान उच्च न्यायलयाने मंगळवारी अल्पवयीन अत्याचार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसारामला ३१ मार्चपर्यंत तात्पुरता सशर्त जामीन दिला. त्यानंतर जोधपूरच्या खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या आसारामची रात्री उशिरा सुटका झाली. एक आठवड्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना उपचारासाठी ३१ मार्चपर्यंत जामीन दिला होता. त्यानंतर आसाराम यांच्या वकिलाने उच्च न्यायालयात शिक्षा निलंबित करण्यासंबंधी याचिका दाखल केली होती. न्या.दिनेश मेहता आणि न्या.विनीतकुमार माथूर यांच्या खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेतील समानता पाहून आसारामला तात्पुरता जामीन मंजूर केला. आसारामचा जामीन सर्वोच्च न्यायालयातील ७ जानेवारी रोजीच्या निर्धारित अटी-शर्तीनुसारच आहे. एप्रिल २०१८…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील खेडी येथील सिताराम शंभू रेसीडेन्सी या अपार्टमेंटमधील तीन घरांमध्ये चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. याठिकाणाहून सोने चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण २ लाख ९२ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील खेडी येथील शिवनगरात सिताराम शंभू रेसीडेन्सी अपार्टमेंटमध्ये रविंद्र जगन्नाथ मगरे (वय ४८) हे वास्तव्यास असून त्यांचा खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. त्याच अपार्टमेंटमध्ये त्यांच्या घराच्या खाली समोरासमोर राजेश सिताराम पाली व भगवान बाबूराव माळी हे वास्तव्यास आहे. सोमवार…
जामनेर : प्रतिनिधी लग्न लावून देणाऱ्या मध्यस्थाने तालुक्यातील चिंचोली पिंप्री येथील कुटुंबाची २ लाखात फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. लग्नानंतर ४ दिवसांनी मुलगी व तिच्या मावस बहीणींनी पळ काढला. फत्तेपूर पोलिसांनी याप्रकरणी ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. योगेश काकडे (चिंचोलीपिंप्री) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका महिलेने राजेश शिलवंत (विद्यानगर, ता. जि. बीड) या मध्यस्थाची ओळख करून दिली. ९ रोजी शीलवंत हे मुलगी व तिच्या कुटुंबियांसह चिंचोली पिंप्री येथे आले. मुलीचा सांभाळ मावशीने केल्याचे सांगून त्यांना २ लाख द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानुसार लग्न आटोपल्यानंतर २ लाख देण्यात आले. १४ रोजी योगेश, त्याची पत्नी, मावस बहिणी, मित्र व कुटुंबीय असे…
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील वाघळी येथे अवैध गॅस रिफिलिंगचा अड्डा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून उद्ध्वस्त करण्यात आला आहे. पोलिसांनी भरलेले व रिकामे अशा ९ गॅस सिलिंडरासह वाहनांमध्ये गॅस भरण्यासाठी लागणारे मशीन असा सुमारे ३१ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. याबाबत एकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, वाघळी येथे सर्रासपणे वाहनांमध्ये गॅस भरण्याचे प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा व चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी सोमवारी दुपारी छापा टाकून ९ हजार रुपये किमतीचे सीलबंद स्थितीत असलेले घरगुती वापराचे तीन सिलिंडर, १२ हजार रुपये किमतीचे सहा रिकामे सिलिंडर व १० हजार रुपये किमतीचे गॅस वाहनांमध्ये भरण्यासाठी लागणारे प्रेशर…
जळगाव : प्रतिनिधी नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दर्शन शिंपी (१९, रा. आशाबाबानगर) याच्यासह अल्पवयीन मुलावर शनिपेठ पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून पाच हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई सोमवारी (१३ जानेवारी) पुष्पलता बेंडाळे चौकातील नशिराबाद रिक्षा थांब्याजवळ करण्यात आली. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सविस्तर वृत्त असे कि, बंदी असतानाही नायलॉन मांजाची विक्री होत असल्याने पतंग विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये तपासणी करून कारवाई केली जात आहे. ही कारवाई टळावी म्हणून एकाने रस्त्यावर नायलॉन मांजा विक्री सुरू केली. शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना माहिती मिळाली. त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार सपोनि साजीद मन्सुरी, पोउनि योगेश…
जळगाव : प्रतिनिधी अवैध वाळूचा उपसा व वाहतूक सुरूच असून शहर व परिसरातून वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करीत डंपर व ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. यामध्ये मेहरुण परिसरातून वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर एमआयडीसी पोलिसांनी तर रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून वाळू वाहतूक करणारे एक डंपर डीवायएसपींच्या पथकाने जप्त केले. सविस्तर वृत्त असे कि, मेहरुण परिसरातील पिरजादे वाडा परिसरातून वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर (एमएच १९, डीव्ही ८५०६) एमआयडीसी पोलिसांनी पकडले. चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याने ट्रॅक्टर जप्त केले. याप्रकरणी पोकों गणेश ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दत्तात्रय बडगुजर करीत आहेत. रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या…
मेष : सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला लक्षणीय यश मिळवून देईल. नातेवाईकांशी संबंध अधिक मजबूत होतील. मालमत्ता किंवा वारसा संबंधी काही कामांमध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता. भावांसोबतचे संबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्या. तुमची कार्यशैली आणि योजना तुमच्या व्यवसायाला चालना देऊ शकते. वृषभ : राजकीय आणि सामाजिक कार्यात तुमची आवड वाढेल. नवीन वाहन खरेदीबाबत योजना असेल. काही उधार दिलले पैसे परत मिळाल्याने आर्थिक समस्या सोडवता येते. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. मिथुन : आज तुम्ही नाविन्यपूर्ण गोष्टी करण्याचा प्रयत्न कराल. तुमचा मानसिक आणि शारीरिक थकवा दूर होईल. एखाद्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी, त्यांच्या सर्व स्तरांचा काळजीपूर्वक विचार करा. अन्यथा कोणीतरी तुमच्या…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात २६ जानेवारी २०२५ रोजी नवीन जिल्ह्यांची घोषणा होणार आहे. राज्यातील ३५ जिल्ह्यांपैकी अनेक जिल्ह्यांचे विभाजन होऊन २२ नवीन जिल्ह्यांची निर्मिती प्रस्तावित आहे.२०१८ मध्ये मुख्य सचिवांच्या समितीने २२ नवीन जिल्हे व ४९ नवीन तालुके तयार करण्याचा प्रस्ताव मांडला होता. राज्यातील सध्या अस्तित्वात असलेल्या ३५ जिल्ह्यांपैकी अनेक जिल्ह्यांचे विभाजन करून हे नवीन जिल्हे तयार करण्यात येणार आहेत. यामुळे प्रशासन अधिक सुलभ होईल तसेच स्थानिक पातळीवर विकासाच्या प्रक्रिया गतिमान होतील, असा सरकारचा विश्वास आहे. महाराष्ट्राची स्थापना १ मे १९६० रोजी झाली, त्यावेळी फक्त २५ जिल्हे अस्तित्वात होते. कालांतराने जिल्ह्यांची संख्या वाढत गेली. उदाहरणार्थ, २०१४ मध्ये ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्ह्याची…
जळगाव : प्रतिनिधी मंत्री पाटील यांनी जळगाव तालुक्यातील सिंचन प्रकल्प, औद्योगिक वाढ, आणि आरोग्य सेवांच्या विस्तारावर भर देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, आणि नगरपालिका निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहणे गरजेचे आहे. तुमच्या मेहनतीमुळेच मी आज ६०हजार मताधिक्याने निवडून आलो आहे. कार्यकर्त्यांची श्रीमंती हेच माझे खरे बळ आहे. “रस्ते, पाणीपुरवठा, आणि मूलभूत सुविधा ही विकासाची खरी ओळख आहे. गाव विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी कार्यकर्त्यांनी नम्रतेने व प्रामाणिकपणे काम करावे. तुमच्या पाठीशी हा भाऊ नेहमीच भक्कमपणे उभा आहे, आपल्या सर्वांच्या प्रेमाने आणि विश्वासाने मला जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली असून, यापुढेही ती विश्वासार्हता कायम ठेवण्याचा माझा निर्धार आहे,”आपला विश्वास…

