धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव येथे काल दि.२१ रोजी दीड हजाराची लाच घेताना अधिकाऱ्याला अटक करण्यात आले असतांना आज पुन्हा एकदा जळगाव एसीबीने धरणगाव तालुक्यातील खर्दे बुद्रुक गावातील ग्राम विकास अधिकारी नितीन भीमराव ब्राम्हणे (वय ३७ वर्षे) यांना २५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. आरोपीने तक्रारदाराकडून गटारी आणि गावहाळ बांधकामाच्या बिलाच्या मोबदल्यात लाचेची मागणी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील खर्दे बुद्रुक गावात तक्रारदाराने २ लाख ७० हजार रुपयांचे काम पूर्ण केले होते, ज्यासाठी त्यांना २ लाख ६४ हजार रुपयांचे चेक मिळाले. मात्र, ग्राम विकास अधिकाऱ्याने या बिलांच्या प्रक्रियेसाठी १० टक्के लाचेची मागणी (२७ हजार रुपये)…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहरातील छत्रपती शिवाजीनगर उड्डाण पुलाजवळ रेल्वे स्थानकानजीक दि.२२ मार्च रोजी शनिवारी शहराकडे येणाऱ्या अवजड ट्रकचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उतारावरून वेगाने मागे गेला. यामुळे मागे असलेल्या तीन रिक्षा आणि तीन दुचाकींचे मोठे नुकसान झाले. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील छत्रपती शिवाजी महाराजनगरकडून शहरात येण्यासाठी नेहमीच मोठी गर्दी असते आज दि.२२ रोजी दुपारच्या सुमारास एक ट्रक पुलावर चालत असतांना अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्या ट्रक रिव्हर्स गेला तर मागे असलेल्या रिक्षा MH-19-V-9202, MH-15-AK-5312, MH-19-V-8971 दुचाकी: बजाज पल्सर (MH-19-EM-4268), टीव्हीएस ज्युपिटर (MH-19-DU-7865), बजाज पल्सर (MH-19-EB-8278), हिरो स्प्लेंडर (MH-19-EK-9814) याचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र तिन्ही रिक्षा पूर्णतः निकामी…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील सम्राट कॉलनी परिसरात उभ्या ट्रकच्या टाकीतून डीझेल चोरी करणाऱ्या आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी यावल मधून अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरात वाहनांमधील डीझेल चोरीच्या घटना घडत होत्या. अखेर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीला शोधून काढले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अभिषेक अशोक तिवारी यांनी १६ मार्च रोजी त्यांच्या मालकीच्या दोन ट्रक वडेश्वर महादेव मंदिराजवळील रस्त्यावर पार्क केले होते. त्यामध्ये ९,२०० रुपये किंमतीचे १०० लिटर डीझेल भरून ठेवले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी चालक सैय्यद एजाज अकबर ट्रकजवळ गेला असता, टाकीतील संपूर्ण डीझेल गायब असल्याचे त्याच्या लक्षात आले. चोरी झाल्याची खात्री पटताच तिवारी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील नागपूर शहरात दंगलीची घटना घडली होती. यात अनेकांचे मोठे नुकसान झाले होते त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपुरातील दंगलीचा आढावा घेतला. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी दंगेखोरांकडून नुकसान भरपाई वसूल करण्याचा निश्चय व्यक्त केला. नागपूर दंगलीत झालेल्या नुकसानीची भरपाई दंगेखोरांकडून केली जाईल. विशेषतः त्यांनी पैसे भरले नाही तर त्यांची प्रॉपर्टी विकून त्याची भरपाई केली जाईल, असे ते म्हणाले. या दंगलीसंबंधी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्यांना दंगलखोरांसोबत सहआरोपी करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी आज नागपूरमध्ये घडलेल्या घटनेचा आढावा मी नागपूरच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून घेतला. एकूण घटनाक्रम आणि त्यानंतर केलेली कारवाई या सगळ्या…
मुंबई : वृत्तसंस्था महायुती व महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असून आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महायुतीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले कि, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात दंगल होते, प्रशांत कोरटकर नागपूरचा आहे. नागपूरलाच दंगल का झाली हा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. फडणवीसांचे सरकार हे मनोरुग्णांचे सरकार आहे, त्यांच्यावर सामूहिक उपचार करण्याची गरज आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे. संजय राऊत म्हणाले की, नागपूरचा प्रशांत कोरटकर हा त्यांचाच माणूस आहे. तो पळून गेला का नाही हे तेच सांगू शकतात. आपण म्हणायचो तो पळून गेला आणि तो भाजपच्या कार्यालयात असायचा किंवा…
जळगाव : प्रतिनिधी भुसावळ शहरातील मुकेश भालेराव या सराईत गुंडाची हत्या करून त्याचा मृतदेह तापी नदीच्या जवळ पुरून टाकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.२१) सायंकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली. चार दिवसांपूर्वी त्याला काही तरूण त्याला घरातून घेऊन गेले होते. तेव्हापासून तो बेपत्ता होता. ही हत्या टोळीयुध्दातून हत्या झाली असल्याची संशय व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश प्रकाश भालेराव ( वय ३१, रा. टेक्नीकल हायस्कूल मागे भुसावळ ) याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून यात खुनाचा प्रयत्न, मारहाण, लुटमार, धमकी, खंडणी आदींचा समावेश होता. यावर प्रशासनाने त्याला नाशिक येथे स्थानबध्द देखील होता. यातून बाहेर आल्यानंतर तो भुसावळ…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एमआयडीसीतील हॉटेल सागर जवळ काहीही कारण नसताना एका तरुणाला शिवीगाळ करून डोक्यात बियरच्या बाटल्या टाकून गंभीर दुखापत केल्याची घटना गुरुवार २० मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल कडू पाटील (वय-२१) रा. किनगाव ता. यावल ह.मु. रायपूर ता. जळगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान गुरुवारी २० मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजता राहुल पाटील हा एमआयडीसीतील हॉटेल सागर जवळून पायी जात असताना रस्त्यावर संशयित आरोपी दिनेश भारत चौधरी आणि ललित महेंद्र पाटील दोन्ही राहणार रामेश्वर कॉलनी जळगाव यांनी…
जळगाव : प्रतिनिधी गणेश कॉलनी भागातील एका महाविद्यालय परिसरात अनधिकृतपणे चॉपर घेऊन, सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करण्यासाठी फिरत असलेल्या तीन जणांना जिल्हापेठ पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. त्यापैकी दोन युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका अल्पवयीन मुलाला समज देऊन पालकांच्या ताब्यात दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गणेश कॉलनी भागात काही महाविद्यालयीन युवकांकडे कोणतीही परवानगी नसताना हत्यार बाळगत फिरत असल्याची माहिती जिल्हापेठ पोलिसांना मिळाली. त्यानुसार जिल्हापेठ पोलिस गेले असताना, तीन युवक पोलिसांना येताना पाहून पळून जाण्याच्या तयारीत दिसले. पोलिसांनी तिन्ही युवकांना पकडून त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे चॉपर आढळून आला
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील विटनेर येथील मराठी शाळेजवळ जुन्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना गुरुवारी घडली आहे. या संदर्भात गुरुवारी सायंकाळी एमआयडीसी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधात एकूण ९ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील विटनेर गावात असलेल्या ग्रामपंचायत सदस्याच्या विरोधात घराच्या अतिक्रमण संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात दावा टाकण्यात आला होता. या जुन्या वादातून आणि खुन्नस देण्यावरून गुरुवारी सकाळी १०:३० वाजता गावातील मराठी शाळेजवळ दोन्ही गट समोरासमोर आले. यात पहिल्या गटातील अजिंक्य राजू गोलांडे (वय-२२) यांनी फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की गावातील ग्रामपंचायत सदस्य सागर ईश्वर दिवाने याच्या विरोधात त्यांचे काका सुरेश गोलांडे यांनी…
मेष राशी राजकारणात इच्छित पद मिळण्याची शक्यता आहे. मुलांच्या आनंदात वाढ होईल. परदेश दौऱ्यावर जाऊ शकता. कुटुंबात काही शुभ कार्ये पूर्ण होतील. काही महत्त्वाच्या योजना सुरू करण्याची जबाबदारी तुमच्यावर येईल. वृषभ राशी आज पोटाशी संबंधित आजारांमुळे थोडा त्रास होईल. काही आजारामुळे तुम्हाला घरापासून दूर राहावे लागेल. आरोग्याबाबत सावध व सतर्क राहा. न्यूरोलॉजिकल रुग्णांनी जास्त मानसिक ताण घेणे टाळावे. मिथुन राशी राजकारणातील तुमच्या भाषणाचा जनतेवर चांगला प्रभाव पडेल. घरगुती जीवनात आकर्षण आणि प्रेम वाढेल. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. कला आणि अभिनय क्षेत्राशी निगडित लोकांना काहीतरी साध्य होईल. घरात चैनीच्या वस्तू आल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कर्क राशी आजचा दिवस अगदी मनासारखा जाईल.…

