जळगाव : प्रातिनिधी भुसावळ शहरात शुक्रवारी सकाळी डीडी कोल्ड्रिंग्सच्या दुकानामध्ये गोळीबार करुन खुनाची घटना घडली होती. याप्रकरणी भुसावळ पोलिसांनी या खुनाचा छडा लावला आहे. पोलिसांनी जलदगती तपास करत या प्रकरणातील 5 संशयित आरोपींना अटकेत घेतले आहे. तसेच त्यांच्याकडून 4 पिस्तूल अन् 3 काडतूस जप्त करण्यात आली आहे. त्याच्यावर भुसावळ पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील मयत तेहरीम अहमद नासीर अहमद हा त्यांच्या साथीदारांसह शालीमार हॉटेमध्ये चहा घेण्यासाठी गेला होता. यावेळी सकाळी साडेसात वाजता तनवीरवर गोळीबार करण्यात आला या गोळीबारामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. या गोळीबारामध्ये संशयित आरोपी तनवीर माजीद पटेल, अनवर पटेल, रमीज पटेल, शेख साहील शेख…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील प्रयागराजमध्ये आजपासून (दि.13) महाकुंभमेळ्यास प्रारंभ होत असून पौष पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर पहिले शाही स्नान होणार आहे. दुसरे शाही स्नान मकर संक्रांतदिनी (दि. 14) होणार आहे. शाही स्नानाआधीच 25 लाख भाविकांनी पवित्र संगमात डुबकी घेतली. रोज दोन कोटींहून अधिक भाविक महाकुंभला भेट देण्याची शक्यता आहे. महाकुंभ सुरू झाला आहे. आज पौष पौर्णिमेला पहिले स्नान आहे. यावेळी १ कोटी भाविक संगमात स्नान करणार आहेत. संगम नाक्यावर दर तासाला २ लाख लोक स्नान करत आहेत. आजपासूनच भाविक ४५ दिवसांच्या कल्पवासाला सुरुवात करणार आहेत. संगम नाक्यासह सुमारे 12 किमी परिसरात स्नान घाट बांधण्यात आला आहे. संगमावर सर्व प्रवेश मार्गांवर भाविकांची…
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील देवळी येथील एका प्रौढावर तलवार व चाकूने वार करून त्यांना जिवे ठार मारण्याच्या प्रयत्न करणाऱ्या दोघांना मेहुणबारे पोलिसांनी अटक केली असून त्यात एक अल्पवयीन असल्याने त्याची बालगृहात रवानगी करण्यात आली आहे. पोलिसांनी तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे हा गुन्हा उघडकीस आणला आहे. चाळीसगाव तालुक्यातील देवळी येथील अशोक रघुनाथ गायकवाड (६०) हे ४ जानेवारीला रात्री ११:३० वाजता घरात झोपले होते. त्यावेळी दोन अज्ञातांनी तोंडाला रुमाल बांधून घरात मागील दरवाजाने प्रवेश केला. या दोघांनी अशोक गायकवाड यांच्यावर तलवार व चाकूने वार करून त्यांना गंभीर जखमी केले होते. यात त्यांच्या डोक्याला अन् दोन्ही गाल व हाताला गंभीर इजा झाली…
जळगाव : प्रतिनिधी कपडे खरेदी करण्यासाठी आलेले ग्राहक एकमेकांकडे बोलविण्याच्या कारणावरून जोरदार हाणामारी होऊन दगड, काठीने एकमेकांना मारहाण करण्यात आली. यात दोन्ही बाजूंकडील व्यावसायिकांना दुखापत झाली. ही घटना शनिवारी (दि. ११) टॉवर चौक परिसरातील काँग्रेस भवनसमोर घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारींवरून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, व्यावसायिक सतीश चंद्रप्रकाश भैरवानी (३१, रा. न्यू बी. जे. मार्केट परिसर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, काँग्रेस भवनसमोरील जैन मंदिरानजीक त्यांच्या हातगाडीच्या शेजारी असलेल्या अशोक रमेश माळी यांच्या हातगाडीसमोरील ग्राहक कपडे घेण्यासाठी त्यांच्याकडे आले असताना माळी याच्यासह त्याचा भाचा व बहीण तेथे आले व त्यांनी…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील हरिविठ्ठलनगर येथील घरी पायी जात असलेले भरत जगन सोनवणे (रा. हरिविठ्ठलनगर) यांच्या कमरेत लाथा मारत गटारीमध्ये पाडून दगडाने मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी (११ जानेवारी) रात्री हरिविठ्ठलनगरात घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भरत सोनवणे हे शनिवारी रात्री पायी घरी जात असताना लाकडी वखारीजवळ मागून एक अनोळखी आला व त्याने कमरेत लाथ मारली. त्यामुळे सोनवणे हे गटारीत पडले. ते उठत असताना दोनजणांनी डोक्यात दगड मारून दुखापत केली. याप्रकरणी भरत सोनवणे यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
मुक्ताईनगर : प्रतिनिधी कांद्याची रोपं आणण्यास गेलेल्या पती-पत्नीच्या मोटारसायकलला अज्ञात भरधाव वाहनाने जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात रुईखेडा तालुका मुक्ताईनगर येथील मोटारसायकल स्वार वृद्ध पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी सायंकाळी रणथम फाट्यानजीक घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुक्यातील रूईखेड येथील निना ज्ञानदेव नारखेडे (वय ६५) व सुनीता निना नारखेडे (५९) हे पूर्णाकाठावरील दूधलगाव येथे साडूभावाकडे कांद्याचे रोप घेण्यासाठी गेले होते. परतीच्या मार्गाने रुईखेड येथे घराकडे जाताना रणथम फाट्यानजीक त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली, त्यात दोघे पती- पत्नीचा मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, महामार्गावर भरधाव वाहने नेण्याचे प्रकार वाढले आहेत. या वाहनधारकांमुळे मात्र अनेकांना…
जळगाव : प्रतिनिधी पत्नी बाहेरगावी व मुलगा बाहेर गेलेला असताना लीलाधर कौतिक पाटील (४६, रा. कुसुंबा, ता. जळगाव) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (१२ जानेवारी) दुपारी कुसुंबा येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या काही वेळ अगोदर मुलगा मोबाईल घेण्यासाठी घरात आला असताना, त्याला बाहेर पाठवून पाटील यांनी गळफास घेतला. काही वेळाने मुलगा घरात गेल्यानंतर त्याला वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. बांधकामाच्या ठिकाणी काम करणारे लीलाधर पाटील यांच्या पत्नी बाहेर गावी गेलेल्या होत्या तर ११ वर्षीय मुलगा बाहेर खेळत होता. याप्रकरणी लीलाधर पाटील यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले.
मेष : आजचा दिवस अनुकूल आहे. दिवसाच्या सुरुवातीलाच केलेल्या नियोजनामुळे तुम्हाला नक्कीच यश मिळेल. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक कामांमध्येही यश लाभेल. उत्पन्नाबरोबर खर्चही वाढेल. बाहेरील लोकांना तुमच्या वैयक्तिक बाबींमध्ये हस्तक्षेप करू देऊ नका. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आरोग्य चांगले राहील. वृषभ : आज नातेवाईकाकडून चांगली बातमी मिळाल्याने कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होईल. गुंतवणूक करण्यासाठी योग्य वेळ. अति आत्मविश्वासामुळे नुकसान होवू शकते, याची जाणीव ठेवा. तुमची ऊर्जा सकारात्मक पद्धतीने वापरा. चांगले काम करत रहा. पती-पत्नीचे नाते मधूर राहिल. सांधेदुखीचा त्रास असणार्यांनी काळजी घ्यावी. मिथुन : आज कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला आणि मार्गदर्शन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. काही काळापासून कुटुंबात सुरू असलेले गैरसमज कोणाच्या तरी हस्तक्षेपाने…
बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येला एक महिना उलटला आहे. मात्र अद्याप याप्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. त्यातच आता वाल्मिक कराड याचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आला आहे. बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणाची चौकशी सुरु झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे आदेश दिले होते. बीडमधील अनेक तरुणांचे बंदूक हातात घेताना, बंदुकीतून गोळ्या झाडतानाचे फोटो व्हायरल होत आहेत. यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी सातत्याने केली जात होती. यानंतर देवेंद्र फडणवीसांनी बंदुकीसोबत ज्या कोणाचे फोटो आहेत, त्यांचे परवाने रद्द करा, असे आदेश दिले होते.…
ठाणे : वृत्तसंस्था राज्यात गेल्या तीन दिवसपासून महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे सुरु झाल्यानंतर आज महायुतीचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर चांगलीच टीकास्त्र सोडले आहे.एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात एका कार्यक्रमात माध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडीवर जोरदार टोलेबाजी केली. सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने रंग बदलणारे मी पाहिले नाहीत, असा खोचक टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. तसेच बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावरूनही उद्धव ठाकरेंना सुनावले. बाळासाहेबांचे स्मारक हे कुणाच्या मालकीचे नाही, ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना कार्यक्रमाला बोलावणार नाही, असे ते म्हणाले. राज्यात सरकार स्थापन झाल्यापासून भाजप आणि ठाकरे गटाची जवळीक वाढत असल्याचे दिसून येत आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे…

