अमळनेर : प्रतिनिधी बँकेपासून घरापर्यंत पाठलाग करत दोन दुचाकीस्वारांनी एकाचे ९ लाख रुपये हिसकावून नेल्याची घटना १० फेब्रुवारी रोजी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. सविस्तर वृत्त असे कि, भोईवाडा येथील रहिवासी बापू शिंगाणे हे पालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी असून, त्यांची पत्नी सुरेखा यांच्यासह ते बँकेत गेले होते. बँकेतून ९ लाख रुपये काढल्यानंतर त्यांनी ते पिशवीत नीट गुंडाळून पिशवी दुचाकीला टांगली आणि पिशवी स्वतःकडे ठेवून घराकडे आले. घराजवळ दुचाकी थांबवली असता, काळ्या दुचाकीवरून दोघेजण आले आणि त्यांनी पैशांची पिशवी हिसकावून कसाली डीपीकडे पळ काढला. आजूबाजूच्या लोकांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते पळून जाण्यात यशस्वी झाले. या घटनेचे वृत्त कळताच अतिरिक्त पोलिस…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी मित्राची बारावी परीक्षेची बैठक व्यवस्था पाहण्यासाठी जळगावला येत असताना वाहनाने दुचाकीला धडक दिल्यामुळे मोहित संजय मोरे (२०, रा. उमाळा ता. जळगाव) हा तरुण ठार झाला. तर इयत्ता बारावीचा विद्यार्थी गौरव अशोक पाटील (१८, रा.उमाळा) जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुपारी १ वाजेच्या सुमारास आर.एल. चौफुलीपासून पुढे आल्यानंतर मागून येणाऱ्या एका वाहनाने दुचाकीला धडक दिली. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मोहितचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत मोहीत हा फार्मसीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता.
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील अट्रावल येथील मुंजोबाच्या यात्रेत गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी तब्बल ११ महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या पोत चोरी केल्या. गर्दीतून नागरिकांनी काही संशयितांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र, त्यांच्याकडून पोलिसांना काहीच मिळून आले नाही. तर याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, अट्रावल, ता. यावल येथे प्रसिद्ध मुंजोबा यात्रा सुरू आहे. या यात्रेमध्ये सपना भरत कोळी (रा. गोरगावले, ता. चोपडा) यांच्यासह विविध महिला आल्या होत्या. तर कोळी यांच्या गळ्यातील सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने चोरी केली. साडेसात हजार रुपये किमतीची सोन्याची पोत चोरी झाल्याचे समोर आले. दरम्यान, याच यात्रेत रत्ना रवींद्र…
मेष राशी आज तुम्हाला राजकारणात महत्त्वाचे पद मिळण्याची शक्यता आहे. दूरच्या देशातून काही चांगली बातमी मिळेल. सरकारी सत्तेचा लाभ मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासाची चिंता राहील. कामात गुंतलेल्या लोकांना विशेष यश मिळेल. काही शुभ घटना घडू शकतात. वृषभ राशी आज मुलांच्या खेळण्यांच्या व्यवसायाशी संबंधित लोकांना विशेष लाभ मिळेल. ट्रॅव्हल एजन्सी, ट्रॅव्हल ड्रायव्हिंग, वाहतूक विभागाशी संबंधित लोकांना यश आणि आर्थिक लाभ मिळेल. तुम्हाला संपत्ती आणि सन्मान दोन्ही प्राप्त होतील. सेल्समन म्हणून काम करणाऱ्या लोकांना चांगला व्यवसाय मिळेल. मिथुन राशी कुटुंबात अनावश्यक वादामुळे आज तुम्ही दुःखी व्हाल. कुटुंबातील कोणीतरी रागावू शकते. संयमाने वागा. संबंध सुधारण्याचा प्रयत्न करा. प्रेमसंबंधांमध्ये अधिक महत्त्वाकांक्षा वाढू शकते. तुमच्या…
बीड : वृत्तसंस्था राज्याच्या पर्यावरण मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील भगवान गडाला भेट दिली. यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, जोपर्यंत लोकांना मी हवी आहे, तोपर्यंत मी काम करत राहील. ज्यावेळेस लोक म्हणतील की आता आम्हाला तुमची गरज नाही त्यावेळेस मी घरच्या गादीवर बसेल. तसेच पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की मी गुंडाला गुंड आणि बंडाला बंड आहे. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या, जोपर्यंत लोकांना मी हवी आहे, तोपर्यंत मी काम करत राहील. ज्यावेळेस लोक म्हणतील की आता आम्हाला तुमची गरज नाही त्यावेळेस मी घरच्या गादीवर बसेल. राजकारणात आणि…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांड व परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीत गेलेल्या बळीच्या मुद्यावर भाजप आमदार सुरेश धस हे दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. एवढेच नाही तर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रिय योजनांना ब्रेक लावून त्यांना कॉर्नर केले जात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. अंजली दमानिया सोमवारी म्हणाल्या की, सोमनाथ सूर्यवंशी यांची कथितपणे दुर्दैवी हत्या झाली. यात जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर केवळ निलंबनाची कारवाई करून चालणार नाही. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा अशी त्यांच्या कुटुंबीयांची मागणी आहे. त्याला माझे पूर्ण समर्थन आहे. केवळ निलंबन…
नाशिक : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी देखील भाष्य केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यावर आता अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी अभिनेता राहूल सोलापूरकर यांचा समाचार घेतला आहे. छगन भुजबळ यांनी यावेळी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानांवरही भाष्य केले. राहुल सोलापूरकर हे भांडारकर संस्थेमध्ये कुणीतरी सदस्य होते. ते विद्वान ग्रहस्थ आहेत. पण त्यांनी कुठपर्यंत बोलायचे याच्या मर्यादा पाळल्या पाहिजेत. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाला लाच देऊन आग्र्ह्याहून…
पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी चुकीचे वक्तव्य केल्यानंतर अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्यावर टीका होवू लागल्या होत्या त्यानंतर त्यांनी माफी मागितली होती आता पुन्हा एकदा अभिनेते राहुल सोलापूरकर नव्या वादग्रस्त व्हिडीओने पुन्हा अडचणीत आले आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलच्या वक्तव्याचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्याबद्दल राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांच्या घराबाहेरील बंदोबस्तात वाढ केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल सोलापूरकर यांनी जाहीर माफी मागितल्यानंतर नुकतेच ते प्रकरण थंड झाले होते. मात्र, रविवारी व्हायरल झालेल्या त्यांच्या नव्या व्हिडीओने ते पुन्हा अडचणीत आले आहेत. छत्रपती राजश्री शाहू…
हैद्राबाद : वृत्तसंस्था देशातील अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना घडत असतांना एक थरारक घटना हैदराबादमधून समोर आली आहे. येथील प्रख्यात वेलजन उद्योग समूहाचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक व्ही. सी. जनार्दन राव यांची नातवाने ७३ वार करून हत्या केली. मालमत्तेच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी रविवारी सांगितले. के. कीर्ती तेजा या नातवाला अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, व्ही. सी. जनार्दन राव (वय ८६) यांच्यावर नातू कीर्ती तेजा (२८) याने गुरुवारी (दि. ६) चाकूने ७३ वार केले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी या भांडणामध्ये पडलेल्या स्वतःच्या आईवरही त्याने वार केले. त्यात त्या जखमी झाल्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी कीर्ती…
धरणगाव : प्रतिनिधी आपल्या गाडीतील प्रवासी दुसऱ्या गाडीत बसत असल्याच्या कारणामुळे प्रवाशाला अश्लील शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोना मिलिंद अशोक भामरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, ८ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास बसस्टॅन्डसमोर अतुल मधुकर वारडे (धानोरा) याची आई व बादल आकाश शिरसाठ (अशोक सम्राट नगर उधना सुरत) असे संदीप संजय कंखरे (धरणगाव) यांच्या गाडीत बसले होते. मात्र, दुसरी गाडी निघत असल्याने अतुल वारडे याची आई व बादल शिरसाठ हे दोन्ही दुसऱ्या गाडीत बसले. त्यामुळे संदीप संजय कंखरे याने अतुल वारडे याच्या आईला शिवीगाळ केली. दरम्यान,…

