Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  तीन वर्षाची चिमुकलीचा शेतातील झोपडीच्या अंगणात खेळत असतांना विद्यूत खंब्याला धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना जळगाव तालुक्यातील नशिराबाद शिवारात रविवारी १६ जुलै रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने सोबत असलेल्या मोठ्या बहिणी या बचावल्या आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बावली रूमला पावरा (वय-३) रा. नशिराबाद ता.जि.जळगाव असे मयत बालिकेचे नाव आहे. नशिराबाद गावातील चंदन सोपान पाटील यांच्या शेतात गेल्या दीड ते दोन वर्षांपासून रूमला पावरा हा तरूण आई,वडील, पत्नी आणि तीन मुलीसोबत झोपडी करून राहत आहे. त्यांच्या घराच्या बाजूतून विद्यूत तारा गेलेल्या असून झोपडीच्या नजीक रूमला पावरा आणि…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  देशातील अनेक राज्यात पावसाचा हाहाकार सुरु असतांना एक मोठी बातमी समोर आली आहे. जम्मू-काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यात एक गाडी रविवारी सकाळी सिंध नदीत कोसळली. या गाडीतून सीआरपीएफचे जवान प्रवास करत होते. अपघातात ८ जवान जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले की, सीआरपीएफचे जवान बालटालच्या रस्त्याने अमरनाथ गुहा मंदिराच्या दिशेने जात होते. तेव्हा ही दुर्घटना घडली. अपघातात जखमी सीआरपीएफ कर्मचाऱ्यांना वाहनातून बाहेर काढलं आहे. बालटाल इथल्या बेस शिबिराच्या रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे. गांदरबलच्या बटाल भागात नीलग्रार हेलिपॅडजवळ गाडी सिंध नदीत कोसळली.अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी मोठ्या संख्येने सीआरपीएफ जवान तैनात करण्यात आले आहेत. अमरानथ यात्रेचा काळ वगळता…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरातून सिहोर येथे जाणाऱ्या तरुणांच्या वाहनाचा सेंधवा येथे टायर फुटल्याने भीषण अपघातात चारचाकीचे टायर फुटल्याने वाहन उलटले यात जळगाव येथील एक तरुण ठार तर इतर पाच जण जखमी असून, त्यातील एका जणाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली. जळगाव शहरातील सहा जण १५ जुलै शनिवार रोजी चारचाकी वाहनाने (एमएच १९ डीजे ७७७३) सिहोर येथे जात होते. संध्याकाळी सेंधवाजवळ वाहनाचे टायर फुटले व हे वाहन उलटले. यात सहापैकी एक तरुण जागीच ठार झाला इतर पाच जण जखमी झाले आहेत. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली. शहरातील काही मित्रमंडळी व अन्य काही जण याविषयी खात्री करीत होते. मात्र,…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  अजित पवार यांनी सर्व मंत्र्यांसह शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांची वेळ न घेता संधी साधत अजित पवार गटाने त्यांची वायबी चव्हाण सेंटरवर भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र, अजितदादा गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार हे आमचे दैवत आहे, त्यांचे पायपडून आशीर्वाद घेतले असे म्हटले आहे. दरम्यान राष्ट्रवादी एकसंध राहावी यासाठी आम्ही शरद पवारांना विनंती केली असून त्यांवर त्यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही असे ही यावेळी पटेल यांनी म्हटले आहे. आता शरद पवार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पावसाळी अधिवेशनाआधी अजित पवार गटाच्या मंत्र्याची बैठक पार पडली.…

Read More

धुळे : वृत्तसंस्था  राज्यातील शिंदे फडणवीस व पवार सरकार गेल्या आठवड्यात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी धुळ्यात येवून गेले पण शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात रस्तेच नसल्याने ॲम्बुलन्स पोहोचू शकत नाही. यामुळे गर्भवती महिलेला तब्बल तीन किमीपर्यंत बांबूंच्‍या साहाय्याने केलेल्या झोळीमधून रुग्णालयापर्यंत नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. एकीकडे राज्य सरकार शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये पोहोचून शासन कशा पद्धतीने नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचून सेवा देत आहे. याचा गवगवा करत असताना दुसरीकडे हे धक्कादायक वास्तव उघडकीस आल्याने राज्य सरकारचं पुन्हा एकदा पितळ उघड पडल आहे. राज्य सरकार फक्त शहरी भागांमध्येच आपला विकास दाखवत असल्याचं या घटनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा अधोरेखित…

Read More

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था  जिल्ह्यातील शेतकऱ्याला कल्पनाही नसताना, त्याच्या शेतात विहीर खोदली गेली. तीन लाख रुपये शासकीय अनुदानसुद्धा परस्पर उचलले. हा सर्व प्रकार चार वर्षांपूर्वी झाल्याची शासकीय दप्तरातील नोंद पाहून त्याला धक्काच बसला. यानंतर सातत्याने पाठपुरावा करूनही कारवाई झाली नाही, म्हणून त्याने थेट उच्च न्यायालयात धाव घेतली. अखेर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मुभा देत या शेतकऱ्याची याचिका न्यायालयाने निकाली काढली. साहेबराव सखाहरी जाधव हे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधील शेलगाव गंजी येथील शेतकरी आहेत. त्यांच्या शेतात विहीर खोदण्यासाठी चार वर्षांपूर्वी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत परस्पर २ लाख ९९ हजार रुपये अनुदान मंजूर करून घेतले गेले. बनावट कागदपत्रे आणि स्वाक्षरी…

Read More

चोपडा : प्रतिनिधी  शहरातील महात्मा गांधी महाविद्यालयाजवळील महालक्ष्मी नगरातील महिला पायी फिरत असताना त्यांच्या गळ्यातील दुचाकीवरील दोघांनी सोन्याची पोत तोडून धरणगावच्या दिशेने पोबारा केला होता. चोपडा पोलिसांनी त्यांना सेंधव्यातून मुद्देमालासह अटक केली आहे. माहीती मिळताच सहायक पोलिस अधीक्षक कृषीकेश रावळे, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक के. के. पाटील व सहायक पोलिस निरीक्षक संतोष चव्हाण, पोउनि घनश्याम तांबे, हवालदार विलेश सोनवणे, मिलिंद सपकाळे व इतर कर्मचाऱ्यांनी धरणगाव व शिरपूर रस्त्यावर नाकाबंदी करून आरोपींचा वेले निमगव्हाण गावापर्यंत शोध घेतला होता. संशयितांना शुक्रवारी चोपडा न्यायालयात हजर केले असता १७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. धूम गैंगप्रमाणे महिलेच्या अंगावरील सोने तोडून पसार होणारी टोळी…

Read More

जामनेर : प्रतिनिधी  शहरातील शिवाजीनगर परिसरात भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका व्यक्तीचे अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा तोडून कपाटाचे लॉक तोडून आतील सोन्या चांदीचे दागिने व रोकड लांबवण्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दररोज होणाऱ्या घोरपडी चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. मिळालेली माहिती अशी की शिवाजीनगर परिसरात राहणारे व व्यापारी असणारे सुरज कुमार राजमल संकुचा वय 46 हे भाड्याच्या घरात राहत असून त्यांच्या घर बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करून घरातील कपाटाचे लॉक तोडून त्यामधील…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील रेल्वेस्थानकाच्या फलाटा क्र.४ वर एक मालगाडी थांबली असताना एका अनोळखी ५० वर्षीय इसमाने यागाडीच्या डब्यावर चढला असून त्याला हाय व्होल्टेजचा विद्युत शॉक लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि. १४ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून हा प्रकार रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रेल्वे स्थानकावरील फलाट क्र.४ वर दि. १४ जुलै शुक्रवार रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास जळगाव रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक ४ वर एक मालगाडी उभी असतांना एक अनोळखी व्याक्तिने मालगाडीच्या डब्यावर चढला असता त्याचा विद्युत तराणा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा भर दिवसा विनयभंग केल्याची घटना दि.१४ रोजी दुपारी उघडकीस आली होती. हि घटना परिसरातील नागरिकांना समजताच त्यांनी लागलीच संशयित तरुणाची दुचाकी पेटवून दिली होती. या प्रकरणी आता तालुका पोलिसात संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील कोल्हे हिल्स जवळील एका परिसरातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह रहिवासास असून दि. १४ रोजी दुपारच्या सुमारास एक अनोळखी इसम दुपारच्या सुमारास अल्पवयीन मुलगी आपल्या लहान बहिणीसोबत घरी एकटी असल्याची संधी साधत बळजबरीने घरात घुसत अल्पवयीन मुलीसोबत चुकीचे कृत्य केले. तसेच संशयित आरोपी भारत सुभाष सूर्यवंशी(वय…

Read More