Author: editor desk

बीड : वृत्तसंस्था बीड जिल्ह्यात सध्या देशभर चर्चेत आला असतांना जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघातील खुंटेफळ येथे नुकतेच मुख्यमंत्री फडणवीस यांचा दौरा झाला यावेळी व्यासपीठावर सर्वच आमदारांनी भाषण केले मात्र या भाषणात मंत्री पंकजा मुंडे यांचे भाषण सध्या चर्चेत आले आहे. आमदार सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघातील खुंटेफळ साठवण तलाव प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या लोकार्पण सोहळ्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भाषण केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी आमदार सुरेश धस यांना मिश्किल टोला देखील लगावला आहे. या जिल्ह्याचे आमदार ज्यांना 2009 मध्ये पहिला गुलाल लागला तो भारतीय जनता पक्षाकडूनच लागला ते आता पुन्हा 2024 मध्ये…

Read More

जळगाव : प्रतिनिधी काही महिन्यांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर होत असलेल्या त्रासाला कंटाळून गाढोदा येथील प्रगतीशील शेतकरी तथा जळगाव शेतकी संघाचे माजी अध्यक्ष रामचंद्र सीताराम पाटील (वय ६३) यांनी बुधवारी सकाळी ६ वाजता घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बायपास शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या आरोग्यावर काही परिणाम जाणवत होता आजारपणाच्या भीतीमुळे ते बैचेन झाले असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली. बुधवारी त्यांनी गावातील विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेतले. घरी येऊन पत्नी कमल पाटील यांना मंदिरात जाऊन येण्यास सांगितले. पत्नी मंदिरात गेल्यावर रामचंद्र पाटील यांनी घरात गळफास घेतला.…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील चोरवड येथे दारूच्या नशेत एकाने वेटरला शिवीगाळ करून सुरीने वार केल्यामुळे वेटर गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी जळगाव येथे दाखल करण्यात आले आहे. ही घटना ५ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर रोडवरील हॉटेल भागाईमधील वेटर नजाकत अली उर्फ मेजवान युनूस अली याच्यावर वेटर कमलेश शाळीग्राम जवरे (२४, हल्ली रा. चोरवड, मूळ रा. देऊळगाव गुजरी, ता. जामनेर) याने मानेवर, तोंडावर, डोळ्याच्या वर कांदा कापण्याच्या सुरीने वार करून जखमी केले आहे. दारूच्या नशेत शिवीगाळ करत हे वार केले. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी रेल्वेत चोऱ्या करणाऱ्या नायडू गँगमधील चार जणांना अमळनेरच्या रेल्वे पोलिसांनी अटक केली. ही घटना मंगळवारी मध्यरात्री अमळनेर रेल्वेस्थानकावर घडली. या चारही जणांना मध्य प्रदेश पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. सविस्तर वृत्त असे कि,  अविनाश महानन्ना नायडू (२५), अजय महानन्ना नायडू (२५) आणि काली कुन्नईया नायडू (२९, तिघे रा. वाकीपाडा मरीमाता मंदिराजवळ, नवापूर) आणि राजा आरमबम (३३, रा. अमरनगर, उज्जैन, मध्यप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत खंडवा पोलिसांकडून अमळनेरच्या रेल्वे पोलिसांना या गँगमधील लोकांनी खंडवा रेल्वेस्थानकावर प्रवाशांकडील सामान चोरी केल्याची आणि यातील काही जण ४ रोजी भुसावळ – उधना गाडीने प्रवास करीत असल्याची माहिती दिली. त्यावरुन रेल्वे…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी पूजा सुरू असताना मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात अमळनेर येथील एका पुजाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना जळोद येथे नदी काठावर बुधवारी दुपारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अमोल श्यामकांत शुक्ल (३८, रा. अमळनेर) असे या पुजाऱ्याचे नाव आहे. तालुक्यातील जळोद येथे नदी काठावर पुलाखाली जळोद येथील इसमाची उत्तरकार्याची पूजा सुरू होती. पूजेत होम पेटवला असता धूर झाल्याने पुलाच्या वर असलेले मधमाशांचे पोळ फुटले. पूजेला बसलेल्यांना त्या चावल्याने सर्व जण सैरावैरा पळू लागले. इतर पाच ते सहा जणांनादेखील मधमाशा चावल्याने त्यांचे अंग सुजले होते. अमळगाव ग्रामीण रुग्णालयात आणून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. अमोल यांच्या पश्चात पत्नी, मुलगी व भाऊ असा परिवार आहे. विशेष…

Read More

मेष : श्रीगणेश म्‍हणतात की, आजचा दिवस ऊर्जा आणि आत्मविश्वासाने भरलेला असेल. तुम्ही मेहनतीने कठीण कामात यश मिळवाल. जवळचे मित्र आणि नातेवाईकांशी संबंध बिघडणार नाहीत, याची काळजी घ्‍या. व्यवसायात मनाप्रमाणे करार होतील. वातावरण बदलाचा आरोग्‍यावर परिणाम संभवतो. वृषभ : श्रीगणेश सांगतात की, आज तुम्ही सर्व कामे समजूतदारपणे आणि मनःशांतीने पूर्ण करू शकाल. नातेवाईक आणि समाजात तुमचा आदर राखला जाईल. शुभचिंतकांकडून मिळालेले आशीर्वाद तुमच्यासाठी वरदान ठरतील. आज कोणाशीही वाद घालू नका. व्यावसायिक कामांमध्ये अधिक काळजी घेण्याची गरज आहे. मिथुन : श्रीगणेश म्हणतात की, आज मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या चिंता दूर होईल. संपर्कक्षेत्रात वाढ होईल. आर्थिक कामांवर लक्ष ठेवा.…

Read More

धुळे : वृत्तसंस्था खान्देशात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. दारू पिण्यासाठी नातेवाईक महिलेने पैसे दिले नाही, या रागातून नराधम बापाने आपल्या पोटच्या दोन लेकरांना तापी नदीच्या पाण्यात फेकून ठार मारल्याचा खळबळ जनक प्रकार धुळे जिल्ह्यातील थाळनेर येथे घडला आहे. या प्रकरणात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, थाळनेर येथील कुंभार टेक भागात सुनील नारायण कोळी हे राहतात. त्यांना दारू पिण्याचे व्यसन आहे. या कारणामुळे छायाबाई संजय कोळी आणि त्यांच्यात नेहमी वाद होण्याच्या घटना घडत होत्या. दरम्यान दारू पिण्यासाठी त्यांनी नातेवाईक असलेल्या छायाबाई कोळी यांच्याकडून पैशांची मागणी केली. मात्र त्यांना पैसे देण्यास नकार दिल्यामुळे सुनील कोळी यांनी मुलगा…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगभरातील अनेक भाविक महाकुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी प्रयागराज येथे दाखल होत आहे तर आज बुधवारी दि. ५ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. त्यांनी इथल्या त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान आणि पूजा केली. यावेळी पीएम मोदी यांनी भगवे वस्त्र परिधान केले होते. त्यांच्या गळ्यात आणि हातात रुद्राक्षाची माळ होती. त्यांनी आज मंत्रोच्चारात संगमात आस्थेची डुबकी घेतली. त्यानंतर त्यांनी गंगापूजन केले. ”आज महाकुंभात प्रयागराज येथील पवित्र संगमात स्नान केल्यानंतर मला पूजा करण्याचे परम भाग्य लाभले. मां गंगेचा आशीर्वाद मिळाल्याने मनाला अपार शांती आणि समाधान मिळाले. यावेळी सर्व देशवासीयांच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि कल्याणासाठी प्रार्थना केली. हर हर गंगे!”…

Read More

पारोळा  : प्रतिनिधी भरधाव वेगाने जाणारे टँकर पारोळा शहराच्या राष्ट्रीय महामार्गावरील बायपास जवळ उलटले असून यातून गॅसची गळती होत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सविस्तर वृत्त असे कि, पारोळा शहराच्या बाहेरून जाणाऱ्या बायपासच्या जवळ रात्री सुमारे दोन वाजेच्या सुमारास अपघात घडला. यात धुळ्याकडून जळगावकडे जाणाऱ्या टँकरच्या चालकाने वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते टँकर हायवेच्या बाजूला जाऊन उलटले. तसेच यातून तात्काळ गॅसची गळती सुरू झाली. या अपघाताची माहिती मिळताच पारोळा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना रूग्णालयात दाखल केले. दरम्यान, अपघातानंतर या टँकरमधून गॅसची गळती झाल्यामुळे परिसरात घबराट पसरली. पुढे कोणताही अनर्थ होऊ नये म्हणून पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून या परिसरातील…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी चुकीचे वक्तव्यावरुन वातावरण तापण्यास सुरुवात झाली असतांना आता अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी त्याबद्दल माफी मागितली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता. तसा विचारसुद्धा माझ्या मनात कधीही येणार नाही, असे त्यांनी सांगितले. आग्र्याहून सुटका करताना शिवाजी महाराजांनी लाच देऊन स्वतःची सुटका केली होती असे विधान राहुल राहुल सोलापूरकर यांनी एका पॉडकास्टमध्ये केले होते. त्यानंतर राज्यातील विविध संघटनांनी, इतिहास अभ्यासकांनी आणि राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. राहुल सोलापूरकर यांनी यासंदर्भात एक व्हिडीओ प्रसिद्ध करत माफी मागितली आहे. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये राहुल सोलापूरकर यांनी,”दीड दोन महिन्यापूर्वी मी एक मुलाखत दिली. त्या…

Read More