लातूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना आता नुकतेच धाराशिव लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे काका बाबा पाटील यांच्या कारला अपघात झाला आहे. बाबा पाटील यांची इनोव्हा कार पिकपला धडकल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान कारच्या एअर बॅग उघडल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र या अपघातात पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत. लातूर – उमरगा मार्गावरील नारंगवाडी तलावाजवळ हा अपघात घडला. सविस्तर वृत्त असे कि, धाराशिव लोकसभा मतदारसंघातील खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यामुळे दिल्ली येथे आहेत. मात्र, या दरम्यान त्यांचे काका बाबा पाटील…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कुसुंबा गावातील श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालयाच्या आवारात जुन्या भांडणाच्या कारणावरून सुप्रीम कॉलनीत राहणाऱ्या एका मुलाला मारहाण करून धारदार वस्तूने वार करीत जखमी केले. ही घटना गुरुवार दि. ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात सुनिता अशोक जाधव (वय ४५) या महिला वास्तव्याला आहे. दरम्यान त्या कुसुंबा गावातील शाळेत महिलेचा मुलगा लक्ष्मण अशोक जाधव हा शिकत आहे. गुरुवार दि. ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.१५ वाजता शाळा सुटल्यानंतर लक्ष्मण हा घरी जाण्यासाठी निघाला होता. त्यावेळी शाळेच्या आवारात जुन्या…
अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील झाडी येथील ३७ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील झाडी येथील ३७वर्षीय महिलेची ओळख २००८ मध्ये चारूदत्त विलास पाटील (वय ३७, रा. झाडी, ह.मु. कुऱ्हा काकोडा ता. मुक्ताईनगर) याच्याशी झाली होती. महिलेचा पती दारू पीत असल्याने चारूदत्त याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. सदर महिला पतीसोबत नाशिक येथे राहायला गेली असता नाशिक येथेही तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर त्याला कुऱ्हा काकोडा ता. मुक्ताईनगर येथे नोकरी लागल्याने तो तेथे निघून गेला. सदर महिलेचे फोन उचलणे बंद केल्यानंतर तिने समक्ष जाऊन जाब…
चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील नागद रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटसमोरील झोपडपट्टी भागात अचानक तीन घरांना आग लागली. या आगीत गरीब नवाज या मंडप व्यावसायिकाचे सर्व मंडप साहित्य तसेच बाजूच्या चार घरांमधील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. यामुळे या कुटुंबांचा संसार रस्त्यावर आला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात आले आहे. या भागात आठवड्याभरात आगीची दुसरी घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. सविस्तर वृत्त असे कि, चाळीसगाव शहरातील नागद रोडवरील तंबाखूच्या कारखान्याजवळ असलेल्या वस्तीमधील शेख अब्दुल शेख अमीर, जग्गू मंडपवाले, आमीर खान मुनीर खान, कादर अली सय्यद अली यांच्या घरांना…
जळगाव : प्रतिनिधी खुनाच्या गुन्ह्यात साक्ष देऊ नये, यासाठी न्यू बी. जे. मार्केटसमोरील चांदेलकर प्लाझाधील सोशल क्लबमध्ये अरुण भीमराव गोसावी (रा. तुकारामवाडी) यांच्यावर टोळक्याने हल्ला करून साहित्याची तोडफोड केली. तसेच हा क्लब चालवायचा असेल तर आम्हाला दर महिन्याला पैसे द्यावे लागतील, असे म्हणत गल्ल्यातील आठ हजारांची रोकड जबरीने काढून नेली. ही घटना गुरुवारी रात्री घडली. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर वृत्त असे कि, अरुण गोसावी हे चांदेलकर प्लाझा येथील वरच्या मजल्यावर नशिराबाद स्पोर्टस फाउंडेशन या सोशल क्लबमध्ये पार्टनर आहे. गुरुवारी रात्री तेथे १५ जणांचे टोळके हातात लाठ्या-काठ्या घेऊन आले. गोसावी यांना शिवीगाळ…
यावल : प्रतिनिधी वडोदा गावाजवळ चारचाकी वाहनाचे टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. चारचाकी दुचाकीवर जाऊन धडकल्याने दुचाकीस्वार तरूण जागीच ठार झाला. हा अपघात शुक्रवारी सकाळी घडला. नातेवाईकाच्या अंत्ययात्रेसाठी साकळी येथून डिझेल घेण्यासाठी पेट्रोल पंपावर जात असताना हा अपघात घडला. मृताचे नाव करण विजय जंजाळे (२४, रा.आंबेडकर नगर, साकळी ता यावल) असे आहे. सविस्तर वृत्त असे कि, करण जंजाळे दुचाकीने क्रमांक (एम. एच. १९ डी. क्यू १७०९) यावलकडे येत होता. यावलकडून चोपड्याकडे जाणाऱ्या चारचाकीचे क्रमांक (एम. एच. १९ ए. पी. ३२७३) अचानक टायर फुटले यात चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुचाकीवर जाऊन धडकली. यात दुचाकीवरील तरुण नाल्यात पुलाखाली कोसळला. कारच्या धडकेत दुचाकीचे…
मेष राशी स्वतःवर विश्वास ठेवा. कामाच्या ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने काम करणे शुभ राहील. भागीदारीच्या स्वरूपात व्यवसाय करण्याची शक्यता आहे. उपजीविकेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी सहकाऱ्यांशी सामंजस्याने वागल्यास त्यांना नवीन आशेचा किरण मिळेल. वृषभ राशी आज व्यवसायात चांगले उत्पन्न मिळण्याची चिन्हे आहेत. एखादी महागडी वस्तू खरेदी करू शकता. तुमच्या जोडीदाराला नोकरी किंवा नोकरी मिळाल्यास तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. संचित भांडवली संपत्तीत वाढ होईल. काही मौल्यवान भेटवस्तू किंवा पैसे मिळण्याची शक्यता आहे. चैनीच्या वस्तूंवर जास्त पैसा खर्च होऊ शकतो. जुनी कर्जे फेडण्यात यश मिळेल. मिथुन राशी आज, मित्र आणि प्रियजनांच्या सल्लामसलतने घरगुती समस्या सोडवल्या जातील. प्रेमसंबंधांमध्ये कमी अनुकूल परिस्थिती असेल. परस्परांप्रती…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहिण योजना राबविली होती मात्र आता ‘लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांच्या संख्येत टप्प्याटप्प्याने कपात करण्याचे या सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. तर राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींच्या मताचा वापर सत्तेसाठी करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. रोहित पवारांनी पुढे बोलताना म्हटले आहे की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ‘मंदिर व्यवस्थापन’ या विषयाचा अभ्यासक्रम सुरू करण्याऐवजी कायम दुर्लक्षित ठेवलेल्या पैठण येथील संतपीठाला भरीव निधीच्या माध्यमातून उर्जितावस्था देऊन त्यांच्या अखत्यारित हा विषय सुरू केला तर ते अधिक योग्य ठरेल. नेमके रोहित पवार यांचे…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव पोलीस गेल्या दोन दिवसापासून अनेक गुन्हाची उकल करत असतांना दिसून आले आहे. जळगाव शहर आणि इतर परिसरातून दुचाकींची चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला एमआयडीसी पोलीसांनी कारवाई करत अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या १५ दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीसह इतर भागात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी दुचाकीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना देण्यात आले होते. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार दुचाकी…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. धनंजय मुंडे हे घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी आढळले आहेत. करूणा शर्मांनी लावलेले आरोप कोर्टाकडून मान्य करण्यात आले आहेत. करूणा शर्मांना प्रत्येक महिन्याला 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. यामुळे धनंजय मुंडेंना मोठा झटका बसला आहे. दरम्यान आधीच आरोपांमुळे अडचणीत आलेल्या धनंजय मुंडे यांचा पाय आणखीनच खोलात गेला आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी तर कोर्टाचा निकाल येताच धनंजय मुंडे यांनी तात्काळ राजीनामा देण्याची मागणी केली आहे. तसेच मुंडे यांच्या पापाचा घडा भरत आल्याचंही तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.…

