जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हा कृषी औद्योगिंक सर्व सेवा सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली होती. दि. १८ रोजी चेअरमन व व्हाईस चेअरमन निवड पार पडली. दोन्ही पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध जाहिर करण्यात आली. यावेळी चेअरमनपदी रोहित निकम यांची तर व्हा. चेअरमनपदी अरविंद देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेची निवडणूक नुकतीच जिल्हा दूध संघाचे संचालक रोहीत दिलीपराव निकम यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडली होती. चेअरमन व व्हाईस चेअरमन निवड बिनविरोध होण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीष महाजन, पाणी पुरवठामंत्री व जळगाव जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, पदमश्री ॲड.…
Author: editor desk
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना व पती-पत्नीचा वाद नेहमीच होत असतांना आता एक खळबळजनक बातमी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून समोर आली आहे. मूलबाळ होत नसलेल्या पत्नीने झोपेत असताना पतीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना जिल्ह्यातील लासूर स्टेशन येथे १२ मार्च रोजी घडली आहे. याप्रकरणी महिलेविरोधात गुन्हा दाखल करत तिला अटक करण्यात आली. पमुसिंग छगनसिंग पपैय्या (वय ६४ ) असं हत्या झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकाचे नाव आहे. तर भारती पमुसिंग पपैय्या (वय ५१) असं आरोपी महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पमुसिंग आणि भारती हे दोघे जण लासूर स्टेशन येथील हनुमान मंदिराजवळ राहत होते.…
कोल्हापूर : वृत्तसंस्था छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या आणि इतिहासकार इंद्रजित सामंत यांना शिवीगाळ करत धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने दणका दिला आहे. प्रशांत कोरटकरने अटकपूर्व जामिनासाठी कोल्हापूरच्या कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, कोल्हापूर कोर्टाने प्रशांत कोरटकरचा जामिन अर्ज फेटाळला आहे. अंतरिम जामिनाचा अर्जच फेटाळण्यात आल्यामुळे त्याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे अटकपूर्व जामिनासाठी प्रशांत कोरटकर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज करणार असल्याची माहिती मिळत आहे. प्रशांत कोरटकर हा गेल्या 25 फेब्रुवारी पासून फरार असून अटकपूर्व जमीन मंजूर असतांना देखील प्रशांत कोरटकर आपली बाजू मांडायला व आवाजाचे नमुने द्यायला…
मोठी बातमी : नागपूर हिंसाचारात खानचा मास्टरमाईंड म्हणून उल्लेख ! गेल्या काही दिवसापासून राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून मोठा वाद सुरु झाला असतांना नागपूर येथे दोन गटात मोठी दंगल झाली होती. आता त्या हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेला हिंसाचार समोर आला आहे. त्यात 38 वर्षीय फहीम खान नामक व्यक्तीवर जमाव गोळा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी फहीम खानचा उल्लेख मास्टरमाईंड म्हणून केला आहे. त्यामुळे तोच या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे स्पष्ट झाले आहे. नागपूरमध्ये सोमवारी रात्री भयंकर हिंसाचार झाला होता. त्यात अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती. या घटनेत उपायुक्त दर्जाच्या 4 अधिकाऱ्यांसह एकूण 33 पोलिस जखमी झाले होते. हिंदुत्ववादी संघटनांनी मुघल…
मुंबई : प्रतिनिधी राज्यात औरंगजेबाच्या कबरीच्या वातावरण तापले असून या मुद्द्यावरून विधान करणाऱ्या नितेश राणे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तंबी दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. राणे यांना मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांच्या कार्यालयात बोलावून चांगलंच खडसावलं आहे, अशीही चर्चा आहे. यावर राणेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. मला मुख्यमंत्री फडणवीस यांनी तंबी दिलेली नाही. त्यांच्या लाडक्या मंत्र्यांच्या यादीत माझं नाव आहे, असं राणे म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून वाद उफाळून पेटला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगजेबाची कबर आहे. ती कबर उखडून टाकण्यात यावी, अशी मागणी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेकडून होत आहे. १७ मार्चला नागपूरमध्ये २ गटात झालेल्या तुफान राड्यानंतर राज्यातील वातावरण आणखी…
जळगाव : प्रतिनिधी उसनवार घेतलेले पैसे परत कर अशी मागणी करीत मीराबाई हंसराज राठोड (५०, रा. रामदेववाडी, ता. जळगाव) या महिलेला दोन जणांनी मारहाण करीत डोक्यात सळई मारून गंभीर जखमी केले. ही घटना १६ मार्च रोजी रात्री रामदेववाडी येथे घडली. सविस्तर वृत्त असे कि, रामदेववाडी येथील रामलाल कोल्हा राठोड हा मीराबाई राठोड यांच्याकडे आला व त्यांच्यामध्ये उसनवारीच्या पैशावरून वाद झाला. यावेळी राठोड याने लोखंडी सळई महिलेच्या डोक्यात मारली. तसेच तर त्याच्या मुलानेदेखील महिलेला मारहाण केली. या प्रकरणी महिलेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ स्वप्नील पाटील करीत आहेत.
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील दापोरा येथील रहिवासी विजय रमेश चव्हाण (वय २८) हे रूळ ओलांडत असताना धावत्या रेल्वेचा धक्का लागून ठार झाले. ही घटना सोमवारी (१७ मार्च) रात्री दापोरा शिवारात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याविषयी एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले व मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शेळीपालन करणारे विजय चव्हाण यांचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले, मात्र ते पत्नीपासून विभक्त राहत होते. सोमवारी रात्री दापोरा शिवारात रेल्वे रुळ ओलांडत असताना रेल्वेची धडक लागल्याने ते ठार झाले. मयताच्या पश्चात आई, दोन…
मेष राशी श्रीगणेश म्हणतात की, आज तुम्ही इतरांच्या सल्ल्यापेक्षा स्वत:वर विश्वास ठेवून निर्णय घ्या. मालमत्ता खरेदीब व्यवसायाच्या ठिकाणाजवळ घराशी संबंधित मालमत्ता पाहत असाल तर त्याबद्दल गांभीर्याने विचार करा. ही मालमत्ता तुमच्यासाठी फलदायी ठरेल. कुटुंबात एखाद्या गोष्टीबाबत तणावपूर्ण परिस्थिती असू शकते. आईच्या आरोग्याबद्दल चिंता असेल. कार्यक्षेत्रातील महत्त्वाच्या कामांकडे दुर्लक्ष करु नका. वृषभ राशी श्रीगणेश सांगतात की, आज घराच्या देखभाल आणि नूतनीकरणाशी संबंधित योजना आखल्या जातील. खर्चात वाढ होईल. आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात तुमचा सहभाग असेल. शेजाऱ्यांशी एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो याची जाणीव ठेवा. नोकरदारांना कामाचे नियोजन करावे लागले. जोडीदाराचा पाठिंबा लाभेल. एखाद्या गोष्टीचा निष्कारण ताण अनुभवाल. मिथुन राशी आज नियोजनबद्ध…
मुंबई : वृत्तसंस्था नागपूर हिंसाचारावर मंगळवारी विधान परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य करताना ठाकरे गटावर टीकेची झोड उठवली. विशेषतः त्यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे व अनिल परब यांना चांगलेच धारेवर धरले. वाघाचे कातडे पांघरून लांडगा वाघ होत नाही. तुमचे साहेब मोदींकडे जावून त्यांची माफी मागून आलेत. तुमचाही इतिहास मला ठावूक आहे. त्यामुळे मला जास्त बोलायला लावू नका, असे ते म्हणालेत. एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी नागपूर येथील हिंसाचाराच्या मुद्यावर विधान परिषदेत निवेदन केले. पण मध्येच ते ठाकरे गटावर अक्षरशः तुटून पडले. त्याचे झाले असे की, ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी काही दिवसांवर एकनाथ शिंदे यांच्यावर केंद्राच्या नोटीसीला घाबरून…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सतत दारू पिऊन घरी येवून मारहाण करणारा पती आणि सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून एका 22 वर्षीय विवाहितेने आपल्या राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली आहे. दरम्यान, मुलीला गळफास देवून तिला ठार मारण्यात आले आहे, असा आरोप मयत विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात येवून अटक करण्यात यावी, अशी देखील मागणी त्यांनी केली आहे. सोमवारी रात्री घरी कोणी नसताना 22 वर्षीय सोनी चव्हाण हिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. मात्र ही घटना सोनी चव्हाण यांच्या माहेरी कळल्यानंतर त्यांनी ही आत्महत्या नसून सोनी हिला पती आणि…

