Author: editor desk

नवी दिल्ली : वृत्तसंस्था संपूर्ण जगाने महाकुंभ मेळ्याच्या रूपात भारताची भव्यता पाहिली. महाकुंभात आपण राष्ट्रीय जागृतीचे साक्षीदार आहोत, जे नवीन कामगिरीला प्रेरणा देईल. यामुळे आपल्या सामर्थ्यावर शंका घेणाऱ्यांनाही योग्य उत्तर मिळाले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मंगळवारी लोकसभेत पंतप्रधान मोदींनी महाकुंभाच्या आयोजनावर भाष्य केले. यावेळी त्यांनी या कार्यक्रमात योगदान देणाऱ्यांचे आभार मानले. लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, पंतप्रधान म्हणाले की, गेल्या वर्षी अयोध्येत झालेल्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याने आपल्या सर्वांना पुढील एक हजार वर्षांसाठी देश कसा तयारी करत आहे, याची जाणीव करून दिली. या वर्षी महाकुंभाने आपल्या विचारांना आणखी बळकटी दिली आहे. देशाची ही सामूहिक जाणीव आपल्याला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांची औरंगाबाद नगर परिषद संचानालय येथे बदली झाली असून ही नियमित बदली नसून फार मोठ्या अंतर्गत राजकीय घडामोडी घडल्यानंतर उचल बांगडी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे माजी विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांच्या दणक्याने ही बदली झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील अनागोंदी कारभाराविरोधात एकनाथराव खडसे व माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष पाटील यांनी गेल्या दोन वर्षापासून भ्रष्ट कारभाराविरोधात विडा उचलला होता. आठ चार्ज सीट फाईल करण्यात आल्या होत्या. दोन दिवसापूर्वीच वाघुर येथे मोठा भव्य दिव्य अजय अतुलचा कार्यक्रम सोनवणे यांनी केला त्यानंतर अवघ्या 24 तासात सोनवणे यांना मोठा धक्का देण्यात एकनाथराव…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापले असताना नागपूर शहरातील महाल परिसरात आज सोमवारी (दि. 17) रात्री 8 च्या सुमारास मोठा राडा झाला. त्यात दोन विशिष्ट समुदायाकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली आहे. तसेच गाड्यांचीही जाळपोळ करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झालेत. त्यांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून स्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पण जमावाने पोलिसांवरच दगडफेक करत त्यांच्या गाड्या पेटवून दिल्यात. यामुळे नागपुरात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जादा कुमक मागवली आहे. या घटनेत डीसीपी आणि पोलीस कर्मचाऱ्यासह चार जण जखमी झाले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी धावत्या बसमधून १ तोळे सोने लांबविणाऱ्या यवतमाळ येथील दोन महिलांना अटक करण्यात अमळनेर पोलिसांना यश आले आहे. एखाद्या चित्रपटाला शोभेल असा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात पाठलाग पोलिसांनी केला. गंगा चैना हातगडे (४०) आणि गंगा सुभाष नाडे (४५, दोन्ही रा. नेताजीनगर, यवतमाळ) अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिभा जिजाबराव पाटील (४८, रा. गारखेडा ता. धरणगाव) ही महिला शिंदखेडा तालुक्यात लग्न समारंभासाठी धरणगावहून जळगाव दोंडाईचा बसमधून प्रवास करीत होती. दुपारी दोन वाजेच्या सुमारास पैलाड नाक्यावर तिच्या शेजारी बसलेल्या दोन महिला उतरल्या. महिलेने आपल्या पिशवीतील पर्स मध्ये असलेले दागिने तपासले असता ते गायब झाल्याचे आढळले. महिलेने अमळनेर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील गेंदालाल मिल परिसरात रविवार दि. १६ मार्च रोजी दारू पिऊन आलेल्यांना हॉटेलमध्ये आरडाओरड करण्यास मज्जाव केल्याचा राग आल्याने हॉटेल चालक शेख शाहरुख शेख गणी (२९, रा. गेंदालाल मिल परिसर) यांना चार जणांनी मारहाण केली. सविस्तर वृत्त असे कि, शेख यांच्या हॉटेलमध्ये आदेश, सोन्या, आवेश (पूर्ण नाव समजू शकले नाही) आणि त्यांचा एक साथीदार असे चार जण आले होते. दारूच्या नशेत चौघेही आपसात मस्करीने एकमेकांना शिवीगाळ करीत आरडाओरड करीत होते. त्यावेळी शेख यांच्या आईने त्यांना शांततेत जेवण करण्याविषयी सांगितले, तरीही ते ऐकत नसल्याने शेख त्यांना समजावण्यासाठी गेले असता, त्यांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात…

Read More

नशिराबाद : प्रतिनिधी भाडेतत्त्वावर दिलेले घर खाली करून घेतल्याने त्याचा जाब विचारत घरमालक गलू पुजो पाटील यांच्या पोटात चाकू खूपसून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना १४ मार्च रोजी नशिराबाद येथे घडली. या प्रकरणी प्रमोद नामदेव पाटील (४५, रा. नशिराबाद) याच्याविरुद्ध नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, गलू पाटील यांनी त्यांचे घर भाडेतत्त्वाने दिलेले होते. ते घर त्यांनी भाडेकरूकडून खाली करून घेतले. घर खाली करून घेतल्याबाबत भाडेकरू प्रमोद पाटील यांनी विचारणा केली. त्यावर आम्हाला येथे राहण्यासाठी यायचे असल्याने घर खाली करून घेतल्याचे घरमालकाने सांगितले. त्याचा राग आल्याने पाटील याने गलू पाटील यांना मारहाण…

Read More

मेष राशी आज कामाच्या ठिकाणी मन कमी लागेल. शरीरात आळस राहील. राजकारणात रुची वाढेल. एखाद्या कामात व्यत्यय येऊ शकतो. व्यवसायात जास्त धावपळ होईल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. अनोळखी व्यक्तीवर जास्त विश्वास घातक ठरू शकतो. कुटुंबात काही सुखद घटना घडू शकतात. वृषभ राशी आज व्यवसायात उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होईल. तुम्हाला तुमची बचत काढून घ्यावी लागेल आणि ती कोणतीही मौल्यवान वस्तू खरेदी करण्यासाठी खर्च करावी लागेल. कुटुंबातील एखाद्या सदस्यावर जास्त पैसे खर्च होऊ शकतात. मिथुन राशी आजचा दिवस संघर्षाने भरलेला असेल. कोणाचीही दिशाभूल करू नका. तुमच्या बुद्धीने वागा. सामाजिक कार्यात रस कमी राहील. व्यवसायाशी संबंधित लोकांना चढ-उतारांना सामोरे जावे लागेल. कर्क…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहिण योजना सुरु केली होती हि योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली. या योजनेअंतर्गत दर महिन्याला पात्र महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा केले जातात. मात्र अलीकडेच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये या रक्कमेत वाढ करून २१०० रुपये करण्याची कोणतीही घोषणा झाली नाही. यावरून विरोधकांकडून सरकारवर टीका केली. तसेच ही योजना बंद होणार असल्याचा आरोपही केला जात आहे. यावर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली आहे. अजित पवार यांनी लाडकी बहीण या योजनेत आम्ही दुरुस्ती करणार आहोत. मात्र ही योजना बंद करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच लाडकी बहीण योजनेतून ज्यांची नावे…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था आज राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती साजरी होत आहे. दरम्यान, मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी शिवजयंती निमित्त केलेली सोशल मीडिया एक्स (X) पोस्ट सध्या चर्चेत आहे. राज ठाकरे यांनी “माझ्या संपूर्ण आयुष्यावर शिवचरित्राचा प्रभाव आहे, त्यामुळे कधीच नैराश्य, नकारात्मकता मला स्पर्शू शकत नसल्याचे” पोस्टमध्ये म्हटले आहे. राज ठाकरे यांनी ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती. दरवर्षी महाराजांची जयंती तिथीनुसार आणि तारखेनुसार साजरी होते. यावर मध्येमध्ये वाद पण होत असतात. खरंतर महाराजांची जयंती ही ३६५ दिवस साजरी व्हायला हवी इतके महाराज लोकोत्तर पुरुष होते. पण ३६५ दिवस साजरी करायची…

Read More

जळगाव : प्रतिनिधी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. गद्दार-खोके हा डाग जनतेने पुसला असून विरोधकांची बोलती बंद केली आहे. असे रोखठोक मत व्यक्त करत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या खास शैलीत जनतेच्या मनातला सूर व्यक्त केला. “मी स्वार्थासाठी नाही, तर बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि हिंदुत्व जोपासण्यासाठी उठाव केला होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही.” अशा ठाम शब्दांत त्यांनी इशारा दिला. सत्ता ही टिकवण्यासाठी नाही, तर समाजाच्या सेवेसाठी असते. गरीब जनतेच्या सेवेमुळे मला उर्जा मिळते. म्हणूनच मी दिवस-रात्र जनतेसाठी झटतो. शिरसोलीच्या जनतेचा विश्वास हा माझ्यासाठी खूप मोठा पुरस्कार आहे.…

Read More