Author: editor desk

परभणी : वृत्तसंस्था राज्यातील परभणीमध्ये वसमत रोडवर दोन गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आहे. सिलिंडरचा स्फोट होऊन जवळपास 1 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना शनिवारी (काल) रात्री 12 वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार परभणी येथील वसमत रस्त्यावर शिवशक्ती अपार्टमेंट समोर तुलसी या उपहारगृहासमोर एक वडापावची गाडी आहे. या गाडीत ठेवलेल्या दोन गॅस सिलेंडरचा शनिवारी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास एका पाठोपाठ दोन मोठे स्फोट झाल्याची माहिती आहे. वसमत रस्त्यावर एक वडापावचा गाडी आहे. त्या गाडीच्या चालकाने नेहमीप्रमाणे आपले व्यवहार आटोपून रात्र घर गाठले, परंतु रात्री सव्वा बाराच्या सुमारास या स्टॉलमधील एका सिलेंडरचा अचानक मोठा स्फोट…

Read More

नशिराबाद : प्रतिनिधी येथील ताजनगर परिसरात वीज वितरण कंपनीच्या भरारी पथकाने अचानक घरांची पाहणी व चौकशी केली. त्यात अनधिकृतपणे वीज चोरी करणाऱ्या सात जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये सुमारे सव्वा दोन लाखांची वीज चोरी उघडकीस आली आहे, अशी माहिती सहायक अभियंता पवन वाघु‌ळदे यांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, महावितरणने शहरातील थकबाकीदार तसेच वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. शनिवारी ताजनगर परिसरात सुमारे ५० घरांची वीज तपासणी केली. त्यात सात ठिकाणी अनधिकृतपणे, वीज सुरू असल्याचे निदर्शनास आले. लागलीच त्यांचे वीज कनेक्शन खंडित करून वीज मीटर जप्त करण्यात आले आहे. ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला, अशा ठिकाणी सुद्धा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी कांदा विक्री करून मिळालेले २२ हजार २०० रुपये घेऊन घरी जाण्यासाठी बसमध्ये चढताना नरेंद्र युवराज पाटील या शेतकऱ्याच्या खिशातून रोकड लांबविल्याची घटना शनिवारी (दि.११) टॉवर चौकात घडली. काही अंतरावर बस गेल्यानंतर ही घटना शेतकऱ्याच्या लक्षात येताच बस शहर पोलिस ठाणे परिसरात आणली. याठिकाणी पोलिसांनी बसमधील प्रवाशांची तपासणी केली, मात्र, रक्कम सापडली नाही. त्यामुळे बस पुढील प्रवासासाठी मार्गस्थ करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील शेतकरी नरेंद्र पाटील यांनी शनिवारी बाजार समितीमध्ये कांदा विक्रीसाठी आणला होता. कांदा विक्री केल्यानंतर त्यांना २२ हजार २०० रुपये मिळाले होते. ही रक्कम घेऊन ते टॉवर चौकात आले या ठिकाणी ते यावल…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडत असतांना नुकतेच बँकेतून काढलेली रक्कम दुचाकीच्या डिक्कीत ठेवून शेख शोएब शेख शकील (२८, रा. पिंप्राळा) हे एका ठिकाणी थांबलेले असताना डिक्कीतून चोरट्याने एक लाख रुपयांची रोकड ठेवलेली पिशवी चोरून नेली. ही घटना १० जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्राळा परिसरातील शेख शोएब शेख शकील हे एका खासगी वित्तीय संस्थेत (फायनान्स बँक) नोकरीला आहेत. १० जानेवारी रोजी त्यांनी काव्यरत्नावली चौकातील एचडीएफसी बँकेतून ८३ हजार रुपये काढले व त्यांच्याजवळील १७ हजार रुपये असे एकूण एक लाख रुपये एका पिशवीत ठेवले. ती पिशवी दुचाकीच्या डिक्कीत…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी विवाह होण्यापूर्वीच आपल्या होणाऱ्या पत्नीशी ती अल्पवयीन असताना शारिरीक संबंध ठेवल्याने तसेच ती गर्भवती राहिल्याने युवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन युवतीचे एका युवकासोबत लग्न जुळले होते; परंतु विवाह होण्याआधी युवकाने अल्पवयीन युवतीशी शारीरिक संबंध ठेवल्याने ती गर्भवती राहिली होती. याप्रकरणी धरणगाव पोलिसात भारतीय न्याय संहिता कलम ६४सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलम-४, ८, १२ प्रमाणे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आरोपी किशोर रामलाल मालचे यास धरणगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या…

Read More

रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील वडगाव-वाघोदा गावाजवळ ट्रकने धडक दिल्याने शेख हाजीद शेख सादिक (५०) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. शेख हाजीद यांच्या मुलाचे लग्न दोन दिवसांवर आहे. त्याच कामानिमित्त ते विवरे येथे असतानाही शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, रावेरकडून भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच १८ बीजी ९४२१ ने वाघोद्याकडून येणाऱ्या दुचाकी क्रमांक एमएच १९ डीई ७२१० ला जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार शेख हाजीद शेख साजीद यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी सावदा पोलिस स्टेशनचे सह पोलिस निरीक्षक विशाल पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटना स्थळाची पाहणी करून मयतला रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.

Read More

मेष राशी विविध कामे वेळेत पूर्ण करण्यावर तुमचा भर राहील. कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. नोकरीत प्रगती होईल. नवीन मित्रांसोबत पर्यटनस्थळी आनंद लुटाल. शेअर्स आणि लॉटरीमधून पैसे मिळवणे शक्य आहे. कोणत्याही राजकीय क्षेत्राशी संबंधित एखाद्या विशेष व्यक्तीकडून तुम्हाला सहकार्य आणि कंपनी मिळेल. वृषभ राशी करियर आणि व्यवसायात नवीन लोक सहकारी बनतील. सरकारी योजनांचा लाभ मिळेल. तुम्हाला खरेदी-विक्रीमध्ये मोठे यश मिळेल. इच्छित रोजगार मिळेल. बांधकामाच्या कामाला गती मिळेल. लांबचे प्रवास किंवा परदेश प्रवासाचे योग येतील. मिथुन राशी आज व्यावसायिक बाबी सावधपणे आणि समजून घेऊन पुढे जाव्या लागतील. नफ्यापेक्षा खर्च जास्त होईल. आवडीच्या वस्तूंची खरेदी सुरू राहील कर्क राशी आज आत्मविश्वासाने तुम्ही महत्त्वाची…

Read More

परभणी : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर अपघातासह आग लागल्याच्या घटना घडत असतांना नुकतेच गंगाखेड आगाराची लातूर – परभणी बसला गंगाखेड वरून परभणीला जात असताना दैठणा गावाजवळ अचानक आग लागली. चालक मुंडे यांनी बस थांबवल्याने डिझेल टाकीकडे जाणारी आग आटोक्यात आली. यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. ही घटना आज (दि.९) सकाळी ९: ३० च्या दरम्यान घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, गंगाखेड आगाराची बस (एम एच 20 बी एल 2691) लातूर येथे मुक्कामी असते. ही बस कोद्री मार्गे गंगाखेडहून परभणीला आज पहाटे 5 च्या दरम्यान निघाली होती. सकाळी 9:30 च्या दरम्यान दैठणा गावाजवळ चालक महादेव मुंडे यांना डिझेलचा अधिकच वास येत असल्याचे…

Read More

बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सात आरोपींना मकोका लावण्यात आला आहे. मात्र उरलेल्या आठव्या आरोपीला सुद्धा मकोका लावला पाहिजे. त्याच्यावर देखील 302 चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. या हत्येमध्ये आका सुद्धा आहे. तोच मेन असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना कडक शिक्षा करण्याच्या मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी धस बोलत होते. या प्रकरणातील वरच्या आकाने 19 ऑक्टोंबर रोजी स्वतःच्या सातपुडा या बंगल्यावर बैठक घेतली. त्यामुळे तो यामध्ये आरोपी का नाही? असा सवाल धस यांनी उपस्थित केला. संतोष…

Read More

सोलापूर : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मीक कराड मोठ्या अडचणीत फसले असतांना आता त्यांच्या मुलाचा प्रताप उघडकीस आला आहे. वाल्मीक कराडचा मुलगा सुशील कराडने मॅनेजरला धमकावून मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी सोलापूर जिल्हा कोर्टात तक्रार दाखल करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान सुशील कराडकडे मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीच्या घरात घुसून लूट केल्याची तक्रार असल्याचे अर्जात म्हटले आहे. दोन ट्रक, दोन कार, परळीतील प्लॉट आणि सोने लुटल्याची तक्रार सुशील विरोधात आहे. त्यामुळे आता त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी मॅनेजरच्या पत्नीने तिघांविरोधात…

Read More