मेष राशी आज कामात अनावश्यक धावपळ होईल. कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवू नका. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामात अधिक लक्ष द्यावे लागेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना काही शुभ संकेत मिळतील. क्रीडा स्पर्धांमध्ये येणारे अडथळे दूर होतील. वृषभ राशी आज व्यवसायात चांगले उत्पन्न न मिळण्याचे संकेत आहेत. खर्च देखील उत्पन्नाच्या समान प्रमाणात होईल. आर्थिक बाबतीत पूर्वी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. मिथुन राशी आज प्रेमसंबंधांमध्ये तीव्रता असेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून आनंद आणि पाठिंबा मिळेल. कोणाचीही दिशाभूल करू नका. वैवाहिक जीवनात काही सुखद घटना घडू शकतात. तुम्हाला तुमच्या मुलांकडून आनंद आणि पाठिंबा मिळेल. प्रिय व्यक्ती घरी आल्यावर तुम्हाला…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातील माजी मंत्री -माजी आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटातील नाराज नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आता घरोबा करण्याचा जवळपास निश्चित केला आहे. तशी एक बैठक देखील पार पडली आहे. यामुळे आता अजित पवारांची पश्चिम महाराष्ट्रात ताकद वाढणार आहे. सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गट भक्कम करण्यासाठी व्यूह रचना सुरू झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन अजित पवार पक्ष आणि नाराज असलेल्या जिल्ह्यातील माजी आमदारांनी एकत्रित येण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये शिराळाचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी आमदार…
मुंबई : वृत्तसंस्था शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही घोषणा केली. 35 लक्ष, मानपत्र, मानचिन्ह आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीने एकमताने राम सुतार यांच्या नावाची या पुरस्कारासाठी निवड केली. राम सुतार यांचे वय सध्या शंभर वर्षे आहे. ते अजूनही आपल्या कामात तितक्याच तडफेने व्यस्त आहेत. त्यांनी उभारलेली पुतळे आणि शिल्पाचे जगभरात कौतुक झाले. त्यांना यापूर्वी पद्मश्री पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे. राम वनजी सुतार हे भारतातील सर्वात अनुभवी शिल्पकार आहेत. त्यांच्या नावावर जगातील सर्वात उंच 182 मीटरचा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी बवनवण्याचा विक्रम आहे. 100…
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील तापमानात घट येण्याची शक्यता आहे. राज्यातील मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात मार्च महिन्यातील पहिल्या टप्प्यापासून उन्हाचा कडाका वाढत चालला आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी हाच कमाल तापमानाचा पारा 41 अंशांपर्यंत पोहोचला आहे. बुधवारीदेखील राज्यात कमाल तापमानाचा पारा सर्वात अधिक ब—ह्मपुरीत 41.5 अंशसेल्सिअस एवढा नोंदला गेला. मात्र, अवकाळी पावसामुळे पुढील काही दिवस कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सध्या ओडिसा ते विदर्भापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.…
बीड : वृत्तसंस्था राज्यभर चर्चेत असलेले ‘खोक्या’ प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. सतीश भोसले उर्फ खोक्या याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी शिरूर न्यायालयाने सुनावली आहे. त्यामुळे खोक्याचा पुढील 14 दिवसांचा मुक्काम न्यायालयीन कोठडीत असणार आहे. ढाकणे पिता-पुत्राला मारहाण केल्याप्रकरणी भोसले अटकेत आहे. सात दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर आज खोक्याला शिरूर न्यायालयात हजर करण्यात आले होते. एका व्यक्तीला अमानुष मारहाण केल्याच्या प्रकरणात सतीश भोसले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर ढाकणे पिता-पुत्राला मारहाण, घरात आढळलेला गांजा या प्रकरणात देखील गुन्हा दाखल होताच तो फरार झाला होता. अहिल्यानगर, पुणे, संभाजीनगर यासह इतर ठिकाणी त्याने प्रवास केला. संभाजीनगरहून तो थेट प्रयागराज येथे…
जळगाव : प्रतिनिधी पहाटेच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधून एकाच दुचाकीवरुन आलेल्या तिघ चोरट्यांनी कटरच्या सहाय्याने दुकानाचे कुलूप तोडले. ते कुलूप सोबत आणलेल्या पिशवीत टाकून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर कॅबीनमध्ये असलेला सीसीटीव्ही कॅमेरा उलटा करुन तेथे ड्रॉवरमध्ये ठेवलेली ५१ हजार रुपयांच्या रोकडसह चांदीचे शिक्के असा एकूण ५४ हजारांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना दि.१९ रोजी सकाळी पावणेनऊ वाजेच्या सुमारास भोईटेनगरातील यश लॉन्स परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील प्रेमनगरात प्रफुल्ल वसंतलाल झंवर हे वास्तव्यास असून त्यांचे भोईटे नगरातील यश लॉन्सच्या बाजूला न्यू, नितीन एजन्सीज नावाने किराणा सामान डिस्ट्रीब्युटचे दुकान आहे. दि.…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील शिवाजीनगर हुडको परिसरात रस्त्यावरील पाणी वाहत असल्याच्या कारणावरून एका व्यक्तीला शिवीगाळ करत, लोखंडी पेंचीस डोक्यात टाकून गंभीर दुखापत केल्याची घटना सोमवारी सकाळी १०:३० वाजता घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी दुपारी दोन वाजता जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबूलाल खान गुलाब खान (वय ४५, रा. शिवाजीनगर हुडको) यांच्याबाबतीत ही घटना घडली आहे. सोमवारी सकाळी १०:३० वाजता खान यांच्या घरासमोरून पाणी वाहत असल्याच्या कारणावरून त्यांच्या गल्लीत राहणारे जाकीर, बाबू, रुकय्या, त्यांची दोन्ही मुले आणि त्यांची बहीण या सर्वांनी बाबूलाल खान यांना शिवीगाळ करत मारहाण केली. जाकीर याने हातात लोखंडी पेंचीस पकडून बबलू खान यांच्या डोक्यात…
रावेर : प्रतिनिधी शहरातील व्यापाऱ्यास गुंगीचे औषध पाजून त्याच्याशी शारीरिक संबंध केले. एवढेच नाही तर तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत सात वर्षात तब्बल ११ लाखांची खंडणी चोपड़ा तालुक्यातील लोणी अडावद येथील महिलेने वसूल केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुन्हा १ लाख रुपये घेण्यासाठी १९ रोजी बुधवारी ही महिला शहरात पीडित व्यापाऱ्याच्या कार्यालयात आली असता सापळा रचत पोलिसांनी तिला पकडले. सविस्तर वृत्त असे कि, सन २०१८मध्ये जळगाव शहरात ४३ वर्षीय व्यापाऱ्याला त्याच्या चारचाकी कारमधून लिफ्ट मागून प्रतिभा हिरालाल पाटील हिने विमा एजंट असल्याची ओळख दिली. हळूहळू मोबाइलवर फुलवलेल्या मैत्रीतून चोपडा तालुक्यातील लोणी अडावद येथे तिच्या घरी भोजनासाठी बोलावून शीतपेयात काही…
अमळनेर : प्रतिनिधी अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्या वृद्धाला अमळनेर विशेष न्यायालयाने ५ वर्षाचा सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश छाया पाटील यांनी बुधवारी हा निकाल दिला. लोटन पंडित पाटील (६१), असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. दंड न भरल्यास त्याला आणखी सहा महिन्यांची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागेल. अत्याचाराची ही घटना ९ जानेवारी २०२४ रोजी तालुक्यातील एका गावात घडली होती. याप्रकरणी पीडितेच्या नातेवाइकांनी तक्रार दाखल केली होती. आरोपीस ११ जानेवारी २०२४ रोजी अटक करण्यात आली होती आणि तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत होता. ९ जानेवारी २०२४ रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास, पीडित बालिका…
मेष राशी आज मुलांच्या आनंदात वाढ होईल. जवळच्या मित्राची भेट होईल. परीक्षा स्पर्धेत यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी नवीन सहकारी मिळतील. व्यवसायात संयम आणि समर्पणाने काम करा. कोणाचे म्हणणे ऐकू नका. अन्यथा व्यवसायात अडथळे येऊ शकतात. वृषभ राशी आज तुमचे आरोग्य चांगले राहील. कोणताही रोग, त्रास इत्यादींचा तुमच्यावर परिणाम होणार नाही. ऊर्जा आणि उत्साहाने परिपूर्ण असेल. सकारात्मक विचारांनी भरलेल. जर तुम्ही कोणत्याही गंभीर आजाराने ग्रस्त असाल तर तुमच्या तब्येतीत सुधारणा दिसून येईल. मिथुन राशी आज अचानक तुमच्या घरी नातेवाईक येण्याची शक्यता आहे. जे तुम्हाला अपार आनंद देईल. जवळीक असेल, प्रेम संबंध नाही. पती-पत्नीमध्ये परस्पर समंजसपणा वाढल्याने संबंध सुधारतील. तुम्हाला तुमच्या सासरच्या…

