Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी सोन्यामध्ये गुंतवणूक करून अधिकचा नफा मिळविण्याचे आमिष दाखवून पोलिस दलातील सहकाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या अर्चना पाटील या निलंबित महिला पोलिस कर्मचारीने खासगी नोकरदारांचीही फसवणूक केल्याचे समोर आले आहे. तिने ललिता दीपक येशे (४०, रा. चौघुले प्लॉट) या महिलेला चार लाखांनी गंडविले आहे. याप्रकरणी अर्चना पाटीलविरुद्ध फसवणुकीचा रामानंदनगर पोलिसांत दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. सविस्तर वृत्त असे कि, ललिता येशे यांची फेब्रुवारी २०२४ मध्ये एका ब्युटीपार्लरमध्ये अर्चना पाटीलसोबत ओळख झाली. त्यानंतर ललिता येशे यांनाही नफ्याचे आमिष दाखवून चार लाख रुपये घेतले. त्या बदल्यात सहा महिन्यांत ते दुप्पट करून देण्याचे आमिष दाखविले. सहा महिन्यांनंतरही पैसे परत न मिळाल्याने पाठपुरावा केल्याने…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी घरगुती गॅस काळा बाजार व त्यासाठी लागणारे साहित्य व साधनासह विक्री करणाऱ्या दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून २७सिलिंडरसह जवळपास दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी ही कारवाई केली. सविस्तर वृत्त असे कि, शेख नौशाद शेख नजीर (३१, रा. नसरवंजी फाईल, भुसावळ) आणि रिक्षाचालक निलेश सुरेश चौधरी, (रा. पंढरीनाथ नगर, भुसावळ) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोन जणांची नावे आहेत. शहरातील नसरंवजी फाईल, शिवाजीनगर भागात हा प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. ही कारवाई पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, परिविक्षाधीन उपविभागीय पोलिस अधिकारी केदार बारबोले, स्थानिक गुन्हे…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात ७४ वर्षीय आजोबांनी आपल्याच ८ वर्षीय नातीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील एका गावातील ८ वर्षीय अल्पवयीन मुलगी दि. ७ रोजी दुपारी ३:३० ते ४ वाजेच्या सुमारास क्लासवरून घरी परतत होती. त्यावेळी आरोपी आजोबाने (वय ७४) या बालिकेला आपल्या खळ्यात नेत तिचा विनयभंग केला. पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी घटनास्थळी पाहणी केली. आरोपीच्या विरोधात अल्पवयीन बालकांचे लैंगिक शोषण कायदा कलम ७४, ११, १२ प्रमाणे गुन्हा दाखल केला. आरोपीला दि. ८ रोजी न्यायालयात हजर केले असता, त्यास…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी शहरातील देशमुख वाडी भागातील एका घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. त्यात घरातील संसारोपयोगी वस्तूंसह अडीच लाखांची रोकड जळून खाक झाली. यात सहा महिन्यांची चिमुरडी गंभीररीत्या भाजली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिसात उशिरा घटनेची नोंद करण्यात आली. देशमुखवाडी भागातील रहिवासी सादिक लतीब मण्यार यांच्या राहत्या घरात दपारी एकच्या समारास घटना घडली. विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून धूर निघाला. घरामध्ये सहा महिन्यांची चिमुकली झोळीत झोपलेली होती. तातडीने सादिक मण्यार घरी आले. पालिकेच्या अग्निशमन दलाच्या बंबाने आग आटोक्यात आणली. तोपर्यंत घरातील साहित्य, जागा घेण्यासाठी नातेवाइकांकडून आणलेले २ लाख ६० हजार रोख जाळून खाक झाले. झोक्यातील चिमुरडीला…

Read More

मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी लाभाचा आणि शांतीचा दिवस असेल. भावनांवर नियंत्रण ठेवा. जास्त भावनिक होऊ नका. महत्त्वाच्या कामात घाईघाईने निर्णय घेऊ नका. रागावर नियंत्रण ठेवा. कार्यक्षेत्रात सामान्य चढ-उतार होतील. तुमचे वैयक्तिक व्यक्तिमत्व सुधारा. वृषभ राशी अनावश्यक खर्च टाळा. व्यवसायात कठोर परिश्रमानंतर अपेक्षित आर्थिक लाभ होणार नाही. कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चिंताजनक होऊ शकते. तुमच्या नोकरीत तुम्हाला तुमच्या बॉसकडून पैसे मिळणार नाहीत. मिथुन राशी आज प्रेमसंबंधात अडकलेल्या लोकांना आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. जेणेकरून कुटुंबात आनंद आणि सहकार्य राहील. प्रेमसंबंधांमध्ये मधुरता वाढेल. परस्पर संबंधांमध्ये एकमेकांवरील विश्वास वाढेल. कर्क राशी आज आरोग्यविषयक जागरूकता आणि सावधगिरीमुळे तुम्ही कोणत्याही गंभीर आजारापासून…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जनतेच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नसून ही जनतेशी जोडलेली नाळ मी कधीही तुटू देणार नाही. गावातील पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही देवून शेळगावच्या विकासात कोणतीही कमतरता राहणार नाही,” असे आश्वासन देत “जनतेच्या आशीर्वादाने आणि मतदारसंघाशी असलेल्या निष्ठेमुळेच मी या पदापर्यंत पोहोचलो असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते शेळगाव येथे नागरी सत्कार प्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते श्रीराम मंदिरापासून गावांतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे लोकार्पण करण्यात आले. जळगाव तालुक्यातील शेळगाव येथे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचा नागरिक सत्कार मोठ्या…

Read More

पुणे : वृत्तसंस्था दिल्लीच्या निकालावर काही नेत्यांनी संशय घेतल्याने भाजपचे नेते आता त्या नेत्यावर टीकास्त्र सोडत असतांना आता राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट राहुल गांधी यांना आव्हान दिले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते एका क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पार पडले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राहुल गांधी यांना आवाहन केले. 27 वर्षानंतर दिल्लीच्या तख्तावर भाजपचा मुख्यमंत्री विराजमान होणार आहे. दिल्लीच्या विजयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले असल्याचे ते म्हणाले. दिल्लीच्या विधानसभेत भाजपला घवघवीत यश मिळाले. या निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठा पराभव स्वीकारावा लागला. तर काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. अशातच दिल्लीच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  गिरणा धरण १९६९ साली पूर्ण झाले असून गत ५३ वर्षात ते १४ वेळेस पूर्ण भरले आहेत. गेल्या पाच वर्षांपासून हे धरण १००% धरण भरल्याने सिंचनाचे आवर्तन या वर्षी गिरणा धरणातून सिंचानासाठी ३ तर बिगर सिंचनासाठी ४ असे एकुण ७ आवर्तने पाण्याच्या उपलब्धते नुसार व मागणी नुसार डिसेंबर २०२४ , फेब्रुवारी , एप्रिल व जून २०२५ या महिन्यात ७ आवर्तने सोडण्यात येणार असल्याचे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. यावेळी पाणी वापर हा काटकसरीने करून गिरणा प्रकल्पावरील कालवा प्रणालीवरील अनुषंगिक बांधकामे, माती भराव यासह दुरुस्तीची कामे हाती घेण्यात यावी, गिरणा कालवा प्रणालीची कामे ६० वर्षांपूर्वी झाली असल्याने…

Read More

भुसावळ ; प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रमाबाई आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली असताना भुसावळ तालुक्यातील वरणगावा मध्ये सिद्धेश्वर नगर येथील गणपती मंदिराजवळ रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीची मिरवणूक आली असताना गाण्याच्या वादातून मिरवणुकीवर दगडफेक होऊन आठ जण जखमी झाले. या प्रकरणी पाच जणांविरोधात वरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव शहरातील सिद्धेश्वर नगर गणपती मंदिराजवळ दि. 7 रोजी 9 : 30 वाजता रमाबाई आंबेडकर मिरवणूक आली. रात्री मिरवणुकीत साऊंड सिस्टीम ऑपरेटर आकाश निमकर यांनी भीमगीते वाजवली. त्यावर काहींनी त्याला जबरदस्ती खाली उतरवले आणि “तू शिवाजी चौकात भीमगीते का वाजवतो?” असे विचारत शिवीगाळ करून मारहाण केली.…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिल्लीत भाजपला 27 वर्षांनी स्पष्ट बहुमत मिळाले आहे. निवडणूक आयोगाच्या मते, भाजपने 40 जागा जिंकल्या आहेत आणि 8 जागांवर आघाडीवर आहे, म्हणजे एकूण 48 जागा आहेत. आम आदमी पक्षाने (आप) 18 जागा जिंकल्या आहेत आणि 4 जागांवर आघाडीवर आहे, म्हणजेच एकूण 22 जागा. काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही. 1993 मध्ये भाजपने 53 जागा जिंकल्या होत्या, म्हणजेच दोन तृतीयांश बहुमत. 5 वर्षांच्या सरकारमध्ये मदनलाल खुराणा, साहिब सिंग वर्मा आणि सुषमा स्वराज यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले. या बदलात, आपचे अरविंद केजरीवाल नवी दिल्लीतून आणि सिसोदिया जंगपुरा येथून निवडणूक हरले. मुख्यमंत्री आतिशी यांनी कालकाजी मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. सत्येंद्र…

Read More