भडगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील कोठली येथील भूमिपुत्र व सीआरपीएफच्या १३७बटालियनचे जवान प्रवीण अभिमन्यू पाटील यांना उधमपूर येथे देशसेवा बजावताना वीर मरण आल्याची माहिती १८ फेब्रुवारीलला दुपारी ३ वाजता हाती आली आहे.
कोठली येथील भूमिपूत्र व सीआरपीएफच्या १३७बटालियनचा जवान प्रवीण पाटील हा उधमपूर येथे कार्यरत असताना गोळी लागल्याने त्यांना विरमरण आले आहे. सुमारे १२ वर्षांपासून ते देशसेवेत कार्यरत होते. गत आठवड्यात कोठली येथे आई, वडिलांच्या चरणी नतमस्तक होऊन तसेच नातेवाईक व मित्र परिवाराला भेटून ते कर्तव्यावर परतले होते. त्यातच अशी अचानक दुःखद वार्ता गावात आल्याने सर्वत्र शोकाकळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, १ मुलगा, १ मुलगी, भाऊ, वहिनी असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव गावात आण्यासाठी गावातील नातेवाईक रवाना झाले आहेत. त्यांच्यावर २० फेब्रुवारीला सकाळी १० वाजता भडगाव ते नगरदेवळा स्टेशन रोडवरील कोठली फाट्यालगत असलेल्या त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार केले जातील.