Author: editor desk

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी अपघातांच्या घटना नियमित घडत असतांना नुकतेच नागपुरातून एक खळबळजनक घटना घडली आहे. कार शिकत असताना कार अनियंत्रित होऊन विहिरीत कोसळली. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला. ही घटना नागपूर जिल्ह्यात बुटीबोरी येथे सोमवारी रात्री उशिरा घडली. मिळालेल्या माहितीनुसार, रस्‍त्‍यावर कार शिकत असताना कार अनियंत्रित झाल्‍याने रस्‍त्‍याकडेच्या विहिरीत कोसळली. बुटीबोरी एमआयडीसी परिसरात बालभारती ग्राउंडवर ही घटना घडली. या तिघांचेही मृतदेह आणि कार मंगळवारी बाहेर काढण्यात आले. मृतांची नावे मिळू शकली नाहीत. रात्री अकरा वाजता तिघे कार शिकत असताना ही कार अनियंत्रित झाली आणि या विहिरीत कोसळली. कारचा वेग इतका जास्त होता की विहिरीची संरक्षक भिंत…

Read More

बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणाला दोन महिने पूर्ण झाले आहे. मात्र अद्यापही एक आरोपी फरार आहे. यातच आता या प्रकरणातील आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. 9 डिसेंबर 2024 चा संध्याकाळी 7 वाजून 10 मिनिटांचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धाराशिवच्या वाशीमध्ये आरोपी काळ्या रंगाची स्कॉर्पिओ सोडून 6 आरोपी पळून जातानाचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटले असून अनेक आंदोलनं झाली. मात्र देशमुख कुटुंब अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये नेमकं काय?  याचदरम्यान या प्रकणातीला आरोपींचे आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील खान्देश मिल कॉलनीतील एका भागात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीचे फूस लावून पळवून नेल्याची घटना शनिवारी ८ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी रविवारी ९ फेब्रुवारी रोजी पहाटे ३ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिला काहीतरी आमिष दाखवत अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. ही घटना उघडकीला आल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी पिडीत मुलीचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण हे करीत आहे.

Read More

अमळनेर : प्रतिनिधी बँकेपासून घरापर्यंत पाठलाग करत दोन दुचाकीस्वारांनी एकाचे ९ लाख रुपये हिसकावून नेल्याची घटना १० फेब्रुवारी रोजी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. सविस्तर वृत्त असे कि, भोईवाडा येथील रहिवासी बापू शिंगाणे हे पालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी असून, त्यांची पत्नी सुरेखा यांच्यासह ते बँकेत गेले होते. बँकेतून ९ लाख रुपये काढल्यानंतर त्यांनी ते पिशवीत नीट गुंडाळून पिशवी दुचाकीला टांगली आणि पिशवी स्वतःकडे ठेवून घराकडे आले. घराजवळ दुचाकी थांबवली असता, काळ्या दुचाकीवरून दोघेजण आले आणि त्यांनी पैशांची पिशवी हिसकावून कसाली डीपीकडे पळ काढला. आजूबाजूच्या लोकांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते पळून जाण्यात यशस्वी झाले. या घटनेचे वृत्त कळताच अतिरिक्त पोलिस…

Read More

जळगाव : प्रतिनिधी मित्राची बारावी परीक्षेची बैठक व्यवस्था पाहण्यासाठी जळगावला येत असताना वाहनाने दुचाकीला धडक दिल्यामुळे मोहित संजय मोरे (२०, रा. उमाळा ता. जळगाव) हा तरुण ठार झाला. तर इयत्ता बारावीचा विद्यार्थी गौरव अशोक पाटील (१८, रा.उमाळा) जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुपारी १ वाजेच्या सुमारास आर.एल. चौफुलीपासून पुढे आल्यानंतर मागून येणाऱ्या एका वाहनाने दुचाकीला धडक दिली. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मोहितचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत मोहीत हा फार्मसीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता.

Read More

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील अट्रावल येथील मुंजोबाच्या यात्रेत गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी तब्बल ११ महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या पोत चोरी केल्या. गर्दीतून नागरिकांनी काही संशयितांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र, त्यांच्याकडून पोलिसांना काहीच मिळून आले नाही. तर याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, अट्रावल, ता. यावल येथे प्रसिद्ध मुंजोबा यात्रा सुरू आहे. या यात्रेमध्ये सपना भरत कोळी (रा. गोरगावले, ता. चोपडा) यांच्यासह विविध महिला आल्या होत्या. तर कोळी यांच्या गळ्यातील सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने चोरी केली. साडेसात हजार रुपये किमतीची सोन्याची पोत चोरी झाल्याचे समोर आले. दरम्यान, याच यात्रेत रत्ना रवींद्र…

Read More

मेष राशी आज तुम्हाला राजकारणात महत्त्वाचे पद मिळण्याची शक्यता आहे. दूरच्या देशातून काही चांगली बातमी मिळेल. सरकारी सत्तेचा लाभ मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासाची चिंता राहील. कामात गुंतलेल्या लोकांना विशेष यश मिळेल. काही शुभ घटना घडू शकतात. वृषभ राशी आज मुलांच्या खेळण्यांच्या व्यवसायाशी संबंधित लोकांना विशेष लाभ मिळेल. ट्रॅव्हल एजन्सी, ट्रॅव्हल ड्रायव्हिंग, वाहतूक विभागाशी संबंधित लोकांना यश आणि आर्थिक लाभ मिळेल. तुम्हाला संपत्ती आणि सन्मान दोन्ही प्राप्त होतील. सेल्समन म्हणून काम करणाऱ्या लोकांना चांगला व्यवसाय मिळेल. मिथुन राशी कुटुंबात अनावश्यक वादामुळे आज तुम्ही दुःखी व्हाल. कुटुंबातील कोणीतरी रागावू शकते. संयमाने वागा. संबंध सुधारण्याचा प्रयत्न करा. प्रेमसंबंधांमध्ये अधिक महत्त्वाकांक्षा वाढू शकते. तुमच्या…

Read More

बीड : वृत्तसंस्था राज्याच्या पर्यावरण मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील भगवान गडाला भेट दिली. यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, जोपर्यंत लोकांना मी हवी आहे, तोपर्यंत मी काम करत राहील. ज्यावेळेस लोक म्हणतील की आता आम्हाला तुमची गरज नाही त्यावेळेस मी घरच्या गादीवर बसेल. तसेच पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की मी गुंडाला गुंड आणि बंडाला बंड आहे. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या, जोपर्यंत लोकांना मी हवी आहे, तोपर्यंत मी काम करत राहील. ज्यावेळेस लोक म्हणतील की आता आम्हाला तुमची गरज नाही त्यावेळेस मी घरच्या गादीवर बसेल. राजकारणात आणि…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांड व परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीत गेलेल्या बळीच्या मुद्यावर भाजप आमदार सुरेश धस हे दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. एवढेच नाही तर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रिय योजनांना ब्रेक लावून त्यांना कॉर्नर केले जात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. अंजली दमानिया सोमवारी म्हणाल्या की, सोमनाथ सूर्यवंशी यांची कथितपणे दुर्दैवी हत्या झाली. यात जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर केवळ निलंबनाची कारवाई करून चालणार नाही. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा अशी त्यांच्या कुटुंबीयांची मागणी आहे. त्याला माझे पूर्ण समर्थन आहे. केवळ निलंबन…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी देखील भाष्य केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यावर आता अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी अभिनेता राहूल सोलापूरकर यांचा समाचार घेतला आहे. छगन भुजबळ यांनी यावेळी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानांवरही भाष्य केले. राहुल सोलापूरकर हे भांडारकर संस्थेमध्ये कुणीतरी सदस्य होते. ते विद्वान ग्रहस्थ आहेत. पण त्यांनी कुठपर्यंत बोलायचे याच्या मर्यादा पाळल्या पाहिजेत. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाला लाच देऊन आग्र्ह्याहून…

Read More