• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

रमाबाई आंबेडकरांच्या जयंती वाद : गुन्हा दाखल !

editor desk by editor desk
February 8, 2025
in क्राईम, जळगाव
0
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

भुसावळ ; प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रमाबाई आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली असताना भुसावळ तालुक्यातील वरणगावा मध्ये सिद्धेश्वर नगर येथील गणपती मंदिराजवळ रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीची मिरवणूक आली असताना गाण्याच्या वादातून मिरवणुकीवर दगडफेक होऊन आठ जण जखमी झाले. या प्रकरणी पाच जणांविरोधात वरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव शहरातील सिद्धेश्वर नगर गणपती मंदिराजवळ दि. 7 रोजी 9 : 30 वाजता रमाबाई आंबेडकर मिरवणूक आली. रात्री मिरवणुकीत साऊंड सिस्टीम ऑपरेटर आकाश निमकर यांनी भीमगीते वाजवली. त्यावर काहींनी त्याला जबरदस्ती खाली उतरवले आणि “तू शिवाजी चौकात भीमगीते का वाजवतो?” असे विचारत शिवीगाळ करून मारहाण केली. यानंतर, भोला रामा इंगळे यांनी याला विरोध केला असता काहींनी “बंद करा महारांचे गाणे, आम्ही या सगळ्यांना पाहून घेतो,” असे म्हणत संपूर्ण मिरवणुकीवर दगडफेक केली. या दगडफेकीत ट्रॉलीवर ठेवलेल्या रमाई माता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीच्या पायाजवळ दगड लागल्याने मूर्तींचे नुकसान झाले. या घटनेत अंजनाबाई गौतम जोहरे, दुर्गा सुनील भालेराव, उत्तम बंडू जोहरे, अजय प्रकाश बोदडे, प्रकाश गौतम जोहरे, संजीवनी पुना बाच आणि आशिष भालेराव हे जखमी झाले असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय, वरणगांव येथे उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी आशाबाई कैलास बि-हाडे (वय 45, रा. सिद्धेश्वर नगर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी निलेश काळे, निलेश पवार, कृष्णा माळी, गोपाळ माळी, गोपाळ राजपूत आणि इतर 10 अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी वरणगांव पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस गु.र.नं. 018/2025 अन्वये भारतीय दंड संहिता कलम 189(1), 189(2), 189(3), 189(4), 118(1), 299 तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत कलमे लागू करण्यात आली आहेत. सदर प्रकरणाचा पुढील तपास सपोनि जनार्दन खंडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सध्या परिसरात शांतता असून, पोलीस सतर्क आहेत.

 

Previous Post

२७ वर्षांनी भाजपला मिळाले दिल्लीत बहुमत !

Next Post

सिंचन व बिगर सिंचनासाठी गिरणा धरणातून जिल्हा वासियांना मिळणार ७ आवर्तने !

Next Post
सिंचन व बिगर सिंचनासाठी गिरणा धरणातून जिल्हा वासियांना मिळणार ७ आवर्तने !

सिंचन व बिगर सिंचनासाठी गिरणा धरणातून जिल्हा वासियांना मिळणार ७ आवर्तने !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मनोज जरांगे पाटील आक्रमक : आता सरकारला संधी द्यायची नाही !
राजकारण

मनोज जरांगे पाटील आक्रमक : आता सरकारला संधी द्यायची नाही !

July 12, 2025
ते विधेयक जनतेच्या नव्हे, तर भाजपच्या सुरक्षेसाठी ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल !
राजकारण

ते विधेयक जनतेच्या नव्हे, तर भाजपच्या सुरक्षेसाठी ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल !

July 12, 2025
सात वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य ; गुन्हा दाखल !
क्राईम

अल्पवयीन मुलाचे अश्लील व्हिडीओ काढले : दोघांवर गुन्हा दाखल !

July 12, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

बंद घराचा कडीकोयंडा तोडून ६०  हजारांचा मुद्देमाल लंपास !

July 12, 2025
१५ वर्षीय विद्यार्थ्याचा शाळेत दुर्देवी मृत्यू !
क्राईम

१५ वर्षीय विद्यार्थ्याचा शाळेत दुर्देवी मृत्यू !

July 12, 2025
मोठी बातमी : माजी मंत्री देवकर आप्पांच्या अडचणी वाढणार ; चौकशी अहवालात दोषी !
क्राईम

मोठी बातमी : माजी मंत्री देवकर आप्पांच्या अडचणी वाढणार ; चौकशी अहवालात दोषी !

July 12, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group