जळगाव : प्रतिनिधी
ओव्हर ब्रिजवरुन जात असलेल्या मयूर विलास पाटील (वय २०, रा. दोनगाव, ता. धरणगाव) यांना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू वाहनाने धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना दि. ८ रोजी खोटेनगरजवळील ओव्हर ब्रिजवर घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात मालवाहू वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, धरणगाव तालुक्यातील दोनगावात मयूर विलास पाटील हा तरुण वास्तवयास आहे. दि. ८ रोजी तो (एमएच १९, ईएम ५२२२) क्रमांकाच्या दुचाकीने जळगाव शहराकडे येत होता. यावेळी खोटेनगरजवळील ओव्हर ब्रिजवर जैन मंदिारसमोर मागून भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच १९, सीडबल्यू २२६२) क्रमांकाच्या मालवाहून रिक्षाने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार मयूर पाटील हा जखमी झाला. त्यानंतर जखमीला कुठलीही मदत न करता तो तेथून पसार झाला. उपचार घेतल्यानंतर जखमी मयूरने तालुका पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार मालवाहू वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ श्रीकांत बदर हे करीत आहे