• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

हृदयद्रावक : घराचा दरवाजा उघडताच आईला दिसला मुलाचा मृतदेह !

editor desk by editor desk
February 19, 2025
in क्राईम, जळगाव
0
हृदयद्रावक : घराचा दरवाजा उघडताच आईला दिसला मुलाचा मृतदेह !

जळगाव : प्रतिनिधी

महिनाभराची सुट्टी घेऊन आलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानाने आईला मिसळ आणण्यास सांगितले. आई मुलासाठी मिसळ घेऊन आल्यानंतर घराचा दरवाजा उघडताच समोर गळफास घेत आत्महत्या केलेल्या मुलाचा मृतदेह दिसला. ही हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळी ८:३० वाजता जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथे घडली. दीपक अशोक निकम (वय ३८) असे मयत तरुणाचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे कि, आई मिसळ घ्यायला गेल्यानंतर घरी कोणीही नव्हते. तेव्हा मधल्या घरात जाऊन दीपकने गळफास लावून घेतला. काही वेळानंतर आई मिसळ घेऊन घरी परतली असता दरवाजा लावलेला दिसला. दरवाजा उघडताच समोर दीपक गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. आईने हंबरडा फोडल्यानंतर शेजारी व दीपकचे नातेवाईक घरात आले, त्यांनी लागलीच दीपकला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून दीपकला मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. रुग्णालयात दीपकच्या नातेवाइकांनी, मित्रांनी गर्दी केली होती. घटनेप्रकरणी तालुका पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, दीपकच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुलं असा परिवार आहे. दीपकच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

Previous Post

नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे !

Next Post

अल्पवयीन मुलाने पळविली १० लाख किमती सोन्याच्या दागिन्याची पिशवी !

Next Post
सोने – चांदी झाले स्वस्त ; जाणून घ्या काय राहणार भाव

अल्पवयीन मुलाने पळविली १० लाख किमती सोन्याच्या दागिन्याची पिशवी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी : बच्चू कडू यांची उपोषण स्थगित करण्याची घोषणा !
कृषी

मोठी बातमी : बच्चू कडू यांची उपोषण स्थगित करण्याची घोषणा !

June 14, 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !
क्राईम

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !

June 14, 2025
जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !
क्राईम

जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !

June 14, 2025
विद्यार्थिनीला आधी मिठी मारली अन मग गोळी मारली !
क्राईम

हॉटेल मालकाला खंडणी मागत सोन्याची चैन केली लंपास !

June 14, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

भुसावळात किरकोळ कारणावरून काका-पुतण्याला मारहाण !

June 14, 2025
वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !
क्राईम

वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !

June 14, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group